agriculture news in marathi, lecture on export quality pomegranate, nagar, maharashtra | Agrowon

‘निर्यातक्षम उत्पादनासाठी डाळिंबाचा दर्जा सांभाळावा’
टीम अॅग्रोवन
रविवार, 25 फेब्रुवारी 2018

नगर  : डाळिंबाची सर्वच ठिकाणी लागवड वाढत आहे. अगदी देशातील प्रत्येक राज्यात डाळिंबाचे उत्पादन घेतले जात आहे. मात्र दर्जेदार उत्पादनासाठी आवश्‍यक ती काळजी घेतली जात नाही. त्यामुळे ७० टक्के डाळिंबाला दर्जा नाही. ३० टक्के दर्जेदार डाळिंबावर त्या ७० टक्‍क्‍यांचा परिणाम होत आहे. निर्यातक्षम उत्पादनासाठी उत्पादकांना डाळिंबाचा दर्जा सांभाळावा लागेल. त्यासाठी शेतकऱ्यांनी शेती, बाजार आणि उत्पादन यांचा अभ्यास करणे गरजेचे आहे. तसेच सेंद्रिय शेतीला प्राधान्य देणे आवश्यक आहे, असे मत मंगळवेढा (जि.

नगर  : डाळिंबाची सर्वच ठिकाणी लागवड वाढत आहे. अगदी देशातील प्रत्येक राज्यात डाळिंबाचे उत्पादन घेतले जात आहे. मात्र दर्जेदार उत्पादनासाठी आवश्‍यक ती काळजी घेतली जात नाही. त्यामुळे ७० टक्के डाळिंबाला दर्जा नाही. ३० टक्के दर्जेदार डाळिंबावर त्या ७० टक्‍क्‍यांचा परिणाम होत आहे. निर्यातक्षम उत्पादनासाठी उत्पादकांना डाळिंबाचा दर्जा सांभाळावा लागेल. त्यासाठी शेतकऱ्यांनी शेती, बाजार आणि उत्पादन यांचा अभ्यास करणे गरजेचे आहे. तसेच सेंद्रिय शेतीला प्राधान्य देणे आवश्यक आहे, असे मत मंगळवेढा (जि. सोलापूर) येथील प्रगतिशील डाळिंब उत्पादक व ग्रीन होरायझन फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीचे अध्यक्ष अंकुश पडवळे यांनी व्यक्त केले. 

नगरमधील सावेडीतील जॉगिंग पार्क मैदानावर सुरू असलेल्या ‘सकाळ-अॅग्रोवन कृषी प्रदर्शनात शनिवारी (ता.२४) ‘निर्यातक्षम डाळिंब उत्पादन'' या विषयावरील चर्चासत्रात श्री. पडवळे यांनी मार्गदर्शन केले.
 
ते म्हणाले, की आज शेतीविषयक दृष्टिकोन बदलला पाहिजे. गुणवत्ता, व्यवस्थापन यांचा सर्व अंगाने विचार होणे गरजेचे आहे. आम्ही गेल्या दहा वर्षांपासून डाळिंबाचे उत्पादन घेतो. आठ वर्षांपासून निर्यात करत आहोत. आता सेंद्रिय आणि रासायनिक अवशेषमुक्त शेती करण्याचा संकल्प केला आहे. यापुढे एकत्रित येऊन शेती केली तरच महत्त्व राहणार आहे. त्यामुळे गटशेतीला प्राधान्य दिले पाहिजे.
 
आम्ही एकत्रित शेती करत असल्यामुळे जागेवर बाजार मिळाला. दरवर्षी बाजारात काही काळ तेजी, काही काळ मंदी असते. डाळिंबासह कोणतेही पीक घेताना पिकवण्यासोबत बाजार ओळखता आला पाहिजे. पाणी उपलब्ध असलेल्या भागात ऊस तर दुष्काळी भागात डाळिंब घेतले जात असल्याचे सध्याचे चित्र आहे. दहा वर्षांपूर्वी अर्धा ते पाऊण किलो वजनाचे डाळिंब पिकवता येत असे. आता तीन ग्रॅमचे डाळिंब पिकवण्यासाठी कसरत करावी लागते.
 
शेतीमधील सेंद्रिय कर्ब कधीच संपून गेला आहे. शेतीच्या, पाण्याच्या आरोग्याकडे फारसे लक्ष दिले जात नाही. त्यामुळे उत्पादनात दर्जेदारपणा येत नाही. डाळिंबात आंतरपीक अजिबात घेऊ नये. त्याएेवजी सागाची लागवड करावी. यापुढे आता सेंद्रिय शेतीला प्राधान्य द्यावे लागणार आहे. आता पुण्यातील मगरपट्टा, नांदेडसिटीत माल विक्रीसाठी संधी मिळणार आहे.
 
दर्जा नसल्याने डाळिंबासह अन्य पिकांची निर्यात करता येत नाही. सध्या दहा हजार शेतकऱ्यांमागे अवघा एक शेतकरी निर्यात करत असल्याचे चित्र आहे. त्यासाठी डाळिंबाचे निर्यातक्षम, विषमुक्त उत्पादन घेण्याला प्राधान्य द्यावे लागेल. ‘सकाळ-अॅग्रोवन’चे प्रतिनिधी सूर्यकांत नेटके यांनी पडवळे यांचे स्वागत केले. सुशांत पाटील यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.

इतर ताज्या घडामोडी
अकोल्याला रब्बीसाठी हरभऱ्याचे वाढीव...अकोला  ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी...
दुष्काळाची व्यथा मांडताना महिला...निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍...
कोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या...कोल्हापूर  : खरीप पिकांची काढणी वेगात...
सोलापुरातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी आश्‍...सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची...
नगरमधील ४३३८ शेतकऱ्यांची शेतीमाल...नगर  ः आधारभूत किमतीने मूग, उडीद, सोयाबीनची...
जळगाव जिल्ह्यात ज्वारीच्या पेरणीला...जळगाव : जिल्ह्यात रब्बीतील ज्वारी पेरणीकडे...
ढगाळ वातावरणामध्ये द्राक्ष पिकात...सांगली, मिरज व सोलापूर येथील काही भागांमध्ये हलके...
हुमणी अळीचे एकात्मिक व्यवस्थापनगेल्या काही वर्षांपासून राज्याच्या विविध...
पुणे जिल्ह्यात रब्बीसाठी १९ हजार...पुणे : पुणे जिल्ह्यात रब्बी हंगामाची तयारी सुरू...
सोलापूर जिल्हा बॅंकेकडून ७० हजार...सोलापूर  : सोलापूर जिल्हा बॅंकेच्या सव्वा...
सोयाबीन खरेदी केंद्रे सुरू होईनातसातारा : जिल्ह्यात खरिप पिकांची काढणी अंतिम...
भाजीपाला सल्लासध्याच्या काळात बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, तूर, गहू, हरभरा...ज्या ठिकाणी पाण्याचा ताण बसत आहे, त्या ठिकाणी...
हाताचा नाकाशी होणाऱ्या संपर्कातूनही...न्यूमोनियाकारक जिवाणू हा नाकाला हात लावणे,...
खानदेशात खरिपातील ज्वारीची आवक सुरुजळगाव : खानदेशात अनेक भागांत ज्वारीची मळणी जवळपास...
परभणी जिल्ह्यात मुगाची उत्पादकता एकरी १...परभणी : यंदा परभणी जिल्ह्यात मुगाची सरासरी...
पुणे जिल्ह्यात चाराटंचाईपुणे   ः पुणे जिल्ह्यातील पूर्व पट्ट्यात...
नगर - मराठवाड्यात पाण्यावरून संघर्षाची...नगर ः पुरेसा पाऊस झाला नसल्याने यंदा...
‘महसूल’च्या जागेवर चाऱ्याच्या...यवतमाळ  ः पांढरकवडा व राळेगाव तालुक्‍यांतील...
सातारा जिल्ह्यात ७७३ एकरांवर तुती लागवडसातारा  ः जिल्ह्यात रेशीम शेती करण्याकडे...