agriculture news in marathi, lecture on sugarcane production, nagar, maharashtra | Agrowon

किफायतशीर ऊस शेतीसाठी व्यवस्थापन महत्त्वाचे ः हापसे
टीम अॅग्रोवन
सोमवार, 26 फेब्रुवारी 2018
नगर  ः देशासह राज्यातील अनेक भागांत ऊस हे महत्त्वाचे पीक आहे. मात्र, आजही अनेक ठिकाणी उसाची शेती खर्चिक आहे. खर्चाच्या सहा पट उत्पादन निघाले तर ऊसशेती किफायतशीर आहे. ऊस शेती फायद्याची करायची असेल तर पाणी, खतासह पीक व्यवस्थापन महत्त्वाचे आहे, असे मत वसंतदादा पाटील शुगर इन्स्टिट्युटचे माजी संचालक, ऊसतज्ज्ञ डॉ. ज्ञानदेव हापसे यांनी व्यक्त केले. 
 
नगर  ः देशासह राज्यातील अनेक भागांत ऊस हे महत्त्वाचे पीक आहे. मात्र, आजही अनेक ठिकाणी उसाची शेती खर्चिक आहे. खर्चाच्या सहा पट उत्पादन निघाले तर ऊसशेती किफायतशीर आहे. ऊस शेती फायद्याची करायची असेल तर पाणी, खतासह पीक व्यवस्थापन महत्त्वाचे आहे, असे मत वसंतदादा पाटील शुगर इन्स्टिट्युटचे माजी संचालक, ऊसतज्ज्ञ डॉ. ज्ञानदेव हापसे यांनी व्यक्त केले. 
 
नगर येथील ‘सकाळ-अॅग्रोवन’ कृषी प्रदशर्नात शनिवारी (ता. २४) उसाचे एकरी दीडशे टन किफायतशीर उत्पादन तंत्र या विषयावर डॉ. हापसे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.  ते म्हणाले, की देशात महाराष्ट्रात उसाचे सर्वाधिक उत्पादन घेतले जात होते. नगर जिल्हाही ऊस उत्पादनात आघाडीवर होता. आता मात्र परिस्थिती बदलली आहे. व्यवस्थापनातील अडचणी उस उत्पादन वाढीला अडथळा ठरत आहेत.
 
उसाचे उत्पादन वाढीसाठी व्यवस्थापन महत्त्वाचे आहे. लागवड करताना पाच ते सात फुटाची सरी काढून दोन उसातील अंतर दोन फुटाचे राहील अशी लागवड करावी. लागवडीआधी व्यवस्थापन योग्य राहील यासाठी जमिनीची सुपीकता तपासावी. जैविक, रासायिनक व त्यासोबत सेंद्रिय कर्ब पाहणे महत्त्वाचे आहे.
 
ऊस उत्पादन घेताना ठिबकचा वापर महत्त्वाचा आहे. खताची मात्रा देताना लागवड पद्धतीचा विचार करूनच द्यावी. उसाची शेत चांगले तणमुक्त राहण्यासाठी आंतरपीक महत्त्वाचे आहे. शक्‍य तेवढा सेंद्रिय खताचा वापर केला तर जमिनीचा पोत सुधारण्याला मदत होते. पाचटाचे व्यवस्थापन महत्त्वाचे आहे. पाण्याचा काटकसरीने वापर करावा. साखर कारखान्यांच्या व्यवस्थापनात सुधारणा करण्याचीही गरज आहे. उसाची शेती करताना व्यवयाय आणि व्यापारी दृष्टिकोन महत्त्वाचा आहे. 

इतर ताज्या घडामोडी
पेरूबागेसाठी सघन लागवडीचे तंत्रपेरू बागेमध्ये उत्पादकता वाढवण्यासाठी सघन...
जळगाव बाजार समितीकडून आवाराबाहेर...जळगाव : फळे-भाजीपाला नियमनमुक्तीनंतर बाजार समिती...
जीएम ई. कोलाय जैवइंधननिर्मितीसाठी...जैवइंधनाच्या निर्मितीसाठी जनुकीय तंत्रज्ञानाने...
पुणे विभागात पाणीटंचाई वाढतेयपुणे : वाढत्या उन्हाबरोबरच पुणे विभागातील...
जळगाव जिल्ह्यातील पाणीटंचाई होतेय भीषणजळगाव  ः जिल्ह्यातील पश्‍चिम पट्ट्यात...
गनिमी काव्याने राष्ट्रीय किसान...नाशिक : राष्ट्रीय किसान महासंघातर्फे...
बीड जिल्ह्यात एक लाख क्विंटल तुरीचे...बीड  : शासनाने नाफेडमार्फत केलेल्या तूर...
पुणे जिल्ह्यात भात लागवडीसाठी...पुणे: जिल्ह्यातील भातपट्ट्यातील शेतकऱ्यांनी खरीप...
शिवसेना-भाजपच्या कुरघोडीने युतीवरचे...मुंबई : विधान परिषदेच्या सहा जागांसाठी राज्यातील...
पीककर्ज वाटप सुरू करण्याची स्वाभिमानीची...परभणी : उत्पादनात घट आल्यामुळे तसेच...
सांगली जिल्ह्यात पाणीटंचाई वाढलीसांगली : जिल्ह्यातील ताकारी, म्हैसाळ आणि टेंभू...
नांदेड विभागातील साखर कारखान्यांची...नांदेड : नांदेड विभागातील परभणी, हिंगोली, नांदेड...
नवीन ९९ लाख लाभार्थी घेतील...मुंबई : राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत आता...
नगर जिल्ह्यातील सहा ठिकाणी हरभरा खरेदी...नगर  ः खरेदी केलेला हरभरा साठवणुकीसाठी जागा...
शेतकऱ्याने तयार केली डिझेलवरची बाईकसांगली : वाढत्या पेट्रोलच्या सुटकेसाठी...
शेतकऱ्यांना फसविणारे विक्रेते,...सोलापूर : शेतकरी केंद्रबिंदू मानून...
धुळे जिल्ह्यात पूर्वहंगामी कापूस...धुळे : जिल्ह्यात पूर्वहंगामी कापूस लागवडीची...
जळगाव जिल्ह्यात खरिपासाठी मुबलक खतेजळगाव : जिल्ह्यात आगामी खरिपासाठी शेतकऱ्यांची...
सोलापुरात गाजर, काकडीचे दर वधारले,...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
कारखान्यांनी थकीत `एफआरपी' त्वरीत...सोलापूर : जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी थकवलेले...