agriculture news in marathi, leopard, junnar, pune | Agrowon

शेतकरी-बिबट्या सहजीवन प्राेत्साहन याेजना व्यवहार्य नाही
टीम अॅग्रोवन
बुधवार, 7 फेब्रुवारी 2018

पुणे ः शेतकरी-बिबट्या संघर्ष कमी करण्यासाठी सहजीवन अनुदान प्राेत्साहन याेजना व्यवहार्य नसून, शेतकऱ्यांच्या स्वसंरक्षणासाठीच्या करावयाच्या उपाययाेजनांसाठी सरकारनेच अनुदान द्यावे, असा सूर साखर उद्याेगाकडून व्यक्त हाेत आहे. तर या याेजनेसाठी पुणे जिल्ह्यासाठी साखर उद्याेगावर १५० काेटींचा अतिरिक्क बाेजा पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

पुणे ः शेतकरी-बिबट्या संघर्ष कमी करण्यासाठी सहजीवन अनुदान प्राेत्साहन याेजना व्यवहार्य नसून, शेतकऱ्यांच्या स्वसंरक्षणासाठीच्या करावयाच्या उपाययाेजनांसाठी सरकारनेच अनुदान द्यावे, असा सूर साखर उद्याेगाकडून व्यक्त हाेत आहे. तर या याेजनेसाठी पुणे जिल्ह्यासाठी साखर उद्याेगावर १५० काेटींचा अतिरिक्क बाेजा पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

पुणे जिल्ह्यात शेतकरी बिबट्या संघर्ष दिवसेंदिवस वाढत आहे. वाढत्या सिंचन सुविधांमुळे ऊस क्षेत्रात गेल्या अनेक वर्षांत माेठी वाढ झाली आहे. यामुळे जंगलातील बिबट्या ऊस शेतीत स्थिरावल्यामुळे शेतकरी-बिबट्या सहजीवन ठरत असून, या सहजीवनात संघर्षदेखील वाढत आहे. यामुळे हा संघर्ष कमी करण्यासाठी करावयाच्या उपाययाेजनांमध्ये शेतकरी-बिबट्या सहजीवन प्राेत्साहन याेजना राबवावी आणि या याेजनेअंतर्गत प्रतिहेक्टरी २५ हजार रुपयांचे अनुदान शेतकऱ्यांना द्यावे, अशी मागणी खा.शिवाजीराव आढळराव पाटील यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

या मागणीबाबत बाेलताना विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर म्हणाले, ‘‘या याेजनेअंतर्गत साखर कारखान्यांकडून १२ हजार ५०० रुपये शेतकऱ्यांना देण्यात यावेत, असे सुचविण्यात आले आहे. पण शेतकऱ्यांचेच पैसे शेतकऱ्यांना द्यायचे का, असा प्रश्‍न उपस्थित करून, सरकारनेच शेतकऱ्यांच्या संरक्षणासाठी अनुदानाची सर्व रक्कम द्यावी. एकीकडे साखर कारखानदारी विविध कारणांनी अडचणीत असताना, या याेजनेतील अनुदानाच्या रकमेचा बाेजा कारखान्यांवर पडेल. परिणामी कारखानदारी आणखी अडचणीत येईल.’’ 

दृष्टिक्षेपात याेजना 

  • या याेजनेअंतर्गत पुणे जिल्‍ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान द्यावयाचे झाल्यास सुमारे ३०० काेटींचा खर्च अपेक्षित असून, यामधील ५० टक्के साखर कारखान्यांना द्यायचे झाल्यास सुमारे १५० काेटी 
  • कारखान्यांंवर बाेजा पडणार आहे. पुणे जिल्ह्याचे उसाचे क्षेत्र सुमारे दीड लाख हेक्टर आहे. 
  • विघ्नहरवर १३ काेटींचा बाेजा 
  • ही याेजना लागू झाल्यास विघ्नहर साखर कारखान्यावर सुमारे १३ काेटींचा बाेजा पडण्याची शक्यता आहे. विघ्नहरअंतर्गत २६ हजार एकर क्षेत्रावर उसाची लागवड असून, (सुमारे १० हजार हेक्टर) यानुसार प्रतिहेक्टरी १२ हजार ५०० रुपयांनी सुमारे १३ काेटींचे अनुदान कारखान्याच्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना द्यावे लागणार आहे.
  • ३० शेतकरी, तर ५ हजार पशुधनाचा बळी 
  • शेतकरी बिबट्या संघर्षात २००० ते २०१८ या १८ वर्षांमध्ये ३० जणांचा मत्यू तर सुमारे ५ हजार पशुधनांच मृत्यू झाला आहे. हा संघर्ष दिवसेंदिवस वाढत असून, बिबट्यांच्या हल्ल्यांच्या घटना सातत्याने घडत आहेत.

इतर ताज्या घडामोडी
I transfer my JOSH to you...पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी...
जीवलग मित्र गेला...मनोहर गेला. हे जरी सत्य असले तरी ते मान्य होणे...
जबरदस्त, प्रभावी इच्छाशक्तीचे केंद्र :...लहानपणापासूनच कुठलीही गोष्ट एकदा ठरवली की, तो ती...
तळपत्या सूर्याचा अस्त !राजकारणी माणसाला यश आणि अपयशाचा सामना रोजच करावा...
विदर्भात कापूस पोचला प्रतिक्विंटल ५९१५...नागपूर ः शेतकऱ्यांकडील कापूस संपल्यापनंतर आता...
पुणे बाजारात घेवडा, मटारच्या भावात वाढपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
पुणे जिल्ह्यात शेतकरी सन्मान योजनेच्या...पुणे : केंद्र सरकारने पंतप्रधान शेतकरी सन्मान...
हिंगोलीतील २७ हजार लोकसंख्या पाण्यासाठी...हिंगोली ः हिंगोली जिल्ह्यात उद्भवलेल्या दुष्काळी...
खानदेशात चारा प्रश्‍न गंभीरजळगाव ः खानदेशात सद्यःस्थितीत निर्माण झालेल्या...
दुष्काळमुक्त मराठवाड्याचा संकल्प ः...औरंगाबाद: पन्नास टीएमसी पाणी गोदावरी खोऱ्यात...
छपन्न इंचीच्या छातीच्या गप्पा कशाला?ः...चाकण, जि. पुणे: देशाचे पंतप्रधान देश माझ्या मुठीत...
योग्य पद्धतीनेच करा बांबू तोडणीपरिपक्व बांबू हा दरवर्षी तोडला पाहिजे, तरच त्याला...
औरंगाबादला कैरी प्रतिक्विंटल ३५०० ते...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
कृषी क्षेत्रात निर्मिती उद्योगाच्या...अकोला : कृषी क्षेत्रात बायोफर्टिलायजर,...
खानदेशात भुईमूग पीक जेमतेमजळगाव : भुईमुगाचे पीक खानदेशात जेमतेम आहे. त्याचे...
सोलापूर जिल्हा बॅंकेतही मिळणार ‘सन्मान...सोलापूर : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचा...
लाल कांद्याच्या दरात सुधारणाजळगाव : लाल कांद्याची जळगावसह धुळे, साक्री येथील...
प्रस्तावित सुरत-हैदराबाद...नाशिक : केंद्राच्या भारतमाला योजनेंतर्गत...
शेवगाव, पाथर्डीत शेळ्या-मेंढ्यांच्या...शेवगाव, जि. नगर : दुष्काळी परिस्थितीत सरकारने...
सांगलीचा प्रश्‍न दिल्लीदरबारीसांगली ः सांगली लोकसभा मतदारसंघ स्वाभिमानीला...