शेतकरी संशोधकाला अखेरचा निरोप

शेतकरी संशोधकाला अखेरचा निरोप
शेतकरी संशोधकाला अखेरचा निरोप

चंद्रपूर : भात वाणाचे संशोधक कृषिभूषण दादाजी खोब्रागडे यांच्यावर सोमवारी (ता. ४) त्यांच्या मूळगावी नांदेड (ता. नागभीड) येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचा मुलगा मित्रजित खोब्रागडे यांनी चिताग्नी दिला.  एचएमटी या पूर्व विदर्भात प्रसिद्ध असलेल्या धान वाणाचे संशोधन अल्पशिक्षित शेतकरी संशोधक दादाजी खोब्रागडे यांनी केले होते. त्यानंतर त्यांनी तब्बल नऊ वाण विकसित करून ते शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले. घरच्या परिस्थितीमुळे दादाजींना तिसरीनंतर शिक्षण सोडावे लागले होते. कुटुंबाच्या दीड एकर शेतीच्या भरवशावरच त्यांचा चरितार्थ सुरू आहे. दरम्यान, काही महिन्यांपूर्वी त्यांना अर्धांगवायूचा झटका आला होता. त्यानंतर त्यांची प्रकृती ढासळत गेली. उपचारासाठी पैसे नसल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी शासनाकडे आर्थिक मदतीसाठी निवेदनाद्वारे विनंती केली. परंतु त्याची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे काही सामाजिक संस्थांनी त्यांच्या उपचारासाठी निधी संकलित केला. तब्बल सात लाख रुपयांचा निधी या माध्यमातून गोळा करून त्यांच्या कुटुंबीयांच्या सुपूर्द करण्यात आला.  उपचारा दरम्यान मृत्यू नागपुरातील सुहास कानफाडे यांच्या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. दरम्यान, गडचिरोली येथील डॉ. अभय बंग यांच्या सर्च संस्थेच्या सेवाभावी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा रविवारी (ता. ३) साडेसात वाजता मृत्यू झाला. सोमवारी (ता. ४) नांदेड (ता. नागभीड) येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. प्रशासनाच्या वतीने नागभीड तहसीलदार माने यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com