agriculture news in Marathi, licence of increased crushing capacity stucked in rules, Maharashtra | Agrowon

वाढीव गाळपक्षमतेचे परवाने अडकले नियमांच्या कात्रीत
राजकुमार चौगुले
शनिवार, 11 नोव्हेंबर 2017

कोल्हापूर : एकमेकांच्या स्पर्धेतून कारखान्यांनी गाळपक्षमता वाढविण्याचा सपाट लावला आहे. काही कारखान्यांनी वाढविलेल्या गाळपक्षमतेचा परवाना मागण्यासाठी आयुक्तालयाला अर्ज केला असला, तरी अनेक नियमांच्या कात्रीत हे परवाने अडकले आहेत. गाळपाची क्षमता वाढविलेल्या कारखान्यांना वाढीव गाळपक्षमतेचा परवाना मिळविण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.  

कोल्हापूर : एकमेकांच्या स्पर्धेतून कारखान्यांनी गाळपक्षमता वाढविण्याचा सपाट लावला आहे. काही कारखान्यांनी वाढविलेल्या गाळपक्षमतेचा परवाना मागण्यासाठी आयुक्तालयाला अर्ज केला असला, तरी अनेक नियमांच्या कात्रीत हे परवाने अडकले आहेत. गाळपाची क्षमता वाढविलेल्या कारखान्यांना वाढीव गाळपक्षमतेचा परवाना मिळविण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.  

कोल्हापूरसह पश्‍चिम महाराष्ट्रात यंदा अनेक कारखान्यांनी विस्तारीकरणाचा सपाटा लावला आहे. यात गाळपक्षमता वाढविण्यातही स्पर्धा आहे. कोल्हापूर जिल्ह्यात तर बहुतांशी मोठ्या कारखान्यांनी एक हजारापासून ते चार हजार मेट्रिक टनांपर्यंत गाळपक्षमता वाढविण्याची घोषणा केली. पण प्रत्यक्षात मात्र त्यांना आयुक्तालयाकडून परवानीच मिळाली नाही. यामुळे यंदाही गेल्या वर्षीच्या क्षमतेवरच बहुतांशी साखर कारखाने चालणार, असे साखर सहसंचालक कार्यालयाच्या सूत्रांनी सांगितले.

शासनाकडे यंत्रणा नाही
वाढीव गाळपक्षमतेला परवाने देताना त्या कारखान्याची आर्थिक स्थिती, फायदा-तोटा, कारखान्याचे ऊस क्षेत्र, सध्याच्या उसाची परिस्थिती इत्यादी बाबी लक्षात घेऊन मगच परवाना दिला जातो. आश्‍चर्याची बाब म्हणजे शासनाकडे कारखान्याकडे उपलब्ध उसाची तपासणी करण्याची यंत्रणाच नाही. कृषी विभागही याची तपासणी करण्यास असमर्थ आहे. अनेक कारखान्यांनी तेच तेच कार्यक्षेत्र दाखविल्याने कार्यक्षेत्रही रिपिट झाले आहे. कार्यक्षेत्र किती आहे हे सध्या तरी तपासता येणे शक्‍य नसल्याने आता वाढीव क्षमतेने गाळप करण्यासाठी कारखान्यांना परवान्याची प्रतीक्षाच करावे लागण्याची शक्‍यता आहे.  

जुन्या क्षमतेवरच चालणार कारखाने
यंदा गाळप हंगामास सुरवात झाली आहे. प्रत्येक कारखान्याने गळीत हंगाम सुरू करताना गाळपक्षमता वाढविल्याचा अभिमानाने उल्लेख केला. पण यंदा या वाढीव क्षमतेने हे गाळप होणार नसल्याचे चित्र आहे. अनेक कारखान्यांनी अद्यापही याबाबतचा परवाना काढलेला नाही. तर ज्यांनी परवाना मागितला आहे त्यांच्यापुढे अटींचा डोंगर आहे. 

एक कारखाना वाढल्याची परिस्थिती
जिल्ह्यात कारखान्यांनी जास्तीत जास्त ऊस गाळप आपल्या कारखान्यात व्हावे या उद्देशाने थोड्या थोड्या प्रमाणात  गाळपक्षमता वाढविली. या कारखान्यांच्या वाढीव गाळपक्षमतेचा अंदाज घेतल्यास जिल्ह्यात एकूण गाळपाच्या सुमारे दहा हजार मेट्रिक टनांची वाढीव क्षमता तयार झाली आहे. याचाच अर्थ जिल्ह्यात एक नवा मोठा कारखाना तयार झाल्यासारखी स्थिती आहे. यंदा उसाची वाढ शेवटच्या टप्प्यात वाढल्याने काहीसा दिलासा कारखान्यांना मिळाला आहे. तरीही एकूण उत्पादनाचा विचार केल्यास उत्पादन घटण्याची शक्‍यता आहे. आताच कमी क्षमतेने कारखाने सुरू राहण्याची शक्‍यता आहेत. यातच वाढीव क्षमता वापरल्यास त्याला ऊस कोणता आणायचा हाही प्रश्‍न भविष्यात कारखान्यांना सतावणार आहे. 
 

इतर बातम्या
एफआरपी द्या, काटामारी रोखा : बच्चू...पुणे :  राज्यातील ऊस उत्पादक...
शेतकरी सन्मान योजनेत रत्नागिरीतील आठ...रत्नागिरी : पंतप्रधान शेतकरी सन्मान...
कीटकशास्‍त्र विभागातर्फे ट्रायकोकार्ड...परभणी ः येत्या हंगामात मराठवाड्यातील औरंगाबाद,...
फळबाग योजनेतील अटी कोकणासाठी शिथिल करू...रत्नागिरी ः भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड...
महावितरणच्या कामात सुधारणा व्हायला हवी...जळगाव ः ‘महावितरण’च्या कार्यपद्धतीबाबत सामान्य...
कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदानाची...नाशिक : मागील वर्षी लाल कांद्याचे भाव पडल्याने...
कपाशीचा नांदेड ४४ बीटी वाण लोकार्पण हा...परभणी  : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
पावसाला उशीर झाल्याने चिंतेचे ढग गडदनांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत यंदा...
कृषी विद्यापीठाच्या वाणांच्या...रत्नागिरी ः डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी...
परभणी, हिंगोलीतील दूध उत्पादकांच्या... परभणी  ः शासकीय दूध योजनेअंतर्गत परभणी...
विदर्भातील कृषी विकासाला बाधक ठरतोय...नागपूर   ः सत्ताकेंद्र विदर्भात असताना...
राज्यातील दूध संघांपूढे ‘अमूल’चे कडवे...पुणे: राज्याच्या दूध उद्योगात ‘अमूल’चा होत असलेला...
उदारीकरणाच्या नावाखाली उत्पादन...पुणे   : देशात १९९१ मध्ये...
विधिमंडळाचे आजपासून पावसाळी अधिवेशनमुंबई : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी...
दुष्काळ, पीकविम्याचे आठ हजार कोटी...मुंबई ः लोकसभा निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर...
दुष्काळ, मंत्र्यांचे भ्रष्टाचार, आरक्षण...मुंबई : राज्यात भीषण दुष्काळ आहे, त्यामुळे...
विदर्भ, मराठवाड्यात उष्ण लाटेचा इशारापुणे : वायू चक्रीवादळाने बाष्प ओढून नेल्याने...
मॉन्सूनची सिक्कीम, पश्चिम बंगालपर्यंत...पुणे : अरबी समुद्रात गुजरातच्या किनाऱ्यावर...
करारावरील अश्‍वगंधा लागवड ठरली डोकेदुखीगडचिरोली ः अश्‍वगंधा लागवड आणि खरेदीचा करार करीत...
शेतकऱ्याच्या आत्महत्येप्रकरणी बँक...वर्धा : पात्र असतानाही कर्जमाफीचा लाभ न...