तूर विक्रीच्या नोंदणीकडे शेतकऱ्यांची पाठ

तूर विक्रीच्या नोंदणीकडे शेतकऱ्यांची पाठ
तूर विक्रीच्या नोंदणीकडे शेतकऱ्यांची पाठ

अकोला  : या हंगामात शेतकऱ्यांनी पिकविलेल्या तुरीच्या हमीभावाने विक्रीसाठी ऑनलाइन नोंदणी करण्याची प्रक्रिया सुरू आहे. शनिवारी (ता. २३) ही मुदत संपणार आहे. दुसरीकडे हरभरा खरेदीच्या अनुषंगाने अद्याप नावनोंदणीबाबत कुठलेही आदेश आले नसल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. 

बाजारात पिकाला हमीभावापेक्षा कमी दर मिळू नये, यासाठी नाफेडमार्फत महाराष्ट्र को-ऑप फेडरेशन व विदर्भ को-ऑप फेडरेशन यांच्या माध्यमातून हमीभावाने खरेदी प्रक्रिया राबवली जात आहे. तूर खरेदीसाठी ऑनलाइन नावनोंदणी आणि काही केंद्रांवर खरेदीसुद्धा सुरू करण्यात आली. बाजारात तुरीचा दर सध्या सरासरी ५१०० पर्यंत मिळू लागला आहे. शासनाने जाहीर केलेला हमीभाव ५६७५ रुपये एवढा आहे. या दोन्ही दरांमध्ये सहाशे रुपयांची तफावत दिसून येत आहे. यामुळेच शासकीय खरेदी केंद्रावर तूर विक्रीसाठी सामसूम आहे. नाव नोंदणीलाही गर्दी नाही.

हरभऱ्याचाही हंगाम सुरू झाला. बाजारात हरभरा ४००० ते ४६०० पर्यंत विकत आहे. सरासरी ४३०० रुपये क्विंटलला दर आहे. हमीभावापेक्षा तीनशे-सव्वातीनशे रुपयांची तफावत आहे. यामुळे हरभरा थेट बाजारपेठेत विक्रीसाठी जात आहे. शासनाने हरभरा खरेदीसाठी नावनोंदणीची प्रक्रिया सुरू केली नाही. तुरीची नावनोंदणी २३ फेब्रुवारीपर्यंत होईल. त्यानंतर हरभरा नावनोंदणीसाठी आदेश निघतील, असे सूत्रांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com