agriculture news in Marathi, leaders are in pressure due to farmers agitations in wahrad, Maharashtra | Agrowon

वऱ्हाडातील शेतकरी आंदोलनाचा नेत्यांनी घेतला धसका
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 5 डिसेंबर 2017

नागपूर  ः भारतीय जनता पक्षाचा गड असलेले अकोलाच आता शेतकरी आंदोलनाचे केंद्र म्हणून नावारूपास येत असल्याने स्थानिक भाजप नेत्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. स्थानिक नेत्यांऐवजी आयात नेत्यांच्या बळावर शेतकरी आंदोलन होत असल्याच्या मुद्द्याला त्या पार्श्‍वभूमीवर हवा दिली जात असून, निवासाकरिता विश्रामगृहदेखील मिळू नये याकरितादेखील प्रयत्न केले गेल्याने भाजपमधील अस्वस्थतेची चर्चा रंगली आहे. 

नागपूर  ः भारतीय जनता पक्षाचा गड असलेले अकोलाच आता शेतकरी आंदोलनाचे केंद्र म्हणून नावारूपास येत असल्याने स्थानिक भाजप नेत्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. स्थानिक नेत्यांऐवजी आयात नेत्यांच्या बळावर शेतकरी आंदोलन होत असल्याच्या मुद्द्याला त्या पार्श्‍वभूमीवर हवा दिली जात असून, निवासाकरिता विश्रामगृहदेखील मिळू नये याकरितादेखील प्रयत्न केले गेल्याने भाजपमधील अस्वस्थतेची चर्चा रंगली आहे. 

विदर्भ आणि त्यातही पश्‍चीम विदर्भ, वऱ्हाड हा भाजप-शिवसेनेचा गड म्हणून ओळखला जातो. जातीय समीकरणाच्या बळावर भाजप नेत्यांनी येथे आपले वर्चस्व कायम ठेवले. नजीकच्या काळात या गडाला भगदाड पाडण्याचे काम शेतकरी आंदोलनाच्या माध्यमातून होत आहे. खासदार नाना पटोले यांनी वऱ्हाडात आपल्या आंदोलनाची सुरवात अकोल्यातून केली.

त्यानंतर प्रहारचे आमदार बच्चू कडू, माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांनीदेखील शेतकरी आंदोलनाची सुरवात अकोल्यातूनच केली. शेतकरी जागर मंचच्या झेंड्याखाली हे नेते एका व्यासपीठावर आले. शेतकरी आंदोलनासाठी अकोलाच का, या प्रश्‍नामुळे स्थानिक भाजप नेतृत्वामध्ये कमालीची अस्वस्थता निर्माण झाली आहे. त्यातूनच आयात नेत्यांच्या बळावर सुरू असलेले हे आंदोलन दिशाहीन असल्याचे आणि टिकाऊ नसल्याची चर्चा घडवून आणली जात आहे.

दरम्यान, कासोधा (कापूस, सोयाबीन, धान) परिषदेच्या निमित्ताने माजी केंद्रीय अर्थमंत्री व भाजपच्या नाराज गोटातील यशवंत सिन्हा रविवारी (ता. ३) अकोल्यात आले होते. त्याच दिवशी समांतर शेतकरी परिषद अकोला जिल्ह्यातच आयोजित करण्यात आली. कासोधा परिषदेला गर्दी कमी व्हावी, असा प्रयत्न त्यामागे असल्याचे सांगितले जाते.

यशवंत सिन्हा मुक्‍कामी राहणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर तडकाफडकी एका नेत्याकडून डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ विश्रामगृहाच्या सर्वच्या सर्व खोल्या आरक्षित करण्यात आल्या. यशवंत सिन्हा यांना राहण्याकरिता सूट मिळू नये याकरिता ही खबरदारी घेण्यात आली, अशी चर्चा आणि आरोपही शेतकरी नेत्यांमधून होऊ लागला आहे. त्यातच वाण प्रकल्पाचे पाणी अकोला शहराकरिता आरक्षित करण्याच्या मुद्द्यावरूनदेखील सत्ताधाऱ्यांना शेतकऱ्यांनी वेठीस धरले आहे. अशाप्रकारे शेतीप्रश्‍नावरून चौफेर घेराबंदी झाल्याने नेत्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता पसरली आहे.

इतर ताज्या घडामोडी
गैरव्यवहारप्रकरणी कृषी अधिकाऱ्यांवर...मुंबई : नाशिक येथील कृषी सहसंचालक कार्यालयात...
उस पीक सल्ला उसपिकात सद्यस्थितीत ठिबकसिंचन पद्धतीने पाणी...
वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी जंगलांना...पर्यावरणातील बदलांशी जुळवून घेण्याच्या...
परभणीतील एक लाख ३३ हजार शेतकऱ्यांना... परभणी  ः छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी...
सातारा जिल्ह्यात ७५ लाख टन उसाचे गाळप सातारा : जिल्ह्यातील १४ साखर कारखान्यांचे ऊस गाळप...
कोल्हापुरातील ऊस गाळप हंगाम अंतिम... कोल्हापूर : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम हळूहळू...
मार्चअखेरपर्यंत टप्प्याटप्याने... मंदीतील ब्रॉयलर्सचा बाजार मार्चअखेरपर्यंत...
पुण्यात लसूण, फ्लॉवर, मटार वधारलापुणे ः वाढता उन्हाळ्यामुळे शेतीमालाचे उत्पादन...
चीनमध्ये डेअरी उत्पादनांच्या मागणीमध्ये...चीनमध्ये डेअरी उत्पादनांच्या मागणीमध्ये प्रति...
राहुल गडपाले ‘सकाळ’चे चीफ कन्टेंट क्‍...पुणे : सकाळ माध्यम समूहाच्या संपादक संचालकपदी...
सत्तावीस कारखान्यांकडून १ कोटी २१ लाख... नगर  ः नगर, नाशिक जिल्ह्यांत सुरू असलेल्या...
पुणे जिल्ह्यातील १०० मंडळांमध्ये... पुणे  ः हवामान अंदाजाबाबत अचूक माहिती...
लाचखोर तालुका कृषी अधिकारी 'लाचलुचपत'...अकोला : जलसंधारणाच्या केलेल्या कामांची देयके...
परभणी जिल्ह्यातील चार लघू तलाव कोरडे परभणी ः पाणीसाठा संपुष्टात आल्यामुळे...
स्वखर्चाने शेततळे करणाऱ्यांना मिळेना...औरंगाबाद : शेतीला पाण्याची सोय व्हावी म्हणून...
कोल्हापुरात गुळाचे पाडव्यानिमित्त सौदे कोल्हापूर : येथील बाजार समितीत पाडव्यानिमित्त...
साखरेप्रमाणे कापसासाठी धाेरण ठरवावे :...पुणे : साखरेप्रमाणेच कापसासाठी दरावर लक्ष कें....
राज्यात आज अन्नत्याग आंदोलनमाळकोळी, नांदेड ः आजवर आत्महत्या केलेल्या...
'ईव्हीएम'ऐवजी आता मतपत्रिकांचा वापर...नवी दिल्ली : आगामी निवडणुकांमध्ये इलेक्‍...
राज-पवार भेटीने चर्चेला उधाणमुंबई : दिल्ली येथे कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी...