agriculture news in marathi, Less response to Zilla Parishad's agricultural schemes | Agrowon

जळगाव जिल्हा परिषदेच्या कृषी योजनांना कमी प्रतिसाद
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 5 ऑक्टोबर 2018

जळगाव : जिल्ह्यात जिल्हा परिषदेतर्फे राबविण्यात येत असलेल्या बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना व डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेला कमी प्रतिसाद आहे.

जळगाव : जिल्ह्यात जिल्हा परिषदेतर्फे राबविण्यात येत असलेल्या बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना व डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेला कमी प्रतिसाद आहे.

स्वावलंबन योजना ही मागासवर्गीय संवर्गातील शेतकऱ्यांसाठी आहे. बिरसा मुंडा योजना ही अनुसूूचित जमाती संवर्गातील शेतकऱ्यांसाठी आहे. त्यासाठी अपेक्षित अर्ज आले नाहीत. ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले होते. स्वावलंबन योजनेसंबंधी ५ कोटी रुपये निधी यंदाच्या वर्षासाठी मंजूर आहे. मागील वर्षाचा निधीही कमी प्रतिसादामुळे अखर्चित राहीला. दुर्गम भागातील इंटरनेटच्या जोडणीअभावी ऑनलाइन अर्ज करताना अडचणी येतात. स्वावलंबन योजनेनुसार ५०० विहिरी करायच्या आहेत. मागील वर्षाच्या १६४ विहिरींची कामे सुरू आहेत. एवढा लक्ष्यांक कसा पूर्ण होईल, हा मुद्दा आहे.

कृषी क्रांती योजनेतूनही सुमारे २०० शेतकऱ्यांचा लक्ष्यांक आहे. विहीर, कृषिपंप, वीज जोडणी, विहीर दुरुस्ती आदी कामे या योजनेतून घेता येणार आहेत. यासंदर्भात तालुकानिहाय आढावा घेतला जात आहे. या योजनांचे अर्ज तहसीलदार, कृषी अधिकारी, सहायक निबंधक कार्यालयात जमा करण्याची परवानगी दिली जावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

या योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी प्रचार व प्रसार करायला हवा. शेतकऱ्यांना गावोगावी मोफत इंटनेट सुविधा ग्रामपंचायतीतच द्यावी. अर्ज करण्याची प्रक्रिया सुलभ असावी, अशी अपेक्षा काही जिल्हा परिषदेच्या सदस्यांनी व्यक्त केली आहे.

टॅग्स

इतर ताज्या घडामोडी
पुण्यात आवक कमी झाल्याने भाजीपाल्यांची...पुणे ः राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या...
दुष्काळी तालुक्यांतून अकोले, कोपरगावला...नगर : अकोले तालुक्‍यात पाऊस पडण्याच्या प्रमाणात...
सोयाबीनने मोडले शेतकऱ्यांचे कंबरडेअमरावती  ः दिवाळीच्या मोसमात दोन पैसे...
शेतीमालाच्या साठवणुकीसाठी उभारणार गोदामेकऱ्हाड, जि. सातारा ः शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला...
हापूसचा ‘अल्फोन्सो जीआय’ वादातपुणे   : केंद्र सरकारने हापूस आंब्याला ‘...
साखर निर्यातीसाठी कारखान्यांनी पुढे...मुंबई   : अडचणीतील साखर उद्योगाला...
दक्षिण कोकणात बुधवारपासून शक्यतापुणे  : कमाल तापमानात चढ-उतार होत असला तरी...
पंजाब, हरियानात पिकांचे अवशेष जाळण्यावर...गुडगाव : पिकांचे अवशेष जाळण्यावर असलेली बंदी...
शबरीमला मंदिर प्रवेशप्रकरणी केरळमध्ये...तिरुअनंतपुरम, केरळ : शबरीमला मंदिरात सर्व...
नैसर्गिक समतोलासह खाद्यसुरक्षेसाठी...२०५० मध्ये जगाची लोकसंख्या १० अब्जांपर्यंत पोचेल...
जळगावात डाळिंब प्रतिक्विंटल २००० ते...जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सातारी आल्याच्या बाजारभावात सुधारणासातारा ः आले पिकाच्या दरात सुधारणा झाली आहे....
सोलापूर जिल्ह्यातील ‘दुष्काळ`...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात यंदा सुरवातीपासून...
निवडणूक अायोगाच्या बोधचिन्हाची मानवी...बुलडाणा : येथील जिजामाता प्रेक्षागारात पाच हजार...
ऊसदर नियामक मंडळाची ‘आरएसएफ’प्रश्नी...पुणे : राज्यातील काही साखर कारखान्यांकडून महसुली...
राज्यात उन्हाचा चटका कायमपुणे   : कोरड्या व निरभ्र हवामानामुळे...
खानदेशात सूतगिरण्यांची वानवाजळगाव  ः खानदेशात कापूस हे प्रमुख पीक आहे....
दुष्काळ जाहीर करण्यासाठी मुहूर्त कशाला...औरंगाबाद  ः मराठवाड्यातील ७६ पैकी ५६ तालुक्‍...
सिंचन परिषदेतील विचार मंथनाची दिशा...सोयगाव, जि. औरंगाबाद   : केवळ चर्चा, प्रबोधन...
स्फुरद विरघळविणाऱ्या जिवाणू संवर्धकांचा...फळभाज्या तसेच फळांच्या वाढीसाठी स्फुरद हे...