येणेचवंडी प्रकल्पाला गळती

येणेचवंडी प्रकल्पाला गळती
येणेचवंडी प्रकल्पाला गळती

गडहिंग्लज, जि. कोल्हापूर : येणेचवंडी (ता. गडहिंग्लज) येथे लघुपाटबंधारे प्रकल्पाला गळती लागली आहे. जवळपास निम्मे पाणी प्रकल्पाबाहेर जात आहे. पाण्याचे दुर्भिक्ष त्यात लागलेल्या या गळतीच्या साडेसातीला यंदा तब्बल दोन दशके पूर्ण होत आहेत. 

पाण्याच्या उपलब्धतेबाबत तालुक्‍याचे दोन भाग पडतात. पश्‍चिम भागात पाऊस चांगला होतो. जोडीला बारमाही वाहणारी हिरण्यकेशी नदी आहे, तर पूर्व भागात पावसाचे प्रमाण अगदीच कमी. दुष्काळसदृश म्हणावे अशीच परिस्थिती. दरवर्षी बहुतांश गावे दुष्काळी जाहीर होतात. यंदा ३५ गावांचा यामध्ये समावेश आहे. याच भागात असणारा येणेचवंडी लघुपाटबंधारे प्रकल्प. २० वर्षांपूर्वी तब्बल दोन कोटी ८७ लाख रुपये खर्चून या प्रकल्पाची उभारणी झाली. या प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात येणेचवंडीसह बसर्गे व नौकूड ही तीन गावे येतात. 

पण, उभारणीच्या पहिल्या वर्षांपासूनच प्रकल्पाला दोन ठिकाणी गळती आहे. मूळात पावसाचे प्रमाण कमी असल्याने प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरत नाही. त्यात दरवर्षी गळतीमुळे जवळपास निम्मे पाणी प्रकल्पाबाहेर जाते. दुरुस्तीसाठी ग्रामस्थ, शेतकऱ्यांकडून सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. पाटबंधारे विभागाच्या तज्ज्ञ पथकाने प्रकल्पाला भेट देऊन पाहणी केली आहे. मात्र, गळती कशी काढायची, या प्रश्‍नावर येऊन दुरुस्तीचे घोडे अडले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com