अल्प बचत योजनांशी आधार जोडणीसाठी मुदतवाढ

अल्प बचत योजनांशी आधार जोडणीसाठी मुदतवाढ
अल्प बचत योजनांशी आधार जोडणीसाठी मुदतवाढ

नवी दिल्ली: केंद्र सरकारने आता अल्प बचत योजना आधार संलग्न करण्याची मुदत तीन महिन्यांनी वाढवली आहे. आता पोस्टाच्या योजना,किसान विकास पत्र या योजनांशी 31 मार्च 2018पर्यंत आधार क्रमांक जोडता येणार आहे. याआधी आधार क्रमांक अल्प बचत योजनांशी अंतिम तारिख 31 डिसेंबर 2017 पर्यंत होती. केंद्र सरकारने मोबाईल क्रमांक, पॅन कार्ड, बँक ठेवी आणि सरकारचे काही योजनांवरील अनुदान मिळवण्यासाठी आधारशी संलग्न करण्यासाठी बंधनकारक करण्यात आले आहे.

टपाल विभागाच्या बचत योजना, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र, सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी आणि किसान विकास पत्राकरिता आधार क्रमांकाशी जोडण्यासाठी बंधनकारक करण्यात आले. मनुष्यबळ विकास मंत्रालयाला देशातील विद्यापीठ आणि कॉलेजांमध्ये सुमारे 80 हजार बोगस प्राध्यापक आढळून आले आहेत. आधार कार्डची सक्ती केल्यानंतर बोगस प्राध्यापकांची संख्या समोर आली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com