अकोला, वाशीममध्ये तूर खरेदीला थंड प्रतिसाद

अकोला, वाशीममध्ये तूर खरेदीला थंड प्रतिसाद

अकोला : अाधारभूत किमतीने तूर खरेदी सुरू करून अाठवडा उलटला तरी अद्यापही सर्वच केंद्रे कार्यान्वित झाली नाहीत. शिवाय जे केंद्र सुरू झाले अाहे, तेथेही फारशी अावक नसल्याची स्थिती समोर अाली अाहे. अकोला अाणि वाशीम या दोन जिल्ह्यांत २ फेब्रुवारीपासून शनिवार (ता. १०) पर्यंत केवळ ९६२ क्विंटल तूर खरेदी झाली अाहे.     शासनाच्या घोषणेनुसार अकोला व वाशीम जिल्ह्यात शुक्रवार (ता. दोन) पासून खरेदीला सुरवात झाली. पहिल्याच दिवशी अकोला जिल्ह्यात अकोला केंद्र उघडले. त्यानंतर पिंजर, पातूर, वाडेगाव सुरू झाले. वाशीममध्ये वाशीम व रिसोड केंद्र उघडले. अकोला जिल्ह्यात अकोला केंद्रावर ३५४ अाणि वाडेगावला २५८, तर पिंजर (ता. बार्शीटाकळी) मध्ये ४८, तर पातूरमध्ये ११ क्विंटल खरेदी झाली. वाशीम जिल्ह्यात केवळ रिसोड केंद्रावर २९१ क्विंटल खरेदी झाली. अाधारभूत किमतीने तूर खरेदी सुरू करावी, यासाठी सर्वत्र मागणी केली जात होती. शासनाने केंद्र उघडून अाता अाठवडा लोटत अाहे. तरीही खरेदीची गती वाढलेली नाही. नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना एसएमएसद्वारे केंद्रावर तूर अाणण्याबाबत कळविले जाते. हमीभाव ५४५० रुपये अाहे, तर खुल्या बाजारात ३८०० ते ४६०० दरम्यान तूर विकत अाहे. सोयाबीनप्रमाणे तुरीचे दर वाढतील या अाशेने शेतकरी सध्या तूर विक्रीला अाणत नसल्याचा दावा अधिकारी करत अाहेत.  अकोट केंद्राचा पेच उडीद खरेदीतील घोळामुळे अकोट येथील खरेदी केंद्र राज्यभर गाजत आहे. सातत्याने गाजत असलेल्या या केंद्रावर अद्याप तूर खरेदी सुरू झाली नाही. यापूर्वी विदर्भ मार्केटिंग फेडरेशनतर्फे येथे खरेदी केली जात होती. या मोसमात तूर खरेदीसाठी अातापर्यंत कुठल्याच एजन्सीने पुढाकार न घेतल्याने पेच निर्माण झाला अाहे. या ठिकाणी तूर खरेदी तातडीने करण्याची सातत्याने मागणी होत अाहे; परंतु प्रशासनाला एक अाठवडा लोटला तरी तोडगा काढता अालेला नव्हता. या अाठवड्यात खरेदी सुरू होईल, असे सांगितले जात अाहे.  सध्या सुरू असलेली केंद्रे अकोला, पिंजर, वाडेगाव, पातूर, रिसोड अाणि वाशीम सुरू न झालेली केंद्रे अकोटा, तेल्हारा, पातूर, पारस, मालेगाव, मानोरा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com