मराठवाड्यात हलका आणि तुरळक पाऊस

 मराठवाड्यात हलका आणि तुरळक पाऊस
मराठवाड्यात हलका आणि तुरळक पाऊस

औरंगाबाद : सतत दुसऱ्या दिवशीही मराठवाड्यातील बहुतांश मंडळांत मंगळवारी (ता. २६) सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत पावसाची उसंत कायम होती. औरंगाबाद जिल्ह्यात काही मंडळांत दखलपात्र झालेला पाऊस वगळता इतरत्र पावसाची हजेरी ही हलकी व तुरळकच राहिली.

औरंगाबाद जिल्ह्यातील ६५ मंडळांपैकी ४४ मंडळांत मंगळवारी सकाळपर्यंत कमी अधिक प्रमाणात पावसाची हजेरी लागली. जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्‍यांतर्गत येत असलेल्या अंबाई मंडळात सर्वाधिक ५० मिलिमीटर पाऊस झाला. अजिंठा मंडळात २१ मिलिमीटर, सोयगाव तालुक्‍यातील सोयगाव मंडळात ३५ मिलिमीटर, बनोटी १९, वैजापूरातील महालगाव १२, लाडगाव १०, नागमठाण १०, गंगापूरातील वाळूज २२, हर्सूल १८, डोणगाव २०, कन्नडमधील देवगाव रंगारी १५, खुलताबादमधील वेरूळ १२, सुलतानपूर १५, औरंगाबादमधील उस्मानपूरा १५, करमाड १५, कांचनवाडी १०, वरूडकाजी १०, चिकलठाण ११, फुलंब्रीतील फुलंब्री मंडळात १०, आळंद १५, वडोदबाजार मंडळात ११ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात सरासरी ८.६७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. जालना जिल्ह्यात सरासरी १.७१ मिलिमीटर, नांदेड जिल्ह्यात सरासरी २.०९ मिलिमीटर, बीड जिल्ह्यात सरासरी १.१७ मिलिमीटर, लातूर जिल्ह्यात सरासरी १.१८ मिलिमीटर पाऊस झाला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com