agriculture news in Marathi, Lifletes on pesticide should be in Marathi, Maharashtra | Agrowon

कीटकनाशकांचे लिफलेटस मराठीतून आणि ठळकपणे द्या
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 29 मार्च 2018

पुणे : कीटकनाशकांपासून विषबाधेचे वाढते प्रकार लक्षात घेता कीटकनाशकांची विक्री करताना शेतकऱ्यांना दिली जाणारे माहितीपत्रक (लिफलेटस) मराठी भाषेतून असावे, अशा सूचना कृषी विभागाने दिल्या आहेत. 

पुणे : कीटकनाशकांपासून विषबाधेचे वाढते प्रकार लक्षात घेता कीटकनाशकांची विक्री करताना शेतकऱ्यांना दिली जाणारे माहितीपत्रक (लिफलेटस) मराठी भाषेतून असावे, अशा सूचना कृषी विभागाने दिल्या आहेत. 

‘‘यवतमाळमधील विषबाधा प्रकरणामुळे यंदाच्या हंगामात काळजी घेणार आहोत. बोंड अळीला प्रतिकारक वाण यंदाही बाजारात आलेले नाही. त्यामुळे कीडरोगाचा प्रादुर्भाव गेल्या हंगामासारखाच राहिला तर कीटकनाशकांचा वापरदेखील वाढू शकतो. यामुळे पुन्हा विषबाधेच्या दुर्घटना होऊ न देण्यासाठी आम्ही कीटकनाशकांच्या कंपन्या व विक्रेत्यांना दक्ष राहण्याच्या सूचना दिल्या आहेत,’’ अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

कीटकनाशकांसोबत माहितीपत्रके देताना भाषा सोपी नसते, मराठी भाषेतून ठळक आणि स्पष्ट माहिती देणाऱ्या कंपन्यादेखील अत्यल्प आहेत. ‘‘केंद्रीय कीटकनाशके मंडळाच्या नोंदणी समितीने मंजूर केलेल्या नियमावलीतच कंपन्यांनी कीटकनाशकांची लिफलेट शेतकऱ्यांना द्यावीत, असा आमचा आग्रह आहे. सोप्या भाषेत मराठीतून ठळकपणे माहिती दिल्यास शेतकरी सावध होतात. त्यामुळे दुर्घटना टळते, असे कृषी विभागाचे म्हणणे आहे. 

कीटकनाशकांच्या ऑनलाइन विक्रीलादेखील कृषी विभागाने मनाई केली आहे. ‘‘ऑनलाइन विक्रीचे प्रकार राज्यात निदर्शनास आलेले नाहीत. तथापि, कीटकनाशके कायदा १९६८ मधील तरतुदींचा भंग न करता कंपन्यांनी कीटकनाशकांचे उत्पादन आणि विक्री करावी. मात्र, साठवणुकीच्या ठिकाणी व विक्रीच्या ठिकाणी परवाना असल्याशिवाय कीटकनाशके आणू नयेत अशादेखील सूचना देण्यात आलेल्या आहेत,’’ असेही सूत्रांनी स्पष्ट केले. 

ऑरगॅनोस्फॉस्परस किंवा क्लोरीन गटातील कीटकनाशके मानवी आरोग्याची हानी करतात. त्यामुळे कृषी विभागाने जहाल कीटकनाशकांच्या विक्री व्यवस्थेवर जास्त लक्ष ठेवण्याच्या सूचना राज्यातील क्षेत्रिय कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत.

‘‘ऑरगॅनोफॉस्परस, कार्बामेट किंवा क्लोरीन गटातील कीटकनाशकांवर आमचे जास्त लक्ष राहील. प्रोफनोफॉस तसेच प्रोफेनोफॉस व सायपरमेथ्रीन याचे मिश्रण, मोनोक्रोटोफॉस किंवा डायफेन्थुरॉन या जहाल कीटकनाशकांच्या वापराबाबत शेतक-यांनी खबरदारी घ्यावी. एखाद्या भागात या कीटकनाशकाची विक्री अचानक वाढल्यास कृषी खात्याकडून माहिती घेतली जाईल,’’ असेही सूत्रांनी स्पष्ट केले.

इतर बातम्या
पाणीपुरवठ्यासाठी शिवसेनेचा रास्ता रोकोअकोला : जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाणीपुरवठा...
प्रकाशाच्या प्रदूषणाचा परागीकरणावरील...परागीकरण यशस्वी होण्यामागे संपूर्ण अंधार किंवा...
मराठवाड्यातील १७ लाख लोक टँकरवर अवलंबूनऔरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीटंचाई भीषणतेच्या...
खानदेशात पाणीटंचाईच्या तीव्रतेत वाढ जळगाव : हिवाळ्याचे दिवस अंतिम टप्प्यात असतानाच...
सांगलीत वाढली दुष्काळाची दाहकतासांगली : जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता वाढत आहे....
जळगाव जिल्हा परिषदेत अध्यक्षा एकाकीजळगाव : जिल्हा परिषदेत प्रशासन सदस्य,...
दरेसरसम साठवण तलावाचे काम सुरू करानांदेड : दरेसरसम (ता. हिमायतनगर) येथील साठवण...
`म्हैसाळ`च्या आवर्तनात आता शून्य गळतीसांगली : म्हैसाळ योजनेच्या येणाऱ्या आवर्तनात...
`सोलापुरात टंचाई कृती आराखड्याची...सोलापूर  : टंचाई परिस्थितीवर मात करण्यासाठी...
समुद्राच्या उधाणामुळे पीक नुकसान ...मुंबई  : समुद्र किनाऱ्यावरील शेतीचे तसेच...
‘मग्रारोहयो’त २८ नव्या कामांचा समावेशनागपूर : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण...
सोलापुर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील २३...सोलापूर : गेल्या दोन-तीन वर्षांत जिल्हा...
साखर कारखान्यांचे बॉयलर लवकर थंडावणारपुणे  : दुष्काळी स्थितीमुळे साखर...
नंदुरबार बाजार समितीत ओल्या लाल मिरचीची...जळगाव  ः खानदेशात एकीकडे थंडीने केळीला मोठा...
ॲग्रोवन स्मार्ट ॲवॉर्डसाठी शेतकऱ्यांचा...पुणे : संकटांपुढे हार न मानता प्रतिकूल...
पुणे जिल्ह्यात तीन लाख जमीन...पुणे   ः जमिनीतील विविध घटकांची माहिती...
पुणे जिल्हा परिषदेत दर रविवारी ‘...पुणे  : स्वयंसहायता समूहाच्या (बचत गट)...
गोदावरी कालव्यांचे लोकसहभागातून...कोपरगाव, जि. नगर ः शंभर वर्षांहुन अधिक आयुर्मांन...
सातारा जिल्ह्यात रब्बीत अवघे नऊ टक्के...सातारा  ः रब्बी हंगामात पीक कर्जाकडे...
महालक्ष्मी सरस प्रदर्शनामुळे  ग्रामीण...मुंबई   ः ॲमेझॉन, फ्लिपकार्टच्या...