कोल्हापुरात ई-पॉसचा अपुरा पुरवठा

पहिल्या टप्प्यात मशिन आले. त्यानंतर मशीन आली नाहीत. खत विक्रेत्यांकडून याबाबतची मागणी होत आहे. ज्या वेळी मशिन येतील त्या वेळी त्यांना तातडीने देण्यात येतील. - चंद्रकांत सूर्यवंशी, कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद, कोल्हापूर
कोल्हापुरात ई-पॉसचा अपुरा पुरवठा

कोल्हापूर: ई-पॉस मशिनची सक्ती करण्यात येत असली तरी जिल्ह्यात केवळ ७४७ मशिन उपलब्ध झाल्या आहेत. अद्यापही ९०० मशिनची गरज आहे. ज्या खत विक्रेत्यांना मशिन मिळाले नाही त्यांचा खतपुरवठा बंद होणार असल्याने मशिनच्या उपलब्धतेअभावी जिल्ह्यातील पन्नास टक्के खत विक्रेत्यांचा खोळंबा होणार आहे. जिल्ह्यात सुमारे एक हजार सहाशे खत विक्रेते आहेत. दोन महिन्यांपूर्वी पहिल्या टप्प्यात जिल्ह्यासाटी ७४७ मशिनची उपलब्धता करण्यात आली.  अनेक ठिकाणी प्रायोगिक तत्त्वावर ई-पॉस मशिनचे मार्गदर्शन करण्यात येत आहे; पण अजूनही या मशिनद्वारे प्रभावीपणे कामकाज सुरू नसल्याचे चित्र आहे. शेतकऱ्यांबरोबर खत विक्रेत्यांना अद्याप अनेक त्रुटींचा सामना करावा लागत आहे. शासनाने सर्वांना पुरेशी मशिन उपलब्ध करून देऊनच हा निर्णय सक्तीचा करण्याची गरज होती; परंतु निम्म्याहून अधिक विक्रेत्यांना हे मशिनच उपलब्ध झाले नाही. हे मशीन कधी उपलब्ध होइल याबाबत शासकीय पातळीवरही स्पष्टता नाही.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com