agriculture news in marathi, less Humidity decreases temperature, Maharashtra | Agrowon

बाष्प कमी झाल्याने कोरडेपणा; गारठा वाढला
टीम अॅग्रोवन
सोमवार, 6 नोव्हेंबर 2017

पुणे : हवेतील बाप्ष कमी झाल्याने वातावरणात कोरडेपणा तयार झाला आहे. त्यामुळे मध्य महाराष्ट्र व विदर्भाच्या काही भागात थंडीने चांगलाच जम बसविण्यास सुरवात केली. त्यामुळे मध्य महाराष्ट्र व विदर्भाच्या काही भागांत चांगलीच थंडी वाढली आहे. रविवारी (ता. ५) सकाळी आठ वाजेपर्यंत नाशिक येथे १२.२ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंद झाल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

पुणे : हवेतील बाप्ष कमी झाल्याने वातावरणात कोरडेपणा तयार झाला आहे. त्यामुळे मध्य महाराष्ट्र व विदर्भाच्या काही भागात थंडीने चांगलाच जम बसविण्यास सुरवात केली. त्यामुळे मध्य महाराष्ट्र व विदर्भाच्या काही भागांत चांगलीच थंडी वाढली आहे. रविवारी (ता. ५) सकाळी आठ वाजेपर्यंत नाशिक येथे १२.२ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंद झाल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

मध्य महाराष्ट्र व विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली. कोकण, गोव्याच्या काही भागांत व विदर्भाच्या उर्वरित भागात किंचित घट झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते. नाशिकमधील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत २.७ अंश सेल्सिअसने घट झाली आहे. कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत १.९ अंश सेल्सिअसने घटून २९.५ अंश सेल्सिअस एवढे कमाल तापमान होते. 

मराठवाड्यातील परभणी येथील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत सर्वाधिक ३.७ अंश सेल्सिअसने घट होऊन १४.५ अंश सेल्सिअसची नोंद झाली. त्यापाठोपाठ सोलापुरातील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत ३.४ अंश सेल्सिअसने घट झाली असून, येथे १५.९ अंश सेल्सिअस तापमान होते. तर नागपूर, पुणे, जळगाव, अकोला येथील किमान तापमानात एक ते दोन अंश सेल्सिअसने घट झाली. मध्य महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर, कोकणातील मुंबई येथील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत एक अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे. 

रविवारी (ता.५) सकाळी आठ वाजेपर्यंतचे किमान तापमान ः अंश सेल्सिअसमध्ये : मुंबई २४.५, सांताक्रूझ २२.६, अलिबाग २०.७, रत्नागिरी २२.३, डहाणू २०.२, भिरा, पुणे १३.०, नगर, जळगाव १४.४, कोल्हापूर १९.३, महाबळेश्वर १४.२, मालेगाव १५.४, नाशिक १२.२, सांगली १८.६, सातारा, सोलापूर १५.९, उस्मानाबाद, औरंगाबाद १५.०, परभणी १४.५, नांदेड १६.०, बीड, अकोला १६.५, अमरावती १६.४, बुलडाणा १६.२, ब्रह्मपुरी १५.३, चंद्रपूर १८.६, गोंदिया १५.०, नागपूर १५.२, वाशीम १५.८, वर्धा १५.५, यवतमाळ १४.५

इतर अॅग्रो विशेष
दोन आठवड्यांनंतर मॉन्सूनची प्रगती..पुणे : नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
राज्यात दमदार पाऊस; कोकण, विदर्भात...पुणे : मॉन्सून सक्रिय झाल्याने कोकण, मध्य...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील १३९...
बाजारात कांदा टप्प्याटप्प्याने आणा..नाशिक : येत्या काळात देशभरातील कांदा बाजारात आवक...
दागिने गहाण टाकून पीककर्ज भरले...कोल्हापूर ः कारखान्यांनी एफआरपी देताना हात आखडता...
राज्यातील सोसायट्यांच्या दहा हजार...नाशिक : विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांमार्फत...
राज्यातील पाच नदी खोऱ्यांच्या जल...मुंबई : राज्यातील महत्त्वपूर्ण अशा कृष्णा,...
जमिनीची सुपीकता जपत वाढविले पीक उत्पादनकुडजे (ता. हवेली, जि. पुणे) येथील शुभांगी विनायक...
शिक्षण, जलसंधारणातून ग्रामविकासाला गतीमराठवाडा ग्रामीण विकास संस्थेचा आरोग्य सेओवा,...
बॅंकेच्या चकरा अन् कागदपत्रांच्या...धुळे ः मागील दोन - तीन महिन्यांपासून पीककर्जासाठी...
‘ई-नाम’मधील १४५ बाजार समित्यांसाठी हवेत...पुणे ः शेतकऱ्यांना त्यांचा शेतीमाल देशातंर्गत...
सुमारे साठ एकरांवर ‘ड्रीप अॅटोमेशन’पाणी व खतांचा काटेकोर वापर करण्याबाबत अनेक शेतकरी...
भारताकडून अमेरिकेच्या हरभरा, तुरीच्या...नवी दिल्ली ः अमेरिकेने भारतातून आयात होणाऱ्या...
राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाची हजेरीपुणे ः राज्यातील अनेक भागांत शुक्रवारी (ता. २२)...
माॅन्सून पुढे सरकण्यास अनुकूल स्थितीपुणे : माॅन्सूनला राज्यातून पुढे सरकण्यास अनुकूल...
राज्यात आजपासून प्लॅस्टिकबंदी...मुंबई : राज्य सरकारच्या प्लॅस्टिकबंदीच्या...
धान्याला कीड लागताच सेन्सर देणार माहितीकऱ्हाड, जि. सातारा : साठवणूक केलेल्या ठिकाणी अथवा...
साखर निर्यातीचा कोटा ८० लाख टन करण्याची...कोल्हापूर : साखर निर्यातीची कोटा ८० लाख टन करावा...
सुकाणू समितीच्या कार्यकारिणीची जवळगाव...अंबाजोगाई, जि. बीड : शेतकरी संघटना व सुकाणू...
शेती म्हणजे तोटा हे सूत्र कधी बदलणार? शेती कायम तोट्यात कंटूर मार्करचे संशोधक व शेती...