agriculture news in marathi, Livestock Insurance Scheme not implemented this year | Agrowon

पशुधन विमा योजना वर्षभरातच गारद
गोपाल हागे
सोमवार, 27 नोव्हेंबर 2017

अकोला : राज्यात जानेवारी २०१६ मध्ये मोठा गाजावाजा करीत सुरू केलेली पशुधन विमा योजना अवघी वर्षभरातच गुंडाळल्याचे समोर अाले अाहे. चालू अार्थिक वर्षात योजनेचे काम थांबविण्यात अालेले असून, सरकारने पैसे उपलब्ध करून दिले तरच योजनेचे पुढील भवितव्य अवलंबून असल्याचे सांगतिले जात अाहे.

अकोला : राज्यात जानेवारी २०१६ मध्ये मोठा गाजावाजा करीत सुरू केलेली पशुधन विमा योजना अवघी वर्षभरातच गुंडाळल्याचे समोर अाले अाहे. चालू अार्थिक वर्षात योजनेचे काम थांबविण्यात अालेले असून, सरकारने पैसे उपलब्ध करून दिले तरच योजनेचे पुढील भवितव्य अवलंबून असल्याचे सांगतिले जात अाहे.

बुलडाणा जिल्ह्यातील मोताळा येथे जानेवारी २०१६ मध्ये तत्कालीन पशुसंवर्धन मंत्री एकनाथ खडसे यांच्या हस्ते या योजनेचा थाटामाटात राज्यस्तरीय प्रारंभ झाला होता. लाखो रुपयांच्या जाहिराती करीत योजनेची प्रसिद्धी करण्यात अाली. न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीच्या माध्यमातून ही योजना वर्षभर राबविण्यातही अाली. मात्र एक वर्षाचा करार संपल्यानंतर अाता काम ठप्प झालेले अाहे.

राज्यातील पशुपालकांना राष्ट्रीय पशूधन अभियानातंर्गत पशुधनाचा विमा काढण्यासाठी ही योजना सुरू करण्यात अाली होती. सदर योजनेची अंमलबजावणीसाठी अकोला येथे असलेल्या महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ अाणि न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी यांच्यामध्ये करार करण्यात अाला होता. महाराष्ट्रातील ३५ जिल्ह्यांत योजनेची अंमलबजावणी सुरू करण्यात अाली. योजनेअंतर्गत देशी गायी, म्हशी या दुधाळ जनावरांसह शेळया, बोकड, मेंढ्या, ससे, घोडा, गाढव, खेचर, उंट, बैल, वळू व रेडे याचा विमा काढता येत होता.
अनेक वेळा शेतकऱ्यांच्या जनावरांचा आकस्मिक तसेच नैसर्गिक मृत्यू होत असतो. अशावेळी त्याला मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागते. त्यामुळे या योजनेअंतर्गत शेतकऱ्याला, पशुपालकांना दिलासा मिळू लागला असतानाच ही योजना केवळ १५ महिन्यांत शासनाच्या उदासीन धोरण तसेच आर्थिक नियोजन कोलमडल्याने गुंडाळण्यात आल्याचे बोलले जाते.

मिळालेल्या माहितीनुसार सुमारे सव्वा तीन कोटी रुपये केंद्राकडे थकले अाहे. शिवाय योजनेच्या अंमलबजावणीबाबत या वर्षात कुठलेही अार्थिकक नियोजनच करण्यात अालेले नसल्याने ही योजना गुंडाळल्यात जमा झाल्याचे मानले जात अाहे.
वास्तविक या योजनेला सुरवातीला तितकासा प्रतिसाद नव्हता. मात्र प्रशासनाने पुढाकार घेतल्यानंतर मोठ्या प्रमाणात विमा उतरविण्यात अाला. उद्दिष्टापेक्षा अधिक काम झाले. शेतकऱ्यांमध्ये जनजागृती होऊन प्रतिसाद मिळायला लागला होता. योजना ठप्प पडल्याने अाता शेतकऱ्यांना जनावराचा विमा काढायचा असेल तर खासगी पशुविमा काढण्यासाठी मोठी रक्कम मोजावी लागत आहे. उपरोक्त योजनेबाबत कुठलेही अादेश नसल्याने विमा काढण्याचे काम बंद झालेले अाहे. 
 

इतर अॅग्रो विशेष
संत एकनाथ महाराज समाधी दर्शनासाठी...पैठण, जि. औरंगाबाद : पैठण येथील शांतीब्रह्म श्री...
शेतीतील दारिद्र्याचे भीषण वास्तवभारताने खुली व्यवस्था स्वीकारल्याला २०१६ मध्ये २५...
आश्वासक हरभरा; अस्वस्थ उत्पादकराज्यात हरभरा काढणीस महिनाभर आधीपासूनच सुरवात...
इतिहासातील जलसंधारण संकल्पना अन्...मागच्या भागात आपण इतिहासातील सागरी किल्ल्यांवरील...
खानदेशात बाजरी मळणीवरजळगाव : खानदेशात बाजरी पीक मळणीवर आले आहे. आगामी...
शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती : '...मुंबई ः शेतीच्या शाश्वत सुधारणेला गती देण्यासाठी...
सांगली : कडब्याचे दर पोचले साडेचार हजार...सांगली  ः यंदा दुष्काळी स्थिती तीव्र आहे....
सांगली जिल्ह्यात पाण्याअभावी रखडली खरड...सांगली  ः जिल्ह्यातील द्राक्ष हंगाम अंतिम...
ऊस, कापूस पट्ट्यात कष्टाने पिकविली हळद शेतीचा फारसा अनुभव नाही. पण आवड, जिद्द,...
कृषी विद्यापीठांचे वाण वापरण्यात...वाशीम जिल्ह्यातील शिरपूर जैन (ता. मालेगाव) येथील...
राज्यात अद्यापही २४ टक्के ‘एफआरपी’ बाकीपुणे : ऊस खरेदीपोटी राज्यातील शेतकऱ्यांना...
उत्तर प्रदेशात ऊसबिलावरून धुमशाननवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत कोणता मुद्दा...
शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी युवकाचा ‘...नाशिक : राज्यात नापिकी, दुष्काळ, बाजारभाव...
उन्हाचा ताप वाढण्याची शक्यतापुणे : राज्यात उन्हाचा चटका अाणि उकाडा...
जेजुरी गडावर देवाची रंगपंचमीजेजुरी, जि. पुणे : जेजुरी गडावर पारंपरिक...
शेतकरी मंडळामुळे मिळाला ९० लाखांचा...वेंगुर्ले, जि. सिंधुदुर्ग : बॅंकेच्या चुकीमुळे...
कोंबडा झाकला तरी...मा  गील सात वर्षांत कृषी आणि सलग्न क्षेत्रातील...
शेतकऱ्यांची दैनावस्था दूर करणारा...गेल्या अनेक वर्षांत शेती आणि शेतकऱ्यांची जी...
तुरळक ठिकाणी पावसाची शक्यतापुणे : राज्यात उन्हाचा चटका वाढल्याने अनेक ठिकाणी...
शिल्लक साखरेचा दबाव पुढील हंगामावर?कोल्हापूर : केंद्राने सुरू केलेल्या कोटा...