agriculture news in marathi, Light rain in Khandesh | Agrowon

खानदेशात ठिकठिकाणी हलका पाऊस
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 21 सप्टेंबर 2018

जळगाव : खानदेशात गुरुवारी (ता. २०) सकाळी आठपर्यंत २५ तालुक्‍यांमधील फक्त आठ तालुक्‍यांमध्ये किरकोळ स्वरूपाचा पाऊस झाल्याची माहिती आहे. यात कुठेही १० मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस झालेला नाही. जळगाव, एरंडोल, धरणगाव भागात हलका पाऊस झाला.

जळगाव : खानदेशात गुरुवारी (ता. २०) सकाळी आठपर्यंत २५ तालुक्‍यांमधील फक्त आठ तालुक्‍यांमध्ये किरकोळ स्वरूपाचा पाऊस झाल्याची माहिती आहे. यात कुठेही १० मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस झालेला नाही. जळगाव, एरंडोल, धरणगाव भागात हलका पाऊस झाला.

धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा व शिरपूर भागात किरकोळ पाऊस झाला. धुळे, साक्रीत मात्र कोरडा दिवस गेला. शिंदखेडा भागात दोंडाईचा येथे सहा मिलीमीटर पाऊस झाला. नंदुरबार जिल्ह्यात नंदुरबार, नवापूर भागात कोरडे वातावरण होते. तळोदा, अक्कलवुडा, धडगाव व शहादा भागात सातपुडा पर्वतालगतच्या काही गावांमध्ये बऱ्यापैकी पाऊस झाला. शहादा व लगतच्या भागात कोरडे वातावरण होते. परंतु, सातपुडा पर्वताकडे किरकोळ स्वरूपाचा पाऊस झाला. शहादा तालुक्‍यातील म्हसावद महसूल मंडळात चार मिलीमीटर पाऊस झाल्याची माहिती मिळाली. तळोदा येथे सात, तर धडगाव भागातही आठ मिलीमीटरपर्यंत पाऊस झाला.

जळगाव जिल्ह्यात एरंडोल, धरणगाव भागात पाच मिलीमीटरपर्यंत पाऊस झाला. जळगाव तालुक्‍यात काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. सात मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याचे सांगण्यात आले. गुरुवारी सकाळी ऊन सावल्यांचा खेळ सुरू होता.

शेतकऱ्यांना जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. रब्बी हंगामाबाबत शेतकरी हवालदील झाले असून, याचा मोठा परिणाम सध्या जाणवू लागला आहे.

इतर बातम्या
वऱ्हाडातील बाजारपेठेत पावसाअभावी...अकोला ः  खरीप तोंडावर आलेला असतानाही...
निताने येथे वीजवाहक तारांच्या... नाशिक  : बागलाण तालुक्यातील निताने येथील...
'वसाका'ची चाके पुन्हा फिरणारनाशिक : वसंतदादा साखर कारखाना, ''धाराशिव''...
‘जानेफळ येथे सोयाबीन पेंड प्रक्रिया...अकोला ः सोयाबीन पेंड प्रक्रिया उद्योग सुरू करून...
अमरावती जिल्ह्‍यात कर्जवाटपात...अमरावती ः जिल्ह्यात गेल्या अडीच महिन्यांत...
सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागात...नाशिक  : सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागात...
फुलंब्री तालुक्‍यात चाराटंचाई तीव्र फुलंब्री, जि. औरंगाबाद : सततच्या...
नदी नांगरणीचे सातपुड्याच्या पायथ्याशी...जळगाव ः शिवार व गावांमधील जलसंकट लक्षात घेता...
जालना जिल्ह्यात शेततळ्यांच्या...जालना : सामूहिक शेततळ्यांचे उद्दिष्ट जालन्याच्या...
प्रत्येक गावात नेमणार भूजल...नगर ः राज्य शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता...
नगर जिल्ह्यात टॅंकरचा आकडा साडेआठशे नगर : जिल्ह्यातील नागरिकांची तहान भागविण्यासाठी...
अरुणाग्रस्तांच्या स्थलांतराचा तिढा कायम सिंधुदुर्ग : अरुणा प्रकल्पग्रस्त आणि जिल्हा...
पाणीप्रश्नावरील आंदोलनाचे नेतृत्व करणार...नगर : ‘कुकडी’सह घोड धरणातील पाणीसाठे वाढविणे...
सांगलीतील आवर्तन बंद होण्याची शक्यतासांगली : वारणा आणि कोयना धरणांतील पाण्याची पातळी...
पुणे जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोटात...पुणे : मॉन्सूनचा पाऊस लांबल्याने जिल्ह्यात...
नांदेड जिल्ह्यात नऊ हजार जमीन...नांदेड  : राष्ट्रीय शाश्वत शेती...
लोकसहभागातून ग्रामविकास अभियान :...सोलापूर  : सोलापूर सोशल फाउंडेशनच्या...
नांदेड जिल्ह्यात पावसाअभावी पेरण्या...नांदेड : जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामासाठी विविध...
आव्हानांवर मात करण्यासाठी कारखान्यांनी...पुणे : साखर उद्योगासाठी यंदाचे वर्ष ‘टर्निंग...
गेल्या खरिपातील सोयाबीनचे बियाणे झाले...परभणी  : २०१८-१९ च्या खरीप हंगामात...