agriculture news in marathi, Less response to purchase of tur Registration | Agrowon

तूर खरेदी नोंदणीला अल्प प्रतिसाद
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 11 जानेवारी 2018

जळगाव : जिल्ह्यात शासकीय तूर खरेदी केंद्र सुरू करण्याची तयारी मार्केटिंग फेडरेशनने करून ठेवली असून, खरेदीसंबंधी ऑनलाइन नोंदणीही सुरू झाली आहे. ही नोंदणी काही ठिकाणी तांत्रिक अडचणींमुळे होत नसल्याचे चित्र आहे. यातच नोंदणीला अल्प प्रतिसाद लाभला असून, सुमारे ८०० शेतकऱ्यांनी नोंदणी करून घेतल्याची माहिती आहे. नोंदणीसंबंधी जामनेर, मुक्ताईनगर, जळगाव येथे बऱ्यापैकी कार्यवाही सुरू आहे.

जळगाव : जिल्ह्यात शासकीय तूर खरेदी केंद्र सुरू करण्याची तयारी मार्केटिंग फेडरेशनने करून ठेवली असून, खरेदीसंबंधी ऑनलाइन नोंदणीही सुरू झाली आहे. ही नोंदणी काही ठिकाणी तांत्रिक अडचणींमुळे होत नसल्याचे चित्र आहे. यातच नोंदणीला अल्प प्रतिसाद लाभला असून, सुमारे ८०० शेतकऱ्यांनी नोंदणी करून घेतल्याची माहिती आहे. नोंदणीसंबंधी जामनेर, मुक्ताईनगर, जळगाव येथे बऱ्यापैकी कार्यवाही सुरू आहे.

जिल्ह्यात मागील हंगामात आठ तूर खरेदी केंद्रे सुरू केली होती. यंदा १० खरेदी केंद्रं सुरू केली जाणार आहेत. त्यात जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, अमळनेर, मुक्ताईनगर, बोदवड, जामनेर, रावेर, एरंडोल, भुसावळ या केंद्रांचा समावेश असणार आहे. नियोजित केंद्रांच्या ठिकाणी तूर खरेदीसाठी सब एजंट म्हणून शेतकी संघांची नियुक्ती केली आहे. या शेतकी संघांनी खरेदीसंबंधी तयारी दाखविल्यानंतर नोंदणीचे आदेश दिले.

नोंदणी ऑनलाइन करायची असून, त्यासाठी तूर पीक पेरा नोंदीचा सातबारा, आधार क्रमांक, बॅंक पासबूक क्रमांक याची गरज आहे. बाजार समित्यांसह शेतकी संघात नोंदणी करता येईल. तसेच नोंदणीसाठी मार्केटिंग फेडरेशनने एक ॲप जारी केले असून, मात्र त्यात नोंदणीसंबंधी अडचणी येत आहेत. ॲपवर नोंदणी होत नाही. ते लागलीच बंद पडते.

तसेच शेतकी संघातील कर्मचारी त्याची हाताळणी करू शकत नाहीत. तसेच नोंदणीसाठीचे पोर्टलही सर्व्हर डाउनसह इंटरनेटच्या अडचणींमुळे व्यवस्थित काम करीत नाही. शिवाय काही शेतकी संघांमध्ये नेट जोडणीच्याही अडचणी असल्याचे समोर आले आहे. मध्यंतरी याच अडचणी होत्या, त्या सोडविण्याची जबाबदारी शेतकी संघावरच सोपविली आहे. सर्व्हरसंबंधीच्या अडचणी वरिष्ठ कार्यालयास कळविल्या जात आहेत.

तूर खरेदी केंद्र सुरू करण्याबाबत अजून शासनाच्या सूचना नाहीत. परंतु १५ जानेवारीनंतर खरेदी केंद्रे सुरू होऊ शकतात. शासकीय तूर खरेदी दर पाच हजार ५० रुपये प्रतिक्विंटल असणार आहे, अशी माहिती मार्केटिंग फेडरेशनचे पणन अधिकारी परिमल साळुंखे यांनी दिली.

इतर ताज्या घडामोडी
अकोल्याला रब्बीसाठी हरभऱ्याचे वाढीव...अकोला  ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी...
दुष्काळाची व्यथा मांडताना महिला...निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍...
कोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या...कोल्हापूर  : खरीप पिकांची काढणी वेगात...
सोलापुरातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी आश्‍...सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची...
नगरमधील ४३३८ शेतकऱ्यांची शेतीमाल...नगर  ः आधारभूत किमतीने मूग, उडीद, सोयाबीनची...
जळगाव जिल्ह्यात ज्वारीच्या पेरणीला...जळगाव : जिल्ह्यात रब्बीतील ज्वारी पेरणीकडे...
ढगाळ वातावरणामध्ये द्राक्ष पिकात...सांगली, मिरज व सोलापूर येथील काही भागांमध्ये हलके...
हुमणी अळीचे एकात्मिक व्यवस्थापनगेल्या काही वर्षांपासून राज्याच्या विविध...
पुणे जिल्ह्यात रब्बीसाठी १९ हजार...पुणे : पुणे जिल्ह्यात रब्बी हंगामाची तयारी सुरू...
सोलापूर जिल्हा बॅंकेकडून ७० हजार...सोलापूर  : सोलापूर जिल्हा बॅंकेच्या सव्वा...
सोयाबीन खरेदी केंद्रे सुरू होईनातसातारा : जिल्ह्यात खरिप पिकांची काढणी अंतिम...
भाजीपाला सल्लासध्याच्या काळात बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, तूर, गहू, हरभरा...ज्या ठिकाणी पाण्याचा ताण बसत आहे, त्या ठिकाणी...
हाताचा नाकाशी होणाऱ्या संपर्कातूनही...न्यूमोनियाकारक जिवाणू हा नाकाला हात लावणे,...
खानदेशात खरिपातील ज्वारीची आवक सुरुजळगाव : खानदेशात अनेक भागांत ज्वारीची मळणी जवळपास...
परभणी जिल्ह्यात मुगाची उत्पादकता एकरी १...परभणी : यंदा परभणी जिल्ह्यात मुगाची सरासरी...
पुणे जिल्ह्यात चाराटंचाईपुणे   ः पुणे जिल्ह्यातील पूर्व पट्ट्यात...
नगर - मराठवाड्यात पाण्यावरून संघर्षाची...नगर ः पुरेसा पाऊस झाला नसल्याने यंदा...
‘महसूल’च्या जागेवर चाऱ्याच्या...यवतमाळ  ः पांढरकवडा व राळेगाव तालुक्‍यांतील...
सातारा जिल्ह्यात ७७३ एकरांवर तुती लागवडसातारा  ः जिल्ह्यात रेशीम शेती करण्याकडे...