agriculture news in marathi, lecture on dairy business, nagar, maharashtra | Agrowon

मुक्त संचार गोठा पद्धतीद्वारे साधावी दुग्ध व्यवसायात प्रगती ः कुलकर्णी
टीम अॅग्रोवन
सोमवार, 26 फेब्रुवारी 2018
नगर ः शेतीला पूरक म्हणून नव्हे; तर आता दुग्ध व्यवसाय मुख्य उद्योग झाला आहे. मात्र अजूनही अनेक शेतकरी शास्त्रोक्त पद्धतीने दूध व्यवसाय करताना दिसत नाहीत. दूध व्यवसायात प्रगती साधायची असेल, तर मुक्त संचार गोठा पद्धतीचा अवलंब करावा. चाऱ्याची बचत करण्यासाठी मुरघास तयार करावा, असे प्रतिपादन चितळे डेअरीचे विस्तार अधिकारी चंद्रशेखर कुलकर्णी यांनी केले. 
 
नगर ः शेतीला पूरक म्हणून नव्हे; तर आता दुग्ध व्यवसाय मुख्य उद्योग झाला आहे. मात्र अजूनही अनेक शेतकरी शास्त्रोक्त पद्धतीने दूध व्यवसाय करताना दिसत नाहीत. दूध व्यवसायात प्रगती साधायची असेल, तर मुक्त संचार गोठा पद्धतीचा अवलंब करावा. चाऱ्याची बचत करण्यासाठी मुरघास तयार करावा, असे प्रतिपादन चितळे डेअरीचे विस्तार अधिकारी चंद्रशेखर कुलकर्णी यांनी केले. 
 
नगर येथे सुरू असलेल्या ‘सकाळ- अॅग्रोवन’ कृषी प्रदर्शनातील चर्चासत्रात रविवारी (ता. २५) चंद्रशेखर कुलकर्णी यांनी ‘मुक्तसंचार गोठा आणि मुरघासनिर्मिती व दुधाळ जनावरे प्रजाती’ या विषयावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
 
कुलकर्णी म्हणाले, की शेतीला दुग्ध व्यवसायाचा मोठा आधार आहे. प्रत्येक शेतकऱ्याकडे दुभती जनावरे आहेत. मात्र दुग्ध व्यवसाय आता पारंपरिक पद्धतीऐवजी नव्या शास्त्रोक्त पद्धतीने करण्याची गरज आहे. एका जागी गोठ्यात जनावरे बांधून ठेवली, तर डासांचा प्रादुर्भाव होतो. जनावराची मानसिकता फारशी चांगली राहत नाही. शारीरिक व्यायाम होत नाही. त्या सगळ्या बाबीचा जनावरांच्या आरोग्यावर आणि परिणामी दूध उत्पादनावर परिणाम होतो.
 
त्यामुळे दूध व्यवसाय फायदेशीर आणि चांगला करायचा असेल तर मुक्त संचार गोठा पद्धतीचा अवलंब गरजेचा आहे. त्यामुळे चाराही कमी प्रमाणात लागतो. चितळे डेअरीने राज्यातील दहा हजार जनावरांसाठी टॅगिंग केले असून, त्यामुळे प्रमुख बाबी त्या पशुपालकांना योग्य पद्धतीने हाताळता येत आहेत.  
 
कुलकर्णी म्हणाले, की मुरघास हा दुभत्या जनावरांसाठी महत्त्वाचा आहे. एकाच वेळी मुरघास ४५ दिवस हवाबंद करून ठेवल्यावर जनावरे आवडीने खातात. त्यामुळे चारा आजिबात वाया जात नाही. मुरघासातून तीन टक्के शुष्क घटक मिळतो. दररोज जनावरांना साधारण दहा किलो मुरघास दिल्यास दूध उत्पादनात वाढ होतेच, पण जनावरांचे आरोग्य सुधारते. मका, ज्वारी, बाजरी, ओटस, गवतवर्गीय पिके, हरभरा, सोयाबीन, ल्युसर्न, बर्सिम, टाकाऊ पालेभाज्या याचा मुरघास करता येतो. या वेळी कुलकर्णी यांनी राज्यातील विविध भागांत सुरू असलेल्या मुक्तसंचार गोठा, मुरघास करण्याची प्रात्यक्षिके दाखवली. 
 

इतर ताज्या घडामोडी
ऊस गाळपात इंदापूर कारखान्याची आघाडी पुणे  : जिल्ह्यात सर्व १७ साखर कारखान्यांनी...
निवडणुकीमुळे चाराटंचाईकडे दुर्लक्ष;...पुणे  : निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना...
नाशिक जिल्ह्यात चारा छावण्यांसाठी...नाशिक  : जिल्ह्यातील टंचाईच्या झळा तीव्र होत...
सभा मोदींची; प्रशासनाने घेतली...नाशिक : लोकसभा उमेदवारांच्या प्रचारार्थ २२ एप्रिल...
नगर : पशुधन वाचविण्यासाठी इतर...नगर : जिल्ह्यात २८ लाख लहान-मोठे जनावरे आहेत....
सौर कृषिपंप योजना खोळंबलीजळगाव : सौर कृषिपंपासाठी खानदेशातून ८ हजार ९५०...
मराठवाड्यात पाणीपुरवठ्यासाठी २३५९ टँकरऔरंगाबाद : मराठवाड्यात दुष्काळामुळे होणारी...
नत्र ऱ्हास रोखण्यासोबत वाढवता येईल...शेतकरी आपल्या मक्याच्या उत्पादनांचा अंदाज...
खानदेशात पाणंद रस्त्यांची कामे ठप्पजळगाव : खानदेशात जानेवारीत मंजुरी मिळालेल्या,...
म्हैसाळची विस्तारित योजना पूर्ण करणार...जत, जि. सांगली : ‘‘जत तालुक्याच्या पूर्व भागाला...
पुणे विभागात रब्बी कांद्याचे ३६ लाख टन...पुणे   ः रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी...
गारपीट, वादळी पावसाने पुणे जिल्ह्याला...पुणे  : जिल्ह्याच्या उत्तर भागात असलेल्या...
जळगावात आले प्रतिक्विंटल २००० ते ६५००...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता...
अवकाळी पावसाने वऱ्हाडात दाणादाणअकोला   ः वऱ्हाडातील अनेक भागात...
नगर जिल्ह्यातील १२८ गावांत दूषित पाणीनगर  : ‘सर्वांना शुद्ध पाणी’ यासाठी सरकार...
आमच्या काळात एकही घोटाळा नाही :...सोलापूर : काँग्रेस आघाडी देशाला मजबूत करू...
सातारा जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी...सातारा : जिल्ह्यात मंगळवारी सकाळपासून ढगाळ...
बहुपयोगी नत्रयुक्त खत `कॅल्शिअम...सावकाश उपलब्ध होण्याच्या क्षमतेमुळे कॅल्शियम...
जल, मृद्‌संधारणासाठी पूर्वमशागत...जमिनीमध्ये चांगले पीक उत्पादन येण्याकरिता भौतिक,...
कृषी सल्ला : भुईमूग, आंबा पीक भुईमूग शेंगा अवस्था भुईमूग पीक आऱ्या...