बिबट्याच्या हल्ल्यात शेतमजूर जखमी

बिबट्याच्या हल्ल्यात शेतमजूर जखमी
बिबट्याच्या हल्ल्यात शेतमजूर जखमी

जळगाव : बिबट्याच्या हल्ल्यात बोदवड (जि. जळगाव) तालुक्‍यातील एक शेतमजूर गंभीर जखमी झाला आहे. त्यास उपचारार्थ खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. मन्साराम भागले (रा. कुसुंबा) असे जखमी शेतमजुराचे नाव आहे. ते कुऱ्हा हरदो शिवारात शेतात काम करीत असताना सोमवारी (ता. 14) सकाळी त्यांच्यावर हल्ला करून बिबट्या नजीकच्या जंगलात पसार झाला. ही घटना घडताच मोठी गर्दी शेतात झाली. इतर शेतकरी घटनास्थळी येताच बिबट्या पसार झाला. यासंदर्भात प्रत्यक्षदर्शी शेतकरी व इतरांनी लागलीच वन विभागाला माहिती दिली. लागलीच वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. हा बिबट्या सुमारे तीन वर्षांचा आहे. ते रस्ता भरकटून कुऱ्हा हरदो भागात दाखल झाला. हाच बिबट्या या परिसरातील एका झाडावर जाऊन बसल्याचेही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. बिबट्या वन विभागातील कर्मचाऱ्यांनाही दिसला. त्याला नजीकच्या जंगलात कर्मचाऱ्यांनी हुसकावले. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com