agriculture news in marathi, launch a schem soon for farm compound, nagpur, maharashtra | Agrowon

शेत कुंपणाकरिता लवकरच अनुदान योजना
टीम अॅग्रोवन
बुधवार, 12 जून 2019

वन्यप्राण्यांमुळे होणाऱ्या नुकसानीच्या पार्श्‍वभूमीवर कुंपणाकरिता वैयक्तिक अनुदानाची योजना हवी, अशी मागणी आहे. त्या मागणीचा सकारात्मक विचार केला जात असून, या संदर्भातील निर्णय लवकरच होईल. 
- सुधीर मुनगंटीवार, वनमंत्री.

नागपूर  ः वन्यप्राण्यांकडून पिकांच्या होणाऱ्या नुकसानीच्या पार्श्‍वभूमीवर राज्य सरकार लवकरच वैयक्‍तिक शेतीकुंपणाकरिता अनुदानाची योजना राबविणार आहे. या योजनेचे काम अंतिम टप्प्यात असल्याची माहिती वन विभागाच्या सूत्रांनी दिली.

वन परिक्षेत्रालगत असलेल्या गावाशिवाराच्या संरक्षणाकरिता वन विभागाने ९० टक्‍के अनुदानावर कुंपणाची योजना राबविली आहे. उर्वरित दहा टक्‍के हिस्सा ग्रामपंचायतीला भरावा लागलो. या योजनांचा लाभ अनेक गावांनी घेतल्याचे सांगण्यात आले. गावाकरिता सामूहिक स्तरावर असलेल्या या योजनेसोबतच कुंपणाकरिता वैयक्‍तिक अनुदानाची योजना असावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. वन्यप्राणी शेतातील उभ्या पिकांचे नुकसान करतात. राज्यभरातील शेतकरी या समस्येने त्रस्त आहेत.

वन क्षेत्रात वाढता मानवी हस्तक्षेप, त्यासोबतच चारा, पाण्याची टंचाई या कारणांमुळे वन्यप्राण्यांनी आपला मोर्चा गावाकडे वळविला आहे. त्यांचा बंदोबस्त करण्याचे आव्हान शेतकऱ्यांसमोर आहे. परंतु कुंपणावर मोठा खर्च होत असल्याने अनेक शेतकऱ्यांना हा पर्याय अवलंबिणे शक्‍य होत नाही. त्या पार्श्‍वभूमीवर अनुदानावर कुंपणाकरिता तरतूद व्हावी, अशी मागणी होत होती. राज्य सरकारकडून या पर्यायावर सकारात्मक विचार होत असल्याची माहिती विश्‍वसनीय सूत्रांनी दिली. 
 

इतर ताज्या घडामोडी
अमरावती जिल्हा परिषद करणार जलजागृतीअमरावती ः रेन वॉटर हार्वेस्टिंगला प्रोत्साहन...
ज्वारी वाणाची विविधता : मूल्यवर्धनातून...कित्येक वर्षांपासून शेतकऱ्यांनी ज्वारीचे विविध...
लिची फळपिकाच्या जातीलालसर आकर्षक रंगाबरोबर आरोग्यासाठीचे फायदे लक्षात...
प्रक्रियेतून वाढवा कोरड्या चाऱ्याची...निकृष्ट दर्जाच्या कोरड्या चाऱ्यावर प्रक्रिया करून...
यवतमाळ जिल्ह्यात पेरण्या खोळंबल्यायवतमाळ : पावसाने पाठ फिरविल्याने जिल्ह्यातील...
दुपारची झोप मुलांना करते अधिक आनंदीजी शाळकरी मुले आठवड्यातून किमान तीन वेळा दुपारी...
सांगलीतील दुष्काळी पट्टा पावसाच्या...सांगली : जिल्ह्यात पावसाने दडी मारली आहे....
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत चार-...
नातेपुते-पंढरपूर मार्गावर वाहतुकीत तीन...सोलापूर : श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि...
पीककर्ज वाटप ७० वरून  ४५.५० टक्क्यांवर...मुंबई : शेतकरी कर्जमाफी योजना राबवूनही...
अमरावती जिल्ह्यात ५२ लाखांच्या बियाणे...अमरावती ः खरीप हंगामाच्या पार्श्‍वभूमीवर कृषी...
बीड जिल्ह्यातील १८ चारा छावण्यांवर...मुंबई  ः शासकीय पथकाने केलेल्या तपासणीत...
अमरावतीत बियाण्यांची जादा दराने विक्रीअमरावती  ः जिल्ह्यात एका कंपनीच्या कापूस...
वसारी येथे ‘स्वाभिमानी’ने केली दगड पेरणीवाशीम : खरीप हंगाम दारात आलेला असतानाही...
संघाच्या दूध खरेदीची मर्यादा आता वीस...वर्धा ः दूध संघाला केवळ ११ हजार लिटर खरेदीची...
वाशीममध्ये सरासरी १६.८२ टक्के पीक...वाशीम ः  जिल्ह्यात २०१९-२० या वर्षाच्या खरीप...
जळगावच्या आरोग्य अधिकाऱ्याची चौकशी करू...मुंबई ः राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत...
पीक कर्जासाठी शेतकऱ्यांचा धार फाटा येथे...गोजेगाव, जि. हिंगोली : बॅंका पीक कर्ज...
वाशीम समितीच्या गैरव्यवहारप्रकरणी सचिव...मुंबई ः  वाशीम जिल्ह्यातील कृषी उत्पन्न...
जळगावात कोथिंबीर २५०० ते ६००० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (...