जळगावात लिंबू २२०० ते ५००० रुपये प्रतिक्विंटल
जळगावात लिंबू २२०० ते ५००० रुपये प्रतिक्विंटल

जळगावात लिंबू २२०० ते ५००० रुपये प्रतिक्विंटल

जळगाव  : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता.२२) लिंबाची चार क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल २२०० ते ५००० व सरासरी ३१५० रुपये दर मिळाला. आवक पाचोरा, जामनेर, यावल भागातून होत आहे. आवक सुमारे दोन महिन्यांपासून कमी असून, उठाव चांगला असल्याची माहिती मिळाली. 

बाजारात बुधवारी आंब्याची ३५ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल ३५०० ते ५००० व सरासरी ३००० रुपये दर मिळाला. आल्याची २५ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल ३००० ते ७००० व सरासरी ४५०० रुपये दर मिळाला. बीटची १५ क्विंटल आवक झाली. दर १५०० रुपये प्रतिक्विंटल मिळाला. कलिंगडाची १५ क्विंटल आवक झाली. त्यास ४०० ते १००० व सरासरी ६०० रुपये दर होता. बटाट्याची ३५० क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल ४५० ते ११०० व सरासरी ७०० रुपये दर होता. भेंडीची सात क्विंटल आवक झाली. तिला प्रतिक्विंटल १००० ते ३००० व सरासरी १५०० रुपये दर मिळाला. कारल्याची चार क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल १५०० ते ३५०० व सरासरी २२०० रुपये दर मिळाला. 

लाल कांद्याची १२०० क्विंटल आवक, तर दर ३०० ते ८२५ व सरासरी ५५० रुपये, कोबीची १२ क्विंटल आवक, तर दर १००० ते २२०० व सरासरी १५०० रुपये, चवळीची दोन क्विंटल आवक, तर दर ३२०० रुपये, पालकाची ११ क्विंटल आवक, तर दर  प्रतिक्विंटल ६०० ते १५०० व सरासरी ८०० रुपये दर राहिला. गाजराची आठ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल ६०० ते १२०० व सरासरी ८०० रुपये दर मिळाला.

मेथीची चार क्विंटल आवक झाली. तिला प्रतिक्विंटल २००० ते ५००० व सरासरी ३००० रुपये दर मिळाला. हिरव्या मिरचीची २५ क्विंटल आवक झाली. तिला प्रतिक्विंटल १५०० ते ३५०० व सरासरी २१०० रुपये दर मिळाला. गिलक्‍यांची दोन क्विंटल आवक झाली. गिलक्‍यांना प्रतिक्विंटल ३००० रुपये दर मिळाला. कोथिंबीरची पाच क्विंटल आवक झाली. तिला प्रतिक्विंटल २२०० ते ५५०० व सरासरी ३५०० रुपये दर मिळाल्याची माहिती बाजार समितीतील सूत्रांनी दिली. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com