साहित्य संमेलनाध्यक्षपदी लक्ष्मीकांत देशमुख

साहित्य संमेलनाध्यक्षपदी लक्ष्मीकांत देशमुख
साहित्य संमेलनाध्यक्षपदी लक्ष्मीकांत देशमुख

नागपूर : बडोदा येथे फेब्रुवारीत होणाऱ्या 91 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवृत्त आयएएस अधिकारी, कथाकार व कादंबरीकार लक्ष्मीकांत देशमुख यांची निवड झाली आहे. संमेलनाध्यक्षपदाच्या निवडणुकीत त्यांनी कादंबरीकार डॉ. रविंद्र शोभणे यांचा 70 मतांनी पराभव केला. 

साहित्य संमेलनाध्यक्षपदाच्या निवडणुकीत लक्ष्मीकांत देशमुख यांना 427 मते तर डॉ. शोभणे यांना 357 मते मिळाली. गेल्या दहा दिवसांपासून देशमुख आणि शोभणे यांच्यातच खरी चढाओढ असल्याचे स्पष्ट झाले होते. लक्ष्मीकांत देशमुख यांच्या पाठिशी मराठवाडा, तर शोभणेंच्या पाठिशी विदर्भ होता. या व्यतिरीक्त दोघांनीही मुंबई व पश्‍चिम महाराष्ट्रासह बृहन्महाराष्ट्रातील मते मिळविण्यासाठी बरेच प्रयत्न केले. यात बडोद्यातील आयोजक संस्थेची मतेही दोघांना विभागून मिळाली असावी, असा अंदाज आहे. पण, पश्‍चिम महाराष्ट्रातील बहुतांश मते देशमुखांना मिळाल्यामुळे विजय सोपा झाला, असे बोलले जात आहे.

सकाळी 9.30 वाजता मुख्य निवडणुक अधिकारी ऍड. मकरंद अग्निहोत्री यांच्या नेतृत्वात मतमोजणीला सुरूवात झाली. सुरुवातीपासून लक्ष्मीकांत देशमुख आघाडीवर होते. पहिल्या फेरीअखेर देशमुख आणि शोभणे यांच्यात जवळपास ऐंशी मतांचा फरक होता. विजयासाठी 434 मतांचा कोटा आवश्‍यक होता. पण, पहिल्या आणि दुसऱ्या फेरीत कुणालाही तो पूर्ण करता आला नाही, त्यामुळे चौथ्या फेरीपर्यंत प्रक्रिया लांबवावी लागली. चौथ्या फेरीअखेरही 434 पर्यंत कुणालाही मजल मारता आली नाही. त्यामुळे सर्वाधिक 427 मते मिळविणारे लक्ष्मीकांत देशमुख यांना विजयी घोषित करण्यात आले, असे ऍड. अग्निहोत्री यांनी सांगितले. यापूर्वी दोनवेळा नशीब आजमावणारे कथाकार राजन खान यांना दोन्हीवेळा दोन अंकी मतेदेखील मिळविता आली नव्हती. मात्र या निवडणुकीत त्यांनी 123 मतांपर्यंत मजल मारली. लक्ष्मीकांत देशमुख यांचे प्रतिनिधी ऍड. प्रमोद अडकर यांना निवडणुक अधिकाऱ्यांनी घोषणापत्र सोपविले. मतमोजणीच्या प्रक्रियेत उपनिर्वाचन अधिकारी मोहन पारखी, वैजयंती पोद्दार, प्रदीप मोहिते, रमेश उके, मोहन मसराम, नभा टेंभुरकर, कमलाकर यांनी सहभाग घेतला. 

एकूण मतदार ः 1073  प्राप्त मतपत्रिका ः 896  अवैध मते ः 29  वैध मते ः 867  ---------------------  लक्ष्मीकांत देशमुख ः 427  डॉ. रविंद्र शोभणे ः 357  राजन खान ः 123  डॉ. किशोर सानप ः 47  रविंद्र गुर्जर ः 41 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com