नवी दिल्ली : पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याचा संशयित सूत्रधार अब्दुल रशीद गाझी हा जैशे महंम
बातम्या
पुणे ः दीर्घकालीन खंडानंतर पावसाने पुन्हा सुरवात केली आहे. पुणे जिल्ह्यातील बारामती, शिरूर, आंबेगाव, पुरंदर, दौड या दुष्काळी पट्ट्यात पावसाने चांगलीच हजेरी लावली. बारामती तालुक्यातील पणदरे येथे सर्वाधिक ७९ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद बुधवारी (ता. १९) सकाळी आठवाजेपर्यंत झाली. त्यामुळे खरिपातील तूर, कांदा, बाजरी पिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

गेल्या वीस ते पंचवीस दिवसांपासून पुणे जिल्ह्यात पावसाने उघडीप दिली आहे. गेल्या अडीच महिन्यांत जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यातील मावळ, मुळशी, भोर, वेल्हा, जुन्नर, आंबेगाव, खेड तालुक्यांत पावसाने चांगली हजेरी लावली होती. त्यामुळे धरणांत चांगला पाणीसाठा झाला होता. परंतु पूर्व पट्ट्यातील शिरूर, दौड, बारामती, इंदापूर, पुरंदर हे तालुके पावसापासून दूर असल्याचे चित्र होते. मात्र, परतीच्या पावसामुळे या तालुक्यात काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
पश्चिम पट्ट्यातील तालुक्यात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडला. तर पूर्व पट्ट्यातील तालुक्यातील बहुतांशी मंडळात हलका ते मध्यम स्वरूपाच्या सरी बरसल्या. त्यामुळे खरिपातील पिकांना काही प्रमाणात जीवदान मिळाल्याचे चित्र आहे.
पुणे शहर, केशवनगर, कोथरूड, खडकवासला, थेऊर, खेड, कळस, वाघोली येथे हलक्या सरी पडल्या. मुळशीतील मळे, भोरमधील भोर, भोळावडे, नसरापूर, किकवी, संगमनेर, मावळमधील काले, वेल्हा तालुक्यामधील वेल्हा, पानशेत, विंझर, आंबावणे येथे पावसाच्या अधूनमधून सरी कोसळल्या.
जुन्नर तालुक्यातील निमुळगाव, बेल्हा, खेडमधील वाडा, कुडे, कडूस, आंबेगावमधील घोडेगाव, मंचर, शिरूरमधील वडगाव, तळेगाव, रांजणगाव, पाबळ, बारामतीमधील पणदरे, बारामती, वडगाव, लोणी, मोरगाव, सुपा, उंडवडी, इंदापूरमधील अंथुर्णे, सणसर, दौंडमधील पाटस, यवत, केडगाव, वरंवड, दौड, पुरंदरमधील जेजुरी, राजेवाडी, वाल्हा, भिवंडी येथे मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. तर काही ठिकाणी पावसाच्या अधूनमधून सरी पडल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात होते.
- 1 of 565
- ››