agriculture news in marathi, leopard, Junnar, Pune | Agrowon

सहजीवन प्राेत्साहन याेजनेबाबत अहवाल मागितला
टीम अॅग्रोवन
रविवार, 4 फेब्रुवारी 2018

पुणे : शेतकरी - बिबट्या संघर्ष कमी करण्यासाठी सहजीवन प्राेत्साहन याेजनेबाबत अहवाल सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वन विभागाच्या सचिवांना दिले आहेत. खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी याबाबत मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली हाेती. 

पुणे : शेतकरी - बिबट्या संघर्ष कमी करण्यासाठी सहजीवन प्राेत्साहन याेजनेबाबत अहवाल सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वन विभागाच्या सचिवांना दिले आहेत. खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी याबाबत मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली हाेती. 

उत्तर पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, खेड आणि शिरूर तालुक्यांमध्ये गेली अनेक वर्षांपासून शेतकरी - बिबट्या संघर्ष सुरू असून, या संघर्षामध्ये अनेक शेतकऱ्यांचे प्राण गमवावे लागले आहेत. वाढत्या सिंचन सुविधांमुळे ऊस क्षेत्राबराेबरच साखर कारखान्यांची संख्या वाढत आहे. वाढत्या ऊस क्षेत्रामुळे जंगलामध्ये वास्तव्य असणाऱ्या बिबट्यांच्या अनेक पिढ्या उसातच स्थिरावल्या आहेत. परिणामी, बिबट्याचा मानव वस्तीतील वावर वाढला असून, भक्ष्यासाठी बिबट्यांकडून मानवाबराेबरच पशुधनावर देखील हल्ले वाढले आहेत.

वनांचे घटणारे क्षेत्र आणि ऊस शेतीचे वाढणारे क्षेत्र हे या समस्येचे मूळ कारण ठरले असून, हा संघर्ष कमी करण्यासाठी बिबटप्रवण क्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार अनुदान द्यावे. यामधील १२ हजार ५०० रुपयांचा ५० टक्के वाटा संबंधित साखर कारखान्यांकडून घ्यावी असे सुचविण्यात आले आहे. खासदार आढळराव यांच्या मागणीची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी वन विभागाच्या सचिवांना अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

इतर ताज्या घडामोडी
ऊस गाळपात इंदापूर कारखान्याची आघाडी पुणे  : जिल्ह्यात सर्व १७ साखर कारखान्यांनी...
निवडणुकीमुळे चाराटंचाईकडे दुर्लक्ष;...पुणे  : निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना...
नाशिक जिल्ह्यात चारा छावण्यांसाठी...नाशिक  : जिल्ह्यातील टंचाईच्या झळा तीव्र होत...
सभा मोदींची; प्रशासनाने घेतली...नाशिक : लोकसभा उमेदवारांच्या प्रचारार्थ २२ एप्रिल...
नगर : पशुधन वाचविण्यासाठी इतर...नगर : जिल्ह्यात २८ लाख लहान-मोठे जनावरे आहेत....
सौर कृषिपंप योजना खोळंबलीजळगाव : सौर कृषिपंपासाठी खानदेशातून ८ हजार ९५०...
मराठवाड्यात पाणीपुरवठ्यासाठी २३५९ टँकरऔरंगाबाद : मराठवाड्यात दुष्काळामुळे होणारी...
नत्र ऱ्हास रोखण्यासोबत वाढवता येईल...शेतकरी आपल्या मक्याच्या उत्पादनांचा अंदाज...
खानदेशात पाणंद रस्त्यांची कामे ठप्पजळगाव : खानदेशात जानेवारीत मंजुरी मिळालेल्या,...
म्हैसाळची विस्तारित योजना पूर्ण करणार...जत, जि. सांगली : ‘‘जत तालुक्याच्या पूर्व भागाला...
पुणे विभागात रब्बी कांद्याचे ३६ लाख टन...पुणे   ः रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी...
गारपीट, वादळी पावसाने पुणे जिल्ह्याला...पुणे  : जिल्ह्याच्या उत्तर भागात असलेल्या...
जळगावात आले प्रतिक्विंटल २००० ते ६५००...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता...
अवकाळी पावसाने वऱ्हाडात दाणादाणअकोला   ः वऱ्हाडातील अनेक भागात...
नगर जिल्ह्यातील १२८ गावांत दूषित पाणीनगर  : ‘सर्वांना शुद्ध पाणी’ यासाठी सरकार...
आमच्या काळात एकही घोटाळा नाही :...सोलापूर : काँग्रेस आघाडी देशाला मजबूत करू...
सातारा जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी...सातारा : जिल्ह्यात मंगळवारी सकाळपासून ढगाळ...
बहुपयोगी नत्रयुक्त खत `कॅल्शिअम...सावकाश उपलब्ध होण्याच्या क्षमतेमुळे कॅल्शियम...
जल, मृद्‌संधारणासाठी पूर्वमशागत...जमिनीमध्ये चांगले पीक उत्पादन येण्याकरिता भौतिक,...
कृषी सल्ला : भुईमूग, आंबा पीक भुईमूग शेंगा अवस्था भुईमूग पीक आऱ्या...