agriculture news in marathi, less mechnism for milk purification, parbhani | Agrowon

परभणी जिल्ह्यात दर्जेदार दूध असूनही मिळतोय कमी दर
टीम अॅग्रोवन
सोमवार, 14 मे 2018
पाथरी येथील शीतकरण केंद्रामध्ये दूध तपासणीसाठी आवश्यक साहित्य प्रमाणित दर्जाचे वापरणे आवश्यक आहे. बल्क कुलरमधील बिघाडामुळे आजवर सुमारे २ लाख लिटर दुधाची नासाडी झाली. दर्जेदार दूध असूनही जाणीवपूर्वक पाॅईंट मारून मापात खोट आणली जाते. नुकसान होत आहे.
- विठ्ठल गिराम, अध्यक्ष, साई दूध उत्पादक व पुरवठा संस्था, बाभळगांव, ता. पाथरी
भाग -२
परभणी : परभणी जिल्ह्यात ज्या वेळी दुष्काळी स्थितीमध्ये शेती उत्पादनात घट येते त्या वेळी दूध उत्पादनात वाढ झाल्याचे आढळून आले आहे. जिल्ह्यात दूध खरेदीसाठी खासगी, सहकारी संघ नाहीत. त्यामुळे शासकीय यंत्रणेद्वारे दूध खरेदी केली जाते. इतर जिल्ह्यांत खासगी तसेच सहकारी संघाकडून शासकीय दरापेक्षा जास्त दर दिला जात असताना परभणी जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकरी मात्र शासनाला कमी दराने दूध पुरवठा करत होते. दर वाढल्यामुळे आता फायदा होत आहे. परंतु पाथरी येथे अद्ययावत शीतकरण यंत्रसामग्रीअभावी दुधाची नासाडी होत आहे.
 
येथे दुधाची गुणवत्ता तपासणी मॅन्युअली केली जाते. पाॅईटच्या फरकामुळे दर्जेदार दूध असूनही कमी भाव मिळत आहेत. यामुळे दूध उत्पादक शेतकरी तसेच पुरवठा संस्थांना सातत्याने तोटा सहन करावा लागत आहे.
 
पाथरी येथील शासकीय दूध शीतकरण केंद्रामध्ये २५०० लिटर साठवण क्षमतेचे बल्क कुलर आहे. त्यामध्ये अनेकदा बिघाड होते तेव्हा दुध उत्पादक संस्थांना थेट परभणी येथील दुग्धशाळेत दूध पोचते करावे लागते. त्यासाठी वाहतूक खर्चाचा भुर्दंड सहन करावा लागतो.
 
सध्या जिल्ह्याचे तापमान ४० अंशांवर आहे. दररोज सकाळ - संध्याकाळी मिळून एकूण १२ ते १४ हजार लिटरवर दूध संकलन होत आहे. अतिरिक्त ठरलेले दूध अनेकदा पुरवठा संस्थांना थेट परभणी येथील दुग्धशाळेत दूध पोचते करावे लागते. वाहतुकीसाठी वेळ लागत असल्यामुळे दूध खराब होते. चालू वर्षी नासलेले एक ते दीड लाख लिटर दूध फेकून द्यावे लागले.
 
पाथरी तालुक्यातील अनेक दूध उत्पादक संस्थांनी दुधातील फॅट, एसएनएफ तपासणीसाठी संगणीकृत तपासणी प्रणाली सुरू केली आहे. परंतु पाथरी येथील दूध शीतकरण केंद्रामध्ये मात्र अजूनही मॅन्युअली पध्दतीने दूध गुणवत्ता तपासणी केली जाते. अप्रमाणित तपासणी साधनांमुळे दर्जेदार दूध असूनही शेतक-यांना कमी दर दिला जातो. या ठिकाणी ताशी ५ हजार लिटर दूध थंड करण्यासाठी अद्यायावत शीतकरण यंत्रणा तसेच पाॅश्चरायझेशनची सुविधा उपलब्ध करुन दिल्यास दुधाची नासाडी थांबेल. 
 

इतर ताज्या घडामोडी
अकोल्यात तूर प्रतिक्विंटल ४२०० ते ५४००...अकोला ः स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीत...
प्रतिष्ठेच्या माढ्यात मतदानासाठी चुरस सोलापूर : संपूर्ण राज्याचे लक्ष वेधलेल्या व...
सांगली काही ठिकणी ‘ईव्हीएम’च्या...सांगली ः जिल्ह्यात लोकसभेसाठी झालेल्या मतदानावेळी...
कोल्हापूर, हातकणंगले मतदारसंघात चुरशीने...कोल्हापूर : लोकसभेच्या कोल्हापूर आणि हातकणंगले...
मोदी यांच्या सभेसाठी कांदा लिलाव बंदनाशिक : नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील...
परभणी ः दूध संकलनात सात लाख ८९ हजार...परभणी ः शासकीय दूध योजनेअंतर्गंत परभणी दुग्धशाळेत...
राज्यात तिसऱ्या टप्प्यात शांततेत मतदानमुंबई :  लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या...
लोकांचा कौल आघाडीलाच; पण ईव्हीएम...मुंबई : मी अनेक मतदारसंघांमध्ये फिरलो....
शिर्डी लोकसभा निवडणुकीसाठी वीस उमेदवार...नगर   : नगर लोकसभा मतदारसंघात मंगळवारी...
सोलापूर जिल्ह्यातील ६६२...सोलापूर  : लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू...
पुण्यात पाच वाजेपर्यंत ५३ टक्के मतदानपुणे  ः पुणे लोकसभा मतदारसंघात मंगळवारी (ता....
बारामतीत शांततेत मतदानपुणे  : बारामती लोकसभा मतदारसंघासाठी...
पुणे जिल्ह्यातील १४ कारखान्यांचा गाळप...पुणे  ः जिल्ह्यातील १४ साखर कारखान्यांचा...
बुलडाण्यात खरिपात सात लाख ३८ हजार...बुलडाणा  ः येत्या खरीप हंगामात जिल्हयात...
तुरीचे चुकारे रखडल्याने शेतकरी अडचणीत   संग्रामपूर, जि. बुलडाणा  : शासनाच्या हमीभाव...
नगर लोकसभा मतदारसंघात उत्साहात मतदाननगर ः नगर लोकसभा मतदारसंघात मंगळवारी (ता. २३)...
उपयोगानुसार वनशेतीसाठी वृक्षांची निवडवनशेतीसाठी मुख्यतः कोरडवाहू अथवा पडीक जमिनीची...
आंतरमशागतीसाठी अवजारेमकृवि चाकाचे हात कोळपे ः या अवजाराने आपण खुरपणी,...
एकलहरे वीज केंद्रात उभारली रोपवाटिकानाशिक : पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी...
जळगाव : निवडणुकीमुळे टॅँकरचे प्रस्ताव...जळगाव : खानदेशात दिवसागणिक पिण्याच्या...