वीज पडून मृत्यू आता नैसर्गिक आपत्तीच्या यादीत

नव्या निर्णयानुसार केवळ बाधित व्यक्तींनाच मदत मिळणार अाहे. मात्र पशुधनाचे हाेणारे मृत्यू आणि अपंगत्व यांना नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून हाेत आहे.
वीज पडून मृत्यू आता नैसर्गिक आपत्तीच्या यादीत

पुणे : पावसाळ्यात किंवा अवकाळी पावसात वीज पडून हाेणाऱ्या मृत्यूच्या घटना आता नैसर्गिक आपत्ती ठरणार आहेत. या आपत्तीमध्ये मृत पडणाऱ्या व्यक्तीच्या वारसांना ४ लाख रुपये मदत मिळणार आहे. तर ४० ते ६० टक्के अपंगत्व आलेल्या व्यक्तीला ५९ हजार १०० रुपये, तर ६० टक्क्यांपेक्षा जास्त अपंगत्व आलेल्या व्यक्तीस दाेन लाख रुपये, तर उपचारांसाठी एक आठवड्यापेक्षा जास्त दिवस रुग्णालयात दाखल असल्यास १२ हजार ७०० आणि एक आठवड्यापेक्षा कमी दिवस असल्यास ४ हजार ३०० रुपये मदत मिळणार आहे.

मॉन्सूनच्या आगमनाच्या काळात विजांच्या कडकडाटांसह पाऊस पडताे. अशा काळात वीज पडून अनेकांचा मृत्यू हाेताे. मात्र वीज पडणे ही नैसर्गिक आपत्तीच्या यादी नसल्याने अशा घटनांमध्ये मृत्यू किंवा जखमी झालेल्या व्यक्तींना आणि वारसांना मदतीपासून वंचित राहावे लागत हाेते. यामुळे अशा घटनांमध्ये मृत किंवा जखमी व्यक्तींना मदत मिळावी यासाठी राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने वीज पडून हाेणारे मृत्यू ही राज्य आपत्ती म्हणून घाेषित केली आहे. यामुळे आता वीज पडून मृत किंवा जखमी झालेल्या व्यक्तींना आणि वारसांना मदत मिळणार आहे.

जनावरांचे काय? वीज पडून व्यक्तींचा मृत्यू अथवा जखमी झाल्यास मदत मिळणार आहे. अशा घटनांमध्ये शेतात काम करत असणाऱ्या व्यक्तींबराेबर पशुधनाचा समावेश असताे. नव्या निर्णयानुसार केवळ बाधित व्यक्तींनाच मदत मिळणार अाहे. मात्र पशुधनाचे हाेणारे मृत्यू आणि अपंगत्व यांना नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून हाेत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com