पुणे : ‘‘छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आदर्शावरच राज्य कारभार सुरू आहे.
ताज्या घडामोडी
या हंगामात मुगाचे पीक जास्त अालेले नाही. तर दुसरीकडे बाजारात भाव नाहीत. अशा परिस्थितीत सध्या शेतकऱ्यांची लूट सुरू अाहे. शासनाने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्यासारखी स्थिती अाहे. हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी होत असल्याने सध्या मिळत असलेला भाव व हमीभाव यातील तफावत शासनाने दिली पाहिजे. तरच शेतकऱ्यांना न्याय मिळू शकेल. याबाबत अाम्ही तातडीने शासनाकडे मागणी करणार अाहोत.
- डॉ. प्रकाश मानकर, चेअरमन, भारत कृषक समाज.
अकोला : वऱ्हाडातील बाजार समित्यांमधील मुगाची अावक दररोज वाढत असताना दर मात्र शासनाने जाहीर केलेल्या हमीभावा पेक्षाही कमी मिळत अाहे. यामुळे शासनाने तातडीने हमीभावाने खरेदी करणारे केंद्र सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून केली जात अाहे. दुसरीकडे या हंगामापासून सरसकट केंद्र सुरू केले जाणार नसून संबंधित एजन्सीकडे सर्व सुविधा अाहेत किंवा नाही याची खातरजमा तालुकास्तरावरून सहायक निबंधकांकडून केल्यानंतर पुढील निर्णय होणार अाहे. यामुळे हमीभाव केंद्र सुरू करण्याची प्रक्रिया किचकट बनण्याची शक्यता व्यक्त होऊ लागली अाहे.
सध्या बाजारात मुगाला ३५०० ते ५३०० रुपये क्विंटल दरम्यान भाव मिळत अाहे. बहुतांश दर हा ४५०० रुपयांच्या अात असून हमीभावापेक्षा अडीच ते तीन हजारांनी कमी अाहे. या अाठवड्यापासून बाजार समित्यांमध्ये मुगाची अावक सातत्याने वाढत अाहे. अकोल्यात गुरुवारी (ता१३) मुगाची १३४५ क्विंटल अावक झाली होती. या मुगाला ३५०० ते ५३५० रुपये क्विंटल दरम्यान भाव मिळाला. हा भाव शासनाने जाहीर केलेल्या हमीभावापेक्षा कमी अाहे.
या हंगामात लागवड केलेल्या मुगाची काढणी वेगाने होत अाहे. हजारो शेतकऱ्यांना पीककर्ज मिळालेले नसल्याने हात उसनवारीचे व्यवहार करून त्यांनी पेरणी केली होती. हा उसनवारीचा पैसा परत करण्यासाठी तसेच घरखर्च भागवण्यासाठी निघालेला मूग थेट बाजार समित्यांमध्ये विक्रीसाठी जात अाहे. यामुळे बाजार समित्यांमधील अावक दर दिवसाला वाढत अाहे. या अाठवड्यात सुरवातीला शंभर-दोनशे क्विंटल असलेली अावक अाता हजार पोत्यांवर सर्वच बाजार समित्यांमध्ये पोचली अाहे. हमीभाव खरेदी केंद्रांबाबत शासनाकडून अद्याप कुठल्याही हालचाली झालेल्या नाहीत.
केंद्र सुरू होण्यास विलंबाची शक्यता
मागील हंगामात अाॅनलाईन नोंदणीची प्रक्रिया यशस्वी झाली. त्यानंतर यावर्षी हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्यापूर्वी विविध निकष तपासले जाणार आहेत. या अनुषंगाने जिल्हा उपनिबंधकांमार्फत तालुका स्तरावरून सहायक निबंधक खरेदी विक्री संस्थांकडील सुविधांची खातर जमा करून अहवाल देतील. त्यांनी हिरवा झेंडा दाखवल्यावरच अाता नाफेडचे हमीभाव खरेदी केंद्र सुरू होणार अाहे. ही खातरजमा करण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होत असून नवीन केंद्र सुरू करण्यासाठी यामुळे अाणखी विलंब होण्याची शक्यता अाहे.
- 1 of 349
- ››