agriculture news in Marathi, Lath area and kharfuti forest area increased, Maharashtra | Agrowon

महाराष्ट्रातील पानथळ क्षेत्र, खारफुटी जंगलात वाढ
टीम अॅग्रोवन
बुधवार, 14 फेब्रुवारी 2018

मुंबई  : जलयुक्त शिवार योजना, पानथळ विकास कार्यक्रम आदींच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे राज्याच्या जंगलातील पानथळ क्षेत्रात वाढ झाली असून राज्यातील खारफुटी जंगलही ८२ चौरस किलोमीटरने वाढल्याचे देशाच्या वार्षिक वन अहवालातून स्पष्ट झाले आहे.

मुंबई  : जलयुक्त शिवार योजना, पानथळ विकास कार्यक्रम आदींच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे राज्याच्या जंगलातील पानथळ क्षेत्रात वाढ झाली असून राज्यातील खारफुटी जंगलही ८२ चौरस किलोमीटरने वाढल्याचे देशाच्या वार्षिक वन अहवालातून स्पष्ट झाले आहे.

केंद्रीय वने, पर्यावरण व हवामानबदल मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी वने विभागाचा वर्ष - २०१७ अहवाल सादर केला. या अहवालानुसार देशाच्या एकूण वनाच्छादित क्षेत्र ८ हजार २१ चौरस किलोमीटरची वाढ झाली असून जगात भारताचा १० वा क्रमांक लागतो. या अहवालानुसार जंगलातील पानथळ क्षेत्रात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. राज्याच्या जंगलातील पानथळ क्षेत्र ४३२ चौरस किलोमीटर आहे तर ४२८ चौरस किलोमीटरसह गुजरात दुसऱ्या क्रमांकावर आहे. यादीत ३८९ चौरस किलोमीटरसह मध्य प्रदेश तिसऱ्या क्रमांकावर आहे.

खारफुटी जंगल क्षेत्रात वाढ 
देशातील खारफुटी जंगलात एकूण १८१ चौरस किलोमीटर एवढी वाढ झाली असून यात एकटया महाराष्ट्राचा वाटा ८२ चौरस किलोमीटर एवढा आहे. राज्यातील ठाणे (३१), रायगड (२९), मुंबई उपनगर (१६), सिंधुदूर्ग(५), रत्नागिरी(१) आणि मुंबई शहर (शून्य) या जिल्ह्यांचा समावेश आहे.

दृष्टिक्षेपात महाराष्ट्रातील वनक्षेत्र 
अहवालानुसार महाराष्ट्राचे एकूण भौगोलीक क्षेत्र ३ लाख ७ हजार ७१३ चौरस किलोमीटर आहे. यापैकी ५० हजार ६८२ चौरस किलोमीटर क्षेत्र वनव्याप्त असून ते भौगालिक क्षेत्राच्या १६.४७ टक्के आहे. यात ८ हजार ७३६ चौरस किलोमीटर हे अती घनदाट जंगल, २० हजार ६८२ मध्यम घनदाट जंगल, २१ हजार २९४ चौरस किलोमीटर विरळ जंगल तर ४ हजार १६० चौरस किलोमीटर खुरटे जंगल आहे.
                             
राज्यातील डोंगराळ जिल्ह्यातील वनक्षेत्र
राज्यात एकूण ७ डोंगराळ जिल्हे असून त्यांचे एकूण भौगोलिक क्षेत्र ६९ हजार ९०५ एवढे आहे. यापैकी १५ हजार ६२० हे वनक्षेत्र असून ते २२.३४ टक्के आहे. एकूण वनक्षेत्रात अती घनदाट जंगल ३१५, मध्यम घनदाट जंगल ७ हजार २४५, विरळ जंगल ८ हजार ५९ आणि खुरटे जंगल १ हजार ४१५ चौरस किलोमीटर आहे.

आदिवासी जिल्ह्यातील वनक्षेत्र
राज्यात एकूण १२ आदिवासी जिल्हे असून त्यांचे भौगोलिक क्षेत्र १ लाख ४४ हजार २३३ आहे. यापैकी ३० हजार ५३७ चौरस किलोमीटर वनक्षेत्र असून ते २१.३३ टक्के आहे. यात ७ हजार २२९ चौरस किलोमीटर अती घनदाट जंगल, ११ हजार ६९५ चौरस किलोमीटर मध्यम घनदाट जंगल, ११ हजार ६१३ विरळ जंगल तर २ हजार १७७ खुरटे जंगल आहे.

इतर अॅग्रो विशेष
आज शिवजयंती : शिवनेरीवर पारंपारिक...पुणे : फाल्गुन वद्य तृतीया या तिथीनुसार आज (ता....
अतितीव्र हवामानस्थितीला कर्बाचे वाढते...पुणे : वातावरणातील कार्बनडाय ऑक्साईडचे (कर्ब)...
कमतरतेनुसार सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर...अलीकडे सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता अधिक...
पिंप्री गावाने कमावले लसूणघास शेतीत नाव पिंप्री (वळण) (ता. राहुरी, जि. नगर) हे गाव मुळा...
दुष्काळातही सुरती हुरड्याची  चवच काही...औरंगाबाद जिल्ह्यातील सारंगपूर येथील अरुण कडूबाळ...
। तुका म्हणे कान्हा । भूक लागली नयनां ।।देहू : तुकाराम तुकाराम...असा नामघोष आणि...
नांदेड जिल्ह्यात कापूस उत्पादकता...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात २०१८-१९ च्या खरीप...
नगरची लढत राहणार लक्षवेधीनगर : राज्याच्या सर्वाधिक लक्ष असलेल्या नगर (...
रब्बी पीकविम्याला बोगस प्रकरणांचे ग्रहणमुंबई ः २०१८-१९ च्या रब्बी हंगामात पंतप्रधान...
सहा कारखान्यांची धुराडी थंडावलीऔरंगाबाद  : मराठवाडा व खानदेशातील पाच...
बेदाण्याला दराची गोडीसांगली ः होळी सणाच्या पार्श्वभूमीवर बेदाण्याची...
आनंदाचा उतरता आलेखजगभरातील आनंदी देशांचा अहवाल (वर्ल्ड हॅपीनेस...
आदित्यात् जायते वृष्टि:जगात एकूण १९५ देश आहेत, पण आकार, आर्थिक स्थिती,...
आज संत तुकाराम बीजदेहू, जि. पुणे  : जगद्‌गुरू संत श्री तुकाराम...
उज्ज्वल भविष्याचा सर्वोत्तम मार्ग ‘जल...भारत जलसंकट समस्येचा सामना करत आहे. वाढती...
जल‘मुक्त’ शिवारवॉ टर ग्रीडच्या माध्यमातून मराठवाड्यातील सर्व...
राज्यात शंभर लाख टन साखर उत्पादनभवानीनगर, जि. पुणे ः राज्यात ३० टक्के हुमणीग्रस्त...
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अवकाळीची...पुणे : रविवारी, सोमवारी पुन्हा काही अंशी...
जैविक कीड-नियंत्रणासाठी उपयुक्त बुरशीगेल्या काही वर्षांमध्ये कीडनियंत्रणासाठी...
केशर आंबा फळगळीची कारणे अन् उपाययोजना  सद्यःस्थितीत हवामान आंबा झाडांसाठी...