agriculture news in marathi, Light rain in Nashik district | Agrowon

नाशिक जिल्ह्यात हलका मध्यम पाऊस
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 26 जून 2018

नाशिक : नाशिक जिल्ह्यात पावसाने रविवारी (ता.२४) काही ठिकाणी हजेरी लावली तर काही ठिकाणी उघडीप दिल्याची परिस्थिती होती. जिल्ह्यात इगतपुरी, घोटी परिसरासह त्र्यंबकेश्वर, येवला येथे पावसाने हजेरी लावली. तर सटाणा, कळवण, मालेगाव तालुक्यांत विश्रांती घेतली होती.

नाशिक : नाशिक जिल्ह्यात पावसाने रविवारी (ता.२४) काही ठिकाणी हजेरी लावली तर काही ठिकाणी उघडीप दिल्याची परिस्थिती होती. जिल्ह्यात इगतपुरी, घोटी परिसरासह त्र्यंबकेश्वर, येवला येथे पावसाने हजेरी लावली. तर सटाणा, कळवण, मालेगाव तालुक्यांत विश्रांती घेतली होती.

इगतपुरीत बळिराजा सुखावला :
 घोटी, इगतपुरी तालुक्यांत गेल्या काही दिवसांपासून दडून बसलेल्या पावसाला रविवारी (ता. २४) दुपारपासून सुरवात झाली. हा पाऊस दमदार नसला तरी रिपरिप असल्याने वातावरणात काहीसा गारवा निर्माण झाला होता. जिल्ह्यात सर्वाधिक पावसाचा भाग समजल्या जाणाऱ्या इगतपुरी तालुक्यात पावसाने काही अंशी दडी मारली होती. भाताची पेरणी केलेल्या शेतकऱ्यांची प्रतीक्षा या दमदार पावसाने  संपली आहे.  

त्र्यंबकला पर्यटक भिजले :
त्र्यंबकेश्वर : येथे पावसाची रिपरिप सुरू झाली असून, रविवारी (ता. २४) पर्यटनास आलेल्या भाविकांमुळे शहर फुलले होते. त्र्यंबकेश्वरला दुपारनंतर पावसाचे आगमन झाले. दरम्यान, या पावसाने मंदिराच्या पूर्वदरवाजास असलेला कापडी मंडप पडला आहे. त्यामुळे भाविकांना पूर्वीप्रमाणे उत्तर दरवाजाने प्रवेश देण्यात येत आहे. या मार्गावर परिसरातील आदिवासी बांधवांनी पर्यटकांना खाद्यपदार्थ पुरविण्यासाठी झाडांच्या पानांपासून साकारलेले शेड तयार केले आहेत.

येवल्यात शिडकावा :
येवला : दोन दिवसांपूर्वी प्रवेशकर्ते झालेल्या आर्द्राने जोरदार सलामी दिली आहे. शुक्रवारपासून (ता. २२) सुरू झालेल्या पावसाने शनिवारी आणि रविवारी रिपरिप सुरूच ठेवली होती. रविवारी अधूनमधून ढगांचा गडगडाट होताना दुपारनंतर येवला शहर व तालुक्यात पावसाने शिडकावा केला. येवला तालुक्याच्या ग्रामीण भागातील अंदरसूल, मुखेड, पाटोदा परिसरासह सर्वदूर या पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे रखडलेले खरिपाचे चक्र वेगाने पुढे सरकण्यास मदत होणार आहे. तसेच ओस पडलेली बि-बियाण्यांची दुकाने पुन्हा गजबजू लागली आहेत.

इतर ताज्या घडामोडी
संघर्ष गोकुळ ‘मल्टिस्टेट’चाकोल्हापूर जिल्हा दूध संघ (गोकुळ) मल्टिस्टेट...
'दारुमुळे दरवर्षी अडीच लाखापेक्षा जास्त...नवी दिल्ली- दारूमुळे दरवर्षी जवळपास अडीच...
जालन्यात पाण्यात बुडून तिघांचा मृत्यूजालना : गणपती बाप्पांचे विसर्जन करताना जालना...
शिखर, रोहितने पाकला धुतले; भारत अंतिम...दुबई : पाकिस्तानने उभारलेल्या 237 धावांचा सहजी...
खानदेशात मध्यम पाऊस; नंदुरबारला हुलकावणीजळगाव : खानदेशात शुक्रवारी (ता.२१) मध्यरात्री व...
पुणे जिल्ह्यात ढगाळ हवामानपुणे  : जिल्ह्यात आठवड्याच्या सुरवातीला...
खानापूर घाटमाथ्यावर तीव्र पाणीटंचाई सांगली  : घाटमाथ्यावर पावसाने ओढ दिली आहे....
नगर जिल्ह्यात साडेसहा लाख हेक्‍टरवर...नगर  ः जिल्ह्यात रब्बी हंगामात सहा लाख ५२...
कौशल्यावर आधारित उपक्रम ‘रयत’मध्ये सुरू...सातारा  ः केवळ पुस्तकी नव्हे तर कौशल्यावर...
नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचा अकोला...अकोला  ः नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या...
सांगली जिल्ह्यात पाणीप्रश्‍न पेटण्याची...सांगली  : पावसाने दिलेली उघडीप आणि पावसाळा...
अकोला, बुलडाण्यात सर्वदूर पाऊसअकोला   ः वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा या...
सावधान... अल्झायमर आला उंबरठ्यावर ! कोल्हापूर : मंगळवार पेठेतल्या विठ्ठल मंदिरात रोज...
परभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ६०० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला...
भातावरील तुडतुडे प्रादुर्भावाकडे...सध्या खरीप हंगामातील भात पीक बहुतेक ठिकाणी...
कमी तीव्रतेच्या वणव्यांचाही मातीच्या...कमी तीव्रतेचे वणवे किंवा मर्यादित प्रमाणात...
ढगाळ वातावरणाने खानदेशात सोयाबीन मळणीला...जळगाव : खानदेशातील धुळे, नंदुरबार व जळगाव...
माळेगावकरांचा औद्योगिक वसाहतीच्या...नाशिक : माळेगाव औद्योगिक वसाहतीच्या टप्पा क्रमांक...
परभणीत व्यापाऱ्यांचे असहकार आंदोलन सुरूचपरभणी ः परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत...
सांगली जिल्ह्यात द्राक्ष क्षेत्रात वाढसांगली  ः दर्जेदार द्राक्ष उत्पादनासाठी...