नागपूर अधिवेशन
नागपूर अधिवेशन

भिडे यांना अटक करण्याची मागणी

नागपूर : संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज यांच्यापेक्षा मनूचे विचार श्रेष्ठ आहेत, असे म्हणणाऱ्या मनोहर ऊर्फ संभाजी भिडे यांच्या वक्तव्याचा निषेध करत त्यांना अटक करण्याची मागणी विधानसभेत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे आणि अजित पवार यांनी केली. या वेळी त्यांनी संताप व्यक्त करत सरकारच्या बोटचेपी धोरणमुळे अशा प्रवृत्ती वाढल्या असल्याचा आरोप केला. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी चौकशी करून संविधान विरोधी वक्तव्य असेल तर कारवाई करू, असे जाहीर केले.

संभाजी भिडे संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्‍वर महाराज यांच्यापेक्षा मनू श्रेष्ठ होता, असे बेताल वक्तव्य करतात, हे पुरोगामी महाराष्ट्रासाठी चुकीचे असून, महाराष्ट्रातील जनता कदापि खपवून घेणार नाही. यामागचा मास्टरमाइंड कोण आहे, हे स्पष्ट करावे. संभाजी भिडे यांना तत्काळ अटक करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षनेते अजित पवार यांनी औचित्याच्या मुद्द्याद्वारे सभागृहात केली.

सरकारच्या बोटचेप्या भूमिकेमुळे भिडे यांची हिंमत एवढी वाढली आहे, की संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्‍वर महाराज यांच्यापेक्षा मनू एक पाऊल पुढे होता, असे त्यांनी जाहीर केले. संभाजी भिडे यांची सरकार सातत्याने पाठराखण करते; याचा अर्थ सरकार त्यांच्याशी सहमत आहे. मनुस्मृतीचे श्रेष्ठत्व सरकारला मान्य असेल, तर मग अधिवेशन सुरू आहे, कायदा करा आणि मनुस्मृती भारताच्या संविधानापेक्षा एक पाऊल पुढे असल्याचे जाहीर करून टाका, अशी टीका राधाकृष्ण विखे पाटील यांनी या वेळी केली.

राज्य सरकारची भूमिका संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्‍वर महाराज यांचे विचार आणि संविधानाने बांधलेली आहे. मनूचे विचार कुठल्याही स्तरावर आम्हाला मान्य नाहीत. भिडे जे बोलले  ते तपासले जाईल आणि त्यात संविधान विरोधी काही असेल तर कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com