agriculture news in marathi, legislative assembly election Shivsena, BJP two, Rashtrawadi one win | Agrowon

विधान परिषदेत शिवसेनेला 'लॉटरी'; कोकणात राष्ट्रवादी
टीम ई सकाळ
गुरुवार, 24 मे 2018

मुंबई : विधान परिषदेच्या सहा जागांसाठी झालेल्या निवडणुकीनंतर आज (गुरुवार) झालेल्या मतमोजणीत भाजप आणि शिवसेना यांनी प्रत्येकी दोन जागा जिंकल्या असून, कोकणातील जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिकेत तटकरे विजयी झाले. या निवडणुकीत काँग्रेसला मोठा फटका बसला आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजप-शिवसेनेने या निवडणुकीत बाजी मारल्याचे चित्र आहे. उस्मानाबाद-लातूर-बीड विधान परिषदेचा निकाल राखून ठेवण्यात आला आहे.

मुंबई : विधान परिषदेच्या सहा जागांसाठी झालेल्या निवडणुकीनंतर आज (गुरुवार) झालेल्या मतमोजणीत भाजप आणि शिवसेना यांनी प्रत्येकी दोन जागा जिंकल्या असून, कोकणातील जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिकेत तटकरे विजयी झाले. या निवडणुकीत काँग्रेसला मोठा फटका बसला आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजप-शिवसेनेने या निवडणुकीत बाजी मारल्याचे चित्र आहे. उस्मानाबाद-लातूर-बीड विधान परिषदेचा निकाल राखून ठेवण्यात आला आहे.

परभणीत शिवसेनेचे विप्लव बजोरिया विजयी
परभणी : परभणी - हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीचे विप्लव बाजोरिया हे ३५ मतांनी विजयी झाले आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादी कॉग्रेसचे माजी आमदार सुरेश देशमुख यांना या निवडणुकीत धक्कादायक पराभव तोंड द्यावे लागले आहे.

वर्धा-चंद्रपुरात भाजपचा विजय
वर्धा चंद्रपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधानपरिषदेसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपचे डॉ. रामदास आंबटकर हे विजयी झाले. त्यांना ५२८ मते मिळाली, तर विरोधातील काँग्रेसचे इंद्रकुमार सराफ यांना ४९१ मते मिळाली.

नाशिकमध्ये शिवसेनेकडून आघाडी, भाजपचा पराभव
नाशिक विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र दराडे यांना ४०० मते, तर राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस मनसे जनता दल आघाडीचे ऍड शिवाजी सहाणे यांना २३१ मते मिळाली. याठिकाणी भाजपने आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा दिला होता. तरीही शिवसेनेने विजय मिळविला.

अमरावतीत भाजपचे प्रवीण पोटे विजयी, काँग्रेसला केवळ १७ मते
अमरावती विधान परिषद निवडणुकीत भाजपच्या प्रवीण पोटे यांचा ४४१ मतांनी विजय झाला. आश्चर्य म्हणजे काँग्रेसला केवळ १७ मते मिळाली आहे. त्यामुळे काँग्रेसच्या मतदारांकडूनही भाजपला मतदान झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या निवडणुकीत प्रवीण पोटे यांना ४५८ मते मिळाली, जिल्हाधिकारी अभिजीत बांगर यांनी त्यांच्या विजयाची घोषणा केली.

कोकणात राष्ट्रवादीच्या अनिकेत तटकरेंचा विजय
रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग विधान परिषद मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अनिकेत तटकरे यांनी ३१४ मतांनी विजय मिळविला. अनिकेत तटकरे यांना ६२० मते मिळाली, तर शिवसेनेच्या राजीव साबळे यांना ३०६ मते मिळाली. याठिकाणी नारायण राणे यांच्या स्वाभीमानी पक्षाने तटकरे यांना पाठिंबा जाहीर केला होता.

विजयी उमेदवार
परभणी-हिंगोली

विप्लव बजोरिया (शिवसेना)

वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली
रामदास अंबटकर (भाजप)

नाशिक
नरेंद्र दराडे (शिवसेना)

अमरावती
प्रवीण पोटे (भाजप)

रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग
अनिकेत तटकरे (राष्ट्रवादी) 

इतर ताज्या घडामोडी
उरुग्वेतील गायीमधील लेप्टोस्पायरा...जगभरामध्ये प्राणी आणि मनुष्यामध्ये...
सागरी माशांच्या बिजोत्पादनाचे तंत्र...कोची येथील केंद्रीय सामुद्री मत्स्य संशोधन...
कोल्हापुरातील ११० गावांत कृत्रिम...कोल्हापूर : अनुवंशिक सुधारणा होऊन सशक्त जनावरांची...
पुणे विभागात ७३,७४० हजार हेक्टरवर...पुणे   ः  गेल्या साडेतीन महिन्यांत...
मराठवाड्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार...औरंगाबाद  : मराठवाड्याच्या दुष्काळमुक्तीसाठी...
पावसाअभावी वऱ्हाडात सोयाबीनचे उत्पादन...अकोला   ः या हंगामात वऱ्हाडात सर्वाधिक लागवड...
पुणे जिल्ह्यात महिनाभरात नऊ जणांचा...उरुळी कांचन, जि. पुणे : संपूर्ण राज्यात चिंतेचा...
मी 35-40 रूपयांनी पेट्रोल-डिझेलची...नवी दिल्ली : सध्या पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळे मोदी...
लाल मातीचा सन्मान वाढविणारे आंदळकरकोल्हापुरातील २२ जून १९७० चा म्हणजे ४८...
डी.आर. कुलकर्णी यांचे निधनपुणे : 'सकाळ'च्या पुणे आवृत्तीतील मुख्य उपसंपादक...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज जन्मदिन...भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 68 वा वाढदिवस...
देशात सर्वाधिक महाग पेट्रोल मराठवाड्यात...लातूर : गेली सलग अठरा दिवस देशात पेट्रोल आणि...
नाशिकला स्वाईन फ्ल्यूचा कहर, 24...नाशिक : नाशिक शहर आणि जिल्ह्यात स्वाईन फ्ल्युने...
आज मराठवाडा मुक्तीदिन ! संग्रामाला झाली...15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वातंत्र्य झाला...
पेट्रोल दराची शंभरीकडे वाटचाल मुंबई : महागाईच्या आगीत होरपळणाऱ्या...
वऱ्हाडात पिकांना वाढती उष्णता सोसवेनाअकोला  ः गेल्या अाठ दिवसांपासून कमाल...
शेतीमाल प्रक्रियेला चालना देण्यासाठी...भेंडा, जि. नगर  : बीव्हीजी ग्रुपने स्वच्छता...
साताऱ्यात ११७७ शेततळ्यांची कामे पूर्णसातारा  ः मागेल त्याला शेततळे योजनेतून...
इंधन दरवाढ शेतकऱ्यांच्या मुळावरऔरंगाबाद : इंधन दरवाढीचा थेट आघात आता शेतीवरही...
शेतमाल वाहतुकीच्या दरात वाढजळगाव : इंधनाचे दर दिवसागणिक वाढत आहेत. डिझेलचे...