agriculture news in marathi, less duration cotton to be introduced this year | Agrowon

राज्यात यावर्षी कमी कालावधीचेच कापूस वाण
विनोद इंगोले
बुधवार, 14 फेब्रुवारी 2018

नागपूर : राज्यात गेल्यावर्षी कापसावर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव झाल्याच्या परिणामी येत्या हंगामात कमी कालावधीत परिपक्‍व होणाऱ्या कापूस वाणांच्या लागवडीला प्रोत्साहन देण्याचा निर्णय कृषी विभागाने घेतला आहे. त्याकरिता सविस्तर आराखडा तयार करण्यात आला असून त्याची नियोजनबद्ध अंमलबजावणीदेखील केली जाणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

नागपूर : राज्यात गेल्यावर्षी कापसावर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव झाल्याच्या परिणामी येत्या हंगामात कमी कालावधीत परिपक्‍व होणाऱ्या कापूस वाणांच्या लागवडीला प्रोत्साहन देण्याचा निर्णय कृषी विभागाने घेतला आहे. त्याकरिता सविस्तर आराखडा तयार करण्यात आला असून त्याची नियोजनबद्ध अंमलबजावणीदेखील केली जाणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

राज्यात कपाशी लागवडीखाली सुमारे ४० ते ४२ लाख हेक्‍टर क्षेत्र आहे. गेल्यावर्षीच्या खरिपात यातील बहूतांश क्षेत्रावर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव झाला. तिच्या नियंत्रणाच्या प्रयत्नात यवतमाळ जिल्ह्यात २३ शेतकरी, शेतमजुरांचे जीव गेले. तर राज्यात फवारणी दरम्यान विषबाधा होऊन मरण पावलेल्यांची संख्या ५१ वर पोचली. या संदर्भाने करण्यात आलेल्या चौकशीत शेतकऱ्यांद्वारे घेतली जाणारी फरदड (खोडवा) त्यासोबतच परिपक्‍व होण्यास अधिक कालावधी घेणारे वाण, यामाध्यमातून बोंड अळीचा जीवनक्रम पूर्ण होण्याच्या कालावधीत तीला पूरक खाद्याची उपलब्धता  झाली. 

 परिणामी येत्या हंगामात परिपक्‍व होण्यास अधिक कालावधी घेणाऱ्या वाणांना परवानगी न देणे किंवा कमी कालावधीत येणाऱ्या वाणांना प्रोत्साहन देण्याचा निर्णय कृषी विभागाने घेतला आहे. महाबीज तसेच खासगी कंपन्यांना आवाहन करीत त्यांच्याकडून कमी कालावधीत परिपक्‍व होणाऱ्या कापूस वाणांची यादी मागविण्यात आली. याच वाणांना येत्या खरिपात हंगामात कृषी सेवा केंद्रापर्यंत पोचविले जाणार आहे. यामाध्यमातून बोंड अळीचा जीवनक्रम ‘ब्रेक’ केला जाईल. 

बियाणे पाकिटावर नोंदणी आवश्यक 
अवर मुख्य सचिव विजयकुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोन्सॅटोचे बीजी-२ तंत्रज्ञान कुचकामी ठरत असल्याचे बियाणे कंपन्या सांगतात. त्याकरिता तंत्रज्ञान शुल्क रद्द करण्याची मागणी त्यांच्याद्वारे केली जात आहे. परंतु, याचवेळी कंपन्या मात्र बिटी बियाणे पाकिटाचे दर कमी करण्यास तयार नाहीत. त्यामुळे यावर्षीच्या हंगामात बियाणे पुरवताना पाकिटावर बों डअळीला हे बियाणे प्रतिकारक नाही; तसेच परिपक्‍व होण्यास १८० दिवसांपेक्षा अधिकचा कालावधी लागणार नाही असे नोंदविण्याचे आदेश कंपन्यांना देण्यात आले आहेत. साहजिकच शेतकरी आपल्यास्तरावर उपाययोजना करण्यास सज्ज असतील. 

कंपन्यांकडे कमी कालावधीत परिपक्‍व होणाऱ्या वाणांची यादी मागविण्यात आली होती. त्यांच्याकडून ती प्राप्त झाली आहे. यादीतील वाण परिपक्‍व होण्यास १८० दिवसांपेक्षा अधिकचा कालावधी लागणार नाही, असे कंपन्यांनी सांगीतले. याच वाणांना प्रोत्साहन दिले जाईल. कृषी विभागामार्फत तसे आवाहनदेखील केले जाणार आहे.
- विजय कुमार, अवर मुख्य सचिव (कृषी)

इतर अॅग्रो विशेष
परभणी, राहुरी कृषी विद्यापीठांना पाच...परभणी ः भारतीय कृषी संशोधन परिषदअंतर्गत कृषी...
कोकण, मध्य महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम...पुणे : पावसाला पोषक हवामान झाल्याने आठवड्याच्या...
‘आरएसएफ’च्या मूळ सूत्रात घोडचूकपुणे: शेतकऱ्यांना हक्काचा ऊसदर मिळवून देणाऱ्या...
साखर कारखान्यांची धुराडी आजपासून पेटणारपुणे: राज्यातील साखर कारखान्यांच्या गाळप हंगामाला...
सहकारी बॅंकांना एकाच छताखाली आणणार :...पुणे ः सहकार क्षेत्राला ‘अच्छे दिन’ आणण्यासाठी...
चला मिरचीच्या आगारात राजूरा बाजारात...मिरचीचे आगार अशी ओळख अमरावती जिल्ह्यातील राजूरा...
‘एसआरटी’ तंत्राने मिळाली उत्पादनासह...पेंडशेत (ता. अकोले, जि. नगर) या कळसूबाई शिखराच्या...
तुटवड्यामुळे कांद्याच्या दरात सुधारणानवी दिल्ली ः देशातील महत्त्वाच्या कांदा उत्पादक...
कृषी विद्यापीठांचे संशोधन आता एका...मुंबई ः राज्यातील चारही कृषी विद्यापीठांनी केलेले...
महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांना...शिर्डी: महाराष्ट्रात यंदा पाऊस कमी झाला....
कोल्हापुरी गुळाचा गोडवा यंदा वाढणारकोल्हापूर : यंदाच्या पावसाळ्यात गुजरात,...
कमी दरांवरून जिनर्सचा ‘सीसीआय’च्या...जळगाव ः भारतीय कापूस महामंडळाच्या (सीसीआय) कापूस...
होय, आम्ही बदलू शेतीचे चित्र... ‘शाळेत सुरू असलेल्या कृषी शिक्षण अभ्यासक्रमातून...
‘पंदेकृवि’च्या सुवर्णमहोत्सवी वर्षाचा...अकोला :  डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ...
शेतीपासून जितके दूर जाल तितके दुःख...पुणे : शेतीशी जोडलेली माणसं ही निसर्ग आणि मानवी...
नाबार्डच्या व्याजदरातच जिल्हा बँकांना...मुंबई : राज्य बँकेला नाबार्डकडून मिळणाऱ्या...
कोकण, पश्‍चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी...पुणे : कोकण अाणि पश्‍चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी...
अकोला, बुलडाणा जिल्ह्यांत कोरडवाहू...अकोला : अकोला आणि बुलडाणा जिल्ह्यात कोरडवाहू...
अठरा गावांनी केली कचऱ्यापासून गांडूळखत...गावे आणि वाडीवस्त्याही स्वच्छतेत अग्रभागी...
‘सीसीआय’च्या खरेदीला दिवाळीत मुहूर्तमुंबई : देशातील महत्त्वाच्या कापूस उत्पादक...