agriculture news in marathi, legislative council elections results on Thursday | Agrowon

विधानपरिषदेच्या चार जागांचा गुरुवारी निकाल
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 26 जून 2018

मुंबई : विधानपरिषदेच्या मुंबई पदवीधर, मुंबई शिक्षक, कोकण पदवीधर आणि नाशिक शिक्षक मतदार संघात सोमवारी मतदान झाले. मुंबई पदवीधर मतदारसंघात ५३.२३टक्के, मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी ८३.२६, कोकण पदवीधर मतदार संघात ७३.८९ तर नाशिक शिक्षक मतदार संघात ९२.३० टक्के मतदान झाले. येत्या २८ तारखेला याठिकाणी मतमोजणी होणार आहे.

मुंबई : विधानपरिषदेच्या मुंबई पदवीधर, मुंबई शिक्षक, कोकण पदवीधर आणि नाशिक शिक्षक मतदार संघात सोमवारी मतदान झाले. मुंबई पदवीधर मतदारसंघात ५३.२३टक्के, मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी ८३.२६, कोकण पदवीधर मतदार संघात ७३.८९ तर नाशिक शिक्षक मतदार संघात ९२.३० टक्के मतदान झाले. येत्या २८ तारखेला याठिकाणी मतमोजणी होणार आहे.

कोकणासह मुंबई आणि उपनगरात जोरदार पाऊस असतानाच विधानपरिषदेच्या मुंबई पदवीधर, मुंबई शिक्षक, कोकण पदवीधर आणि नाशिक शिक्षक मतदार संघाच्या निवडणूकीसाठी भरघोस मतदान झाले. मुंबई आणि उपनगरात पाऊस असतानाही ५३.२३टक्के मतदान झाले. तर चुरशीच्या समजल्या जाणार्या मुंबई शिक्षक मतदार संघात ८३.२६ एवढ्या मोठ्या प्रमाणात मतदान झाले. कोकण पदवीधरसाठी ७३.८९ तर नाशिक शिक्षक मतदार संघात सर्वाधिक ९२.३० टक्के मतदान झाले.

मुंबई पदवीधर मतदार संघातुन शिवसेनेचे विलास पोतनीस, भाजपाचे अॅड.अमित मेहता, आघाडी आणि शेकापचे अॅड. राजेंद्र कोरडे, अपक्ष उमेदवार दिपक पवार, महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष आणि मनसेचे पुरस्कृत उमेदवार राजू बंडगर यांच्यासह १२ उमेदवार रिंगणात आहेत. या मतदार संघात एकूण ७४ हजार मतदार होते. मुंबई शिक्षक मतदार संघात लोकभारतीचे विद्यमान आमदार कपिल पाटील, भाजपा पुरस्कृत अनिल देशमुख आणि शिवसेनेचे शिवाजी शेंडगे यांच्यासह एकूण १० उमेदवार आपले नशीब अजमावित आहेत. कोकण पदवीधर मतदार संघात भाजपाचे निरंजन डावखरे, राष्ट्रवादीचे नजीब मुल्ला, शिवसेनेचे संजय मोरे यांच्यात खरी लढत आहे. नाशिक शिक्षक मतदार संघात भाजपाचे अनिकेत पाटील, शिवसेना पुरस्कृत किशोर दराडे, आघाडी पुरस्कृत संदिप बेडसे यांच्यासह १६ उमेदवार रिंगणात आहेत.

प्रथमच मोठ्या प्रमाणात झालेल्या मतदानामुळे मतदारांनी कोणाला कौल दिला हे येत्या २८ तारखेला होणार्या मतमोजणीतून स्पष्ट होईल.

इतर ताज्या घडामोडी
संघर्ष गोकुळ ‘मल्टिस्टेट’चाकोल्हापूर जिल्हा दूध संघ (गोकुळ) मल्टिस्टेट...
'दारुमुळे दरवर्षी अडीच लाखापेक्षा जास्त...नवी दिल्ली- दारूमुळे दरवर्षी जवळपास अडीच...
जालन्यात पाण्यात बुडून तिघांचा मृत्यूजालना : गणपती बाप्पांचे विसर्जन करताना जालना...
शिखर, रोहितने पाकला धुतले; भारत अंतिम...दुबई : पाकिस्तानने उभारलेल्या 237 धावांचा सहजी...
खानदेशात मध्यम पाऊस; नंदुरबारला हुलकावणीजळगाव : खानदेशात शुक्रवारी (ता.२१) मध्यरात्री व...
पुणे जिल्ह्यात ढगाळ हवामानपुणे  : जिल्ह्यात आठवड्याच्या सुरवातीला...
खानापूर घाटमाथ्यावर तीव्र पाणीटंचाई सांगली  : घाटमाथ्यावर पावसाने ओढ दिली आहे....
नगर जिल्ह्यात साडेसहा लाख हेक्‍टरवर...नगर  ः जिल्ह्यात रब्बी हंगामात सहा लाख ५२...
कौशल्यावर आधारित उपक्रम ‘रयत’मध्ये सुरू...सातारा  ः केवळ पुस्तकी नव्हे तर कौशल्यावर...
नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचा अकोला...अकोला  ः नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या...
सांगली जिल्ह्यात पाणीप्रश्‍न पेटण्याची...सांगली  : पावसाने दिलेली उघडीप आणि पावसाळा...
अकोला, बुलडाण्यात सर्वदूर पाऊसअकोला   ः वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा या...
सावधान... अल्झायमर आला उंबरठ्यावर ! कोल्हापूर : मंगळवार पेठेतल्या विठ्ठल मंदिरात रोज...
परभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ६०० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला...
भातावरील तुडतुडे प्रादुर्भावाकडे...सध्या खरीप हंगामातील भात पीक बहुतेक ठिकाणी...
कमी तीव्रतेच्या वणव्यांचाही मातीच्या...कमी तीव्रतेचे वणवे किंवा मर्यादित प्रमाणात...
ढगाळ वातावरणाने खानदेशात सोयाबीन मळणीला...जळगाव : खानदेशातील धुळे, नंदुरबार व जळगाव...
माळेगावकरांचा औद्योगिक वसाहतीच्या...नाशिक : माळेगाव औद्योगिक वसाहतीच्या टप्पा क्रमांक...
परभणीत व्यापाऱ्यांचे असहकार आंदोलन सुरूचपरभणी ः परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत...
सांगली जिल्ह्यात द्राक्ष क्षेत्रात वाढसांगली  ः दर्जेदार द्राक्ष उत्पादनासाठी...