agriculture news in marathi, lecture on mushroom production, pune, maharashtra | Agrowon

अळिंबी उत्पादनात महाराष्ट्र अव्वल ः डॉ. शर्मा
टीम अॅग्रोवन
बुधवार, 21 मार्च 2018
पुणे  ः डोंगराळ व पर्वतीय विभागांमध्येच अळिंबी व विशेषतः बटन अळिंबीचे उत्पादन होऊ शकते, हा समज दूर करण्यात राज्यातील अळिंबी उत्पादकांचे श्रेय अधिक आहे. अळिंबी उत्पादनात महाराष्ट्र देशामध्ये अग्रस्थानी असून हे स्थान पटकाविण्यात राज्य व पुणे परिसरातील अळिंबी उत्पादकांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली असल्याचे प्रतिपादन सोलन येथील (हिमाचल प्रदेश) अळिंबी संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ. व्ही. पी. शर्मा यांनी केले.
 
पुणे  ः डोंगराळ व पर्वतीय विभागांमध्येच अळिंबी व विशेषतः बटन अळिंबीचे उत्पादन होऊ शकते, हा समज दूर करण्यात राज्यातील अळिंबी उत्पादकांचे श्रेय अधिक आहे. अळिंबी उत्पादनात महाराष्ट्र देशामध्ये अग्रस्थानी असून हे स्थान पटकाविण्यात राज्य व पुणे परिसरातील अळिंबी उत्पादकांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली असल्याचे प्रतिपादन सोलन येथील (हिमाचल प्रदेश) अळिंबी संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ. व्ही. पी. शर्मा यांनी केले.
 
सोलन येथील अळिंबी संचालनालय आणि पुणे कृषी महाविद्यालय यांच्या वतीने अळिंबी उत्पादनाची सद्यःस्थिती, समस्या व उपाय आणि पुढील दिशा याविषयावर मंगळवारी (ता. २०) कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी ते बोलत होते.
 
कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रमोद रसाळ, भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या अळिंबी संशोधन सल्लागार समितीचे सदस्य रामदास शिंदे, डॉ. श्वेत कमल, डॉ. सतिश कुमार, डॉ. अनुपम भार, डॉ. अनिल गायकवाड, डॉ. अशोक जाधव व डॉ. विकास भालेराव उपस्थित होते. 
 
श्री. शर्मा म्हणाले, की जगात चीन सर्वाधिक अळिंबी उत्पादन घेत असून त्या देशाबरोबर स्पर्धा करण्यासाठी आपल्याला मोठा पल्ला गाठावा लागणार असून महाराष्ट्राप्रमाणेच इतरही राज्यांनी अडचणींवर मात करीत अळिंबी उत्पादनामध्ये सातत्य राखल्यास हे चित्र बदलू शकते. सध्या देशापुढे वाढती बेरोजगारी, कुपोषण, जमिनींचे ढासळते आरोग्य व उत्पादनक्षमता, उत्पादन वाढीसाठी उपलब्ध जमिनींवर वाढलेला ताण, पाणी आदी समस्या असून त्यावर अळिंबी उत्पादन हा एक रामबाण उपाय आहे. 
 
या वेळी डॉ. प्रमोद रसाळ यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अशोक जाधव यांनी केले. कार्यशाळेत अठरा जिल्ह्यांतील ८० अळिंबी उत्पादक शेतकरी सहभागी झाले होते.
टॅग्स

इतर ताज्या घडामोडी
रविवार विशेष : दावणत्या दाव्यानं असे किती जीव ओढत नेले असतील...
केंद्रीय कृषी विद्यापीठे ही काळाची गरज...देशात वातावरणावर आधरित १५ झोन आहेत. या...
श्रीमंत रानातला ‘गरीब’ प्रतिभावंत !ठकाबाबांनी जगण्यावर, कलेवर भरभरून प्रेम केले. कला...
तूर, हरभरा अनुदान मिळण्यासाठी अचूक...मुंबई : शेतकऱ्यांचे आधार क्रमांक बँक खात्यास...
पाकिस्तानात घुसूनच सर्जिकल स्ट्राइक करा...नवी दिल्ली : दहशतवादाविरोधात सर्व राजकीय पक्षांनी...
शिवजयंतीला शिवनेरी किल्ल्यावर शिववंदनापुणे : छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या...
हुतात्मा संजय राजपूत, नितीन राठोड यांना...बुलडाणा  ः काश्मीरमधील पुलवामा सेक्टरमध्ये...
जिवाणूंमुळे होतो फुफ्फुसाच्या...फुफ्फुसाच्या ट्यूमरच्या विकासामध्ये तेथील...
पाणीटंचाईची ऊस लागवडीला झळपुणे :ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या...
नगर जिल्हा परिषदेचे उद्या अंदाजपत्रकनगर : जिल्हा परिषदेची अंदाजपत्रकीय विशेष सभा...
सौरपंपांपासून साडेचार हजार शेतकरी वंचितजळगाव : मुख्यमंत्री सौरकृषिपंप योजनेच्या लाभासाठी...
सौर कृषिपंप योजनेच्या लाभार्थ्यांचा...सोलापूर : शेतकऱ्यांना सौरऊर्जेद्वारे दिवसाही...
औरंगाबादेत द्राक्ष प्रतिक्विंटल ३५०० ते...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
शिवसेना-भाजपचे युतीच्या दिशेने पुढचे...मुंबई: लोकसभा निवडणुकीतील युतीसाठी शिवसेना-...
किमान तापमानात वाढ, उन्हाळी हंगामास...महाराष्ट्रावर १०१४ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब...
पुणे विभागात हरभऱ्याची ४९ टक्केच पेरणीपुणे : पावसाळ्यात कमी पावसामुळे जमिनीत पुरेशी ओल...
शाळांमधील ४९८ खोल्या धोकादायकपुणे : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने...
मराठवाड्यात रब्बी पिकांची वाढ खुंटलीऔरंगाबाद : पाण्याचा ताण, तापमानातील चढउतार यामुळे...
अमरावतीत तूर, कापसाला मिळेना भावअमरावती : चीनकडून भारतीय सोयाबीनला वाढती...
गुलाब उत्पादकांच्या कष्टाला मिळाले फळ नाशिक : दुष्काळी परिस्थिती, कमी असलेला भाव,...