सावधान... वीज, पावसाचा रंगणार खेळ
प्रशांत रॉय
रविवार, 8 ऑक्टोबर 2017

राज्यात हवेचा दाब कमी झाला आहे. येत्या चार ते पाच दिवसात काही ठिकाणी हलका तर काही ठिकाणी विजांसह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
-ए. के. श्रीवास्तव, वैज्ञानिक, आयएमडी, पुणे

पुणे : सोमवार (ता. ९) पर्यंत हवामानात मोठे बदल घडण्याची शक्यता आहे. परिणामी, राज्यातील अनेक भागांत वीज पडण्याच्या घटनांसह वादळी वारे आणि जोरदार पावसाचा अंदाज आहे. यामुळे शेतकऱ्यांनी येत्या दोन ते तीन दिवसांत शेतीमालाची काढणी टाळावी, काढलेला शेतीमाल सुरक्षित ठिकाणी ठेवावा, जनावरांची काळजी घ्यावी आदी सूचना हवामान विभागाने दिल्या आहेत.

हवामान विभागाच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार खरिपातील बहुतांशी पिकांची काढणी झालेली आहे. मूग, उडीद आणि सोयाबीनची काढणी काही ठिकाणी सुरू तर काही ठिकाणी होणार आहे. तर कापसाची काढणी जानेवारी महिन्यापासून सुरू होण्याची शक्यता आहे.

सध्या राज्यातील हवामानात वेगाने बदल होत आहे. ७ ते ९ ऑक्टोबर या कालावधीत ढगांचा गडगडाट, विजेचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यांसह पावसाचा अंदाज आहे. यासाठी शेतककऱ्यांनी सध्या सुरू असलेली पेरणी दोन दिवस थांबवावी, काढणी केलेला शेतीमाल आणि जनावरे सुरक्षित ठेवावी, दोन दिवस काढणीही करू नये. ही खबरदारी घेतल्यास होणाऱ्या दुर्घटना किंवा घटनांपासून बऱ्याच प्रमाणात दिलासा मिळू शकतो.

हवामान खात्याने दिलेला सल्ला

  • वीज पडण्याच्या शक्यतेत वाढ होणार
  • रब्बी पेरणी दोन दिवस थांबवा
  • या काळात पेरणी केल्यास पावसाने पेरणी वाया जाण्याची शक्यता
  • सोसाट्याच्या वाऱ्यांसह मुसळधारेचा अंदाज
  • शेतशिवारात पाणी तुंबु देऊ नका, निचऱ्याची व्यवस्था करा
  • जनावरे आणि शेतीमालास बदलत्या हवामानापासून सुरक्षित ठेवा
तारीखनिहाय असा आहे अंदाज
तारीख विभाग
७ ऑक्टोबर कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ
८ ऑक्टोबर कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ
९ ऑक्टोबर कोकणात, मध्य महाराष्ट्र, विदर्भ

 

इतर अॅग्रो विशेष
‘महाबीज’ करणार २७ जिल्ह्यांत बीजोत्पादनअकोला ः राष्ट्रीय कृषी विस्तार व तंत्रज्ञान...
एक चमचा तेलामुळे शोषली जातील हिरव्या...एक चमचा तेलाचा हिरव्या भाजीसोबत केलेला उपयोग,...
भाजीपाला प्रक्रियेतून उद्योगांना मिळेल...भाजीपाल्यापासून जास्तीत जास्त प्रक्रियायुक्त...
कोल्हापूर जिल्ह्यात सततच्या पावसाने...कोल्हापूर : सततच्या पावसामुळे पिकात पाणी साचून...
मका चारा पीक लगवड तंत्रज्ञान जनावरांच्या आहारात अत्यंत सकस, रूचकर चारा म्हणून...
मुहूर्तालाच खोडाकर्जमाफी शेतकऱ्यांच्या पदरात टाकण्यासाठीचा...
शेतकऱ्यांना प्रक्रिया उद्योग,...पुणे ः ‘‘स्टार्चचे प्रमाण निम्म्यापेक्षा कमी...
उस पिकावरील कीड - रोगांचे नियंत्रणकीड नियंत्रण :  खोड कीड : किडीचा...
आधुनिक बळी जागा झालायदीपावली हा सण भारत वर्षात वेगवेगळ्या रूपात साजरा...
लालकंधारी गोवंश संगोपनासाठी मिळाला...जळकोट, जि. लातूर ः गेल्या अनेक वर्षांपासून...
दुग्धव्यवसायाला दिशा देणारे मॉडर्न...आदर्श व्यवस्थापन (उदा. मुक्त गोठ), आधुनिक...
एकमेका करू साह्य, अवघे धरू सुपंथआजच्या काळातील शेतीतील समस्या पाहिल्या तर...
अनेक कीटकनाशकांवर जगात बंदी; भारतात...नागपूर : मोनाक्रोटोफॉस हे जहाल कीटकनाशक आहे....
संत्र्याचा पीकविमा कर्जखात्यात केला जमाअकोला : संत्रा पिकाच्या नुकसानीसाठी मिळालेली...
बिगरनोंदणीकृत उत्पादने विक्रीवर बंदी...पुणे : कीटकनाशके कायद्यानुसार नोंदणी नसलेली...
महिला शेतकरी कंपनीने थाटला डाळमिल...बुलडाणा ः जिल्ह्यातील महिलांची असलेल्या...
यशवंत सिन्हा आता शेतीसाठी आवाज उठविणारअकोला : अाज देशातील सर्व शेतकऱ्यांना समस्यांपासून...
विदर्भ, खानदेशच्या उत्तर भागांतून...पुणे : गेल्या महिन्यात सुरू झालेल्या परतीच्या...
उस लागवड तंत्रज्ञानआजची सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता पाहता ऊस...
कीटकनाशक विषबाधेचा अहवाल देणे बंधनकारकपुणे : शेतीसाठी कुठेही कीटकनाशकांची हाताळणी अथवा...