तीन जिल्ह्यात सप्टेंबरमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस

परभणीत पाऊस कमी
परभणीत पाऊस कमी
परभणी ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत यंदाच्या सप्टेंबर महिन्यात पावसाने सरासरी गाठली नाही. तीन जिल्ह्यांतील ३४ मंडळांमध्ये जून ते सप्टेंबर या कालावधीत अपेक्षित पावसाच्या ५० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला आहे. गतवर्षीच्या सप्टेंबर महिन्यात या तीनही जिल्ह्यांत पावसाने सरासरी ओलांडली होती.
 
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत सप्टेंबर महिन्यात पडणाऱ्या पावसाची सरासरी अनुक्रमे १९७.२, १८०.७, १६०.१ मिमी आहे; परंतु यंदा नांदेडमध्ये ६५.३१ मिमी (३३.१ टक्के), परभणीत ८८.३ मिमी (४८.९ टक्के), हिंगोलीत ९७ मिमी (६०.६ टक्के) पाऊस झाला. २०१६ मधील सप्टेंबर महिन्यात नांदेड जिल्ह्यात ३०१,  परभणी जिल्ह्यात ३१४.७० आणि हिंगोली जिल्ह्यात २१६.९ मिमी पाऊस झाला होता.
 
यंदाच्या पावसाळ्यामध्ये नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील ३४ मंडळांमध्ये आजवर अपेक्षित सरासरी पावसाच्या ५० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला आहे. यामध्ये नांदेड जिल्ह्यातील मातुल मंडळामध्ये ४९.४, खानापूर ४१.७, मरखेल ३१.६, मालेगाव ४४.५,  हानेगाव ३१.१, इस्लापूर ३३, शिवणी ४४.६ , दहेली ४७.८ , हिमायतनगर ४५, जवळगांव ४५.९, माहूर ४५, वानोळा ४३.१, सिंदखेड ३८.१, नरसी४७.७, मांजरम येथे ४२ टक्के पाऊस झाला आहे. एकूण १४ मंडळांचा यात समावेश आहे.
 
परभणी जिल्ह्यातील पिंगळी मंडळामध्ये ४२.१, महातपुरी ४९.६, माखणी ४८.४, राणीसावरगाव ४४.८, बाभळगाव ३७.९, हादगाव ३५.६, आडगाव ४२.१, चारठाणा ३८.८, चाटोरी ३०.९, बनवस ४४.५ टक्के एकूण १० मंडळे.
हिंगोली जिल्ह्यातील खंबाळा मंडळामध्ये ४१, वाकोडी ३०.९, नांदापूर ३५.६, डोंगरकडा ४४.८, वारंगा ४१.५, गिरगाव ३८.८, टेंभूर्णी ४८.३ टक्के पाऊस झाला आहे.
 
परभणी जिल्ह्यातील  परभणी, परभणी ग्रामीण, पेडगाव, जांब, सिंगणापूर, दैठणा, पाथरी, बोरी, ताडकळस, लिमला, चिकलठाणा, आवलगाव, केकरजवळा या १४ मंडळांमध्ये ५० ते ७० टक्के पाऊस झाला आहे. झरी, गंगाखेड, जिंतूर, सावंगी म्हाळसा, बामणी, पूर्णा, चुडावा, पालम, सेलू, देऊळगाव, वालूर, कुपटा,सोनपेठ, मानवत, कोल्हा या मंडळांमध्ये आजवर अपेक्षित पावसाच्या ७० टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस झाला आहे.
 
परभणी जिल्ह्यात गेल्या सहा वर्षात यंदाच्या सप्टेंबर महिन्यात नीचांकी पाऊस झाला आहे. सप्टेंबर महिन्यात २०१२ मध्ये १५९.३ , २०१३ मध्ये १७७.५, २०१४ मध्ये ८९.४८, २०१५ मध्ये १३९.६४, २०१६ मध्ये ३१४.७० तर यंदा ८८.३ मिलिमीटर पाऊस झाला. २०१६ वर्षाचा अपवाद वगळता गेल्या सहा वर्षात पावसाने एकदाही सप्टेंबर महिन्यातील सरासरी गाठलेली नाही. यंदा सप्टेंबर महिन्यात पावसाने सहा वर्षातील नीचांक प्रस्थापित केला आहे.
 
यंदाच्या पावसाळ्यात जून ते सप्टेंबर या कालावधीत अपेक्षित पावसाची तुलना केली असता नांदेड जिल्ह्यात ५७४. ६ (६४.९), परभणी जिल्ह्यात ४७६.१ (६५.८), हिंगोली जिल्ह्यात ३७२.४ मिमी (६८.१ टक्के) पाऊस झाला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com