agriculture news in marathi, less response to E-Naam from farmers in Gramsabhas | Agrowon

ई-नामला ग्रामसभांतून शेतकऱ्यांचा संमिश्र प्रतिसाद
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 9 फेब्रुवारी 2018

पुणे : आॅनलाइन नॅशनल ॲग्रिकल्चर मार्केट (ई-नाम)ची राज्यात प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी निवड झालेल्या ६० बाजार समित्यांच्या कार्यक्षेत्रात प्रजासत्ताक दिनानिमित्त ग्रामसभांचे आयाेजन करण्यात आले हाेते. या ग्रामसभांमधून शेतकऱ्यांच्या नाेंदणीला संमिश्र प्रतिसाद मिळाला. ६५० ग्रामसभांमधून २८ हजार ८७८ शेतकऱ्यांची माहिती संकलित करण्यात आली, तर ५ हजार ८३७ शेतकऱ्यांची ई-नामच्या पाेर्टलवर नाेंदणी करण्यात आली आहे. 

पुणे : आॅनलाइन नॅशनल ॲग्रिकल्चर मार्केट (ई-नाम)ची राज्यात प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी निवड झालेल्या ६० बाजार समित्यांच्या कार्यक्षेत्रात प्रजासत्ताक दिनानिमित्त ग्रामसभांचे आयाेजन करण्यात आले हाेते. या ग्रामसभांमधून शेतकऱ्यांच्या नाेंदणीला संमिश्र प्रतिसाद मिळाला. ६५० ग्रामसभांमधून २८ हजार ८७८ शेतकऱ्यांची माहिती संकलित करण्यात आली, तर ५ हजार ८३७ शेतकऱ्यांची ई-नामच्या पाेर्टलवर नाेंदणी करण्यात आली आहे. 

ई-नामच्या प्रभावी अंमलबजावणीकरिता पणन संचालक डॉ. आनंद जाेगदंड यांनी सहभागी सर्व बाजार समित्यांना आपल्या कार्यक्षेत्रातील गावांमध्ये ग्रामसभा घेऊन माहिती देण्याचे आदेश दिले हाेते. त्यानुसार ८ विभागांमध्ये ७५८ गावांची निवड करण्यात आली हाेती. यापैकी ६५० गावांमध्ये ग्रामसभा घेण्यात आल्या. या ग्रामसभांमध्ये ४६ हजार ३९८ शेतकऱ्यांनी सहभाग घेतला, तर २८ हजार ८७८ शेतकऱ्यांची माहिती संकलित करण्यात आली. यापैकी ५ हजार ८३७ शेतकऱ्यांची माहिती ई-नामच्या पाेर्टलवर नाेंदणी करण्यात आली आहे. 

ग्रामसभांद्वारे शेतकऱ्यांना एकत्रित आणून माहिती देण्याचा हा उपक्रम नियमितपणे सुरू राहणार असल्याचे पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार यांनी सांगितले. 
ई-नामच्या दाेन टप्प्यांमध्ये ६० बाजार समित्यांची निवड करण्यात आली असून, पहिल्या टप्प्यातील बहुतांश बाजार समित्यांमध्ये आॅनलाइन लिलाव सुरू झाले आहेत. तर दुसऱ्या टप्प्यातील ३० बाजार समित्यांसाठी ७ काेटी २० लाखांचा निधी प्राप्त झाला असून, लवकरच संबंधित बाजार समित्यांना वर्ग करण्यात येईल. असेही पवार यांनी सांगितले.

इतर ताज्या घडामोडी
अकोल्याला रब्बीसाठी हरभऱ्याचे वाढीव...अकोला  ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी...
दुष्काळाची व्यथा मांडताना महिला...निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍...
कोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या...कोल्हापूर  : खरीप पिकांची काढणी वेगात...
सोलापुरातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी आश्‍...सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची...
नगरमधील ४३३८ शेतकऱ्यांची शेतीमाल...नगर  ः आधारभूत किमतीने मूग, उडीद, सोयाबीनची...
जळगाव जिल्ह्यात ज्वारीच्या पेरणीला...जळगाव : जिल्ह्यात रब्बीतील ज्वारी पेरणीकडे...
ढगाळ वातावरणामध्ये द्राक्ष पिकात...सांगली, मिरज व सोलापूर येथील काही भागांमध्ये हलके...
हुमणी अळीचे एकात्मिक व्यवस्थापनगेल्या काही वर्षांपासून राज्याच्या विविध...
पुणे जिल्ह्यात रब्बीसाठी १९ हजार...पुणे : पुणे जिल्ह्यात रब्बी हंगामाची तयारी सुरू...
सोलापूर जिल्हा बॅंकेकडून ७० हजार...सोलापूर  : सोलापूर जिल्हा बॅंकेच्या सव्वा...
सोयाबीन खरेदी केंद्रे सुरू होईनातसातारा : जिल्ह्यात खरिप पिकांची काढणी अंतिम...
भाजीपाला सल्लासध्याच्या काळात बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, तूर, गहू, हरभरा...ज्या ठिकाणी पाण्याचा ताण बसत आहे, त्या ठिकाणी...
हाताचा नाकाशी होणाऱ्या संपर्कातूनही...न्यूमोनियाकारक जिवाणू हा नाकाला हात लावणे,...
खानदेशात खरिपातील ज्वारीची आवक सुरुजळगाव : खानदेशात अनेक भागांत ज्वारीची मळणी जवळपास...
परभणी जिल्ह्यात मुगाची उत्पादकता एकरी १...परभणी : यंदा परभणी जिल्ह्यात मुगाची सरासरी...
पुणे जिल्ह्यात चाराटंचाईपुणे   ः पुणे जिल्ह्यातील पूर्व पट्ट्यात...
नगर - मराठवाड्यात पाण्यावरून संघर्षाची...नगर ः पुरेसा पाऊस झाला नसल्याने यंदा...
‘महसूल’च्या जागेवर चाऱ्याच्या...यवतमाळ  ः पांढरकवडा व राळेगाव तालुक्‍यांतील...
सातारा जिल्ह्यात ७७३ एकरांवर तुती लागवडसातारा  ः जिल्ह्यात रेशीम शेती करण्याकडे...