agriculture news in marathi, lift irrigation water bill recovery issue, sangli, maharashtra | Agrowon

वाकुर्डे योजनेची पाणीपट्टी थकबाकी ४७ लाखांवर
टीम अॅग्रोवन
सोमवार, 16 एप्रिल 2018
सांगली  ः वाकुर्डे उपसा सिंचन योजनेच्या शिराळा आणि कऱ्हाड तालुक्‍याची एकूण पाणीपट्टी थकबाकी ४७.८६ लाख इतकी आहे. शिराळा तालुक्‍यातील शेतकरी पाणीपट्टी भरण्यास पुढे येता आहेत. मात्र, कऱ्हाड तालुक्‍यातील शेतकरी पाणीपट्टी भरण्यासाठी पुढाकार घेत नसल्याचे चित्र आहे. यामुळे कऱ्हाड तालुक्‍याची एकूण पाणीपट्टी ३२.४३ लाख इतकी आहे. मुळात कऱ्हाड तालुक्‍यातील दोन नेत्यांच्या राजकारणामुळे पाणीपट्टी वसुलीस प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. 
 
सांगली  ः वाकुर्डे उपसा सिंचन योजनेच्या शिराळा आणि कऱ्हाड तालुक्‍याची एकूण पाणीपट्टी थकबाकी ४७.८६ लाख इतकी आहे. शिराळा तालुक्‍यातील शेतकरी पाणीपट्टी भरण्यास पुढे येता आहेत. मात्र, कऱ्हाड तालुक्‍यातील शेतकरी पाणीपट्टी भरण्यासाठी पुढाकार घेत नसल्याचे चित्र आहे. यामुळे कऱ्हाड तालुक्‍याची एकूण पाणीपट्टी ३२.४३ लाख इतकी आहे. मुळात कऱ्हाड तालुक्‍यातील दोन नेत्यांच्या राजकारणामुळे पाणीपट्टी वसुलीस प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. 
 
वाकुर्डे उपसा सिंचन योजनेचा शिराळा, वाळवा आणि कऱ्हाड तालुक्‍यांना लाभ झाला आहे. कऱ्हाड तालुक्‍यातून पाणीपट्टी भरण्यास सातत्याने विरोध होत असल्याने ही योजना सुरू करण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत. पाणीपट्टी भरली तरच ही योजना सुरू होईल.
 
मात्र, केवळ कऱ्हाड तालुक्‍यातील शेतकरी पाणीपट्टी भरत नसल्याने या योजनेचे वर्षातून एक किंवा दोन आर्वतन मिळते. वाकुर्डे योजना झाली आहे. मात्र, शिराळा तालुक्‍यातील नेत्यांनी कऱ्हाड तालुक्‍याला पाणी द्यायचे नाही, अशी भूमिका घेतली. परंतु कऱ्हाड तालुक्‍यातील माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी अधिकाऱ्यांना भेटून ‘वाकुर्डे’तून पाणी सोडण्याचे आदेश दिले. त्यामुळे पाणी सोडण्याचा निर्णय घेतला गेला. मात्र, अद्यापही पाणी सोडलेले नाही.
 
कराड तालुक्‍यातील माजी आमदार विलासराव पाटील (उंडाळकर) आणि माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण या दोघांमध्ये सातत्याने विरोधाचे राजकारण सुरू असते. परिणामी वाकुर्डे उपसा सिंचन योजनचे पाणी सोडले तर काही भागाला मिळते, तर काही भागाला मिळत नाही. यामुळे पाणी मिळत नसल्याने आम्ही पाणीपट्टी का भरावी, असा प्रश्‍न शेतकरी उपस्थित करत आहेत. मुळात, पाणीपट्टी वसुलीसाठी या तालुक्‍यातील लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यायला हवा, अशी मागणी शेतकरी करू लागले आहे.
 
वाकुर्डे उपसा सिंचन योजनेचे पाणी शिराळा तालुक्‍यातील लाभक्षेत्राला मिळते आहे. मात्र, या योजनेचे आवर्तन वर्षाकाठी एक किंवा दोनच मिळते. तरीदेखील या योजनेची पाणी पट्टी भरण्यासाठी शेतकरी पुढे येतात. यामुळे तालुक्‍यातून सुमारे ८५ ते ९० टक्के पाणीपट्टीची वसूल होते. पाणीपट्टी वसूल व्हावी यासाठी लोकप्रतिनिधी सातत्याने पाढ पुरावा करताहेत. 

इतर बातम्या
अब आया उंट पहाड के निछे; राजू शेट्टींचा...सोलापूर : शेतकऱ्यांच्या दूध दराच्या प्रश्‍...
सरकार रिलायन्स, पतंजलीच्या दुधाची वाट...नागपूर : एकीकडे समाधानकारक पाऊस पडत असताना...
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काँग्रेस-...नागपूर : कधी देणार कधी देणार...कापूस, धानाला...
खानदेशात दूध आंदोलनास अल्प प्रतिसादजळगाव ः खानदेशात कुठेही दूध आंदोलनाला उग्र स्वरुप...
संत गजानन महाराज पालखीचे सोलापुरात...सोलापूर : पावसाच्या संततधार सरी झेलत ‘गण गण गणात...
रस्त्यावर दूध ओतून शासनाचा निषेधसांगली ः दूध दरवाढीच्या स्वाभिमानी शेतकरी...
नांदेड जिल्ह्यात दूध दरासाठी...नांदेड ः जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या...
दूध दरप्रश्नी तारसा फाटा येथे आंदोलननागपूर  ः दूध उत्पादकांना प्रतिलिटर पाच...
पुणे जिल्ह्यात दूध दरप्रश्नी आंदोलनपुणे  ः  दूध दरप्रश्‍नी स्वाभिमानी...
दूध दरप्रश्‍नी वऱ्हाडात आंदोलनअकोला   ः दूध उत्पादकांना प्रतिलिटर पाच...
मराठवाड्यात विविध ठिकाणी दूध संकलन बंदऔरंगाबाद : दूध दरावरून पुकारल्या आंदोलनाच्या...
नगर जिल्ह्यात दूध संकलन बंदनगर  : दूध दरप्रश्नी स्वाभिमानी शेतकरी...
केनियात आढळल्या पिवळ्या वटवाघळांच्या...केनियामध्ये पिवळ्या रंगाच्या वटवाघळांच्या जनुकीय...
सातारा जिल्ह्यात दूध दर आंदोलनास मोठा...सातारा   ः स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दुधाला...
झाडांच्या संवर्धनामध्ये हवामान बदलासोबत...तापमानवाढीमुळे अधिक उंचीकडे किंवा उत्तरेकडे...
नागपूर, गडचिरोलीत संततधारनागपूर  : हवामान विभागाने विदर्भात सोमवारी (...
मराठवाड्यातील २४५ मंडळांत पावसाची रिपरिपऔरंगाबाद : मराठवाड्यातील ४२१ मंडळांपैकी जवळपास...
पुणे जिल्ह्यात दमदार पाऊसपुणे   : जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली...
अकोले तालुक्यात पावसाचा जोर कायमनगर   ः अकोले तालुक्याच्या पश्चिम भागात...
नांदेड, परभणी, हिंगोलीतील २६...नांदेडः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील २६...