agriculture news in Marathi, livestock insurance scheme stopped, Maharashtra | Agrowon

पशुधन विमा योजना ठप्पच
टीम अॅग्रोवन
बुधवार, 29 नोव्हेंबर 2017

अकोला ः पशुधन विमा योजना काही महिने सुरळीत चालल्यानंतर यंदा एप्रिल महिन्यापासून ठप्प झाली अाहे. ‘ॲग्रोवन’ने याबाबत वृत्त प्रकाशित केल्यानंतर राज्याच्या पशुसंवर्धन विभागात जिल्ह्यापासून मंत्रालयापर्यंत खळबळ उडाली. योजना गुंडाळली नसल्याचे स्पष्ट करत महाराष्ट्र पशुधन विकास मंडळाकडे तीन कोटी १३ लाख रुपये निधी उपलब्ध करून दिल्याचा दावा केला अाहे. 

राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत महाराष्ट्र पशुधन विकास मंडळामार्फत राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एक ऑक्टोबर २०१५ ते ३१ मार्च २०१७ या कालावधीकरिता पशुधन विमा योजना राबविण्यात आली होती.

अकोला ः पशुधन विमा योजना काही महिने सुरळीत चालल्यानंतर यंदा एप्रिल महिन्यापासून ठप्प झाली अाहे. ‘ॲग्रोवन’ने याबाबत वृत्त प्रकाशित केल्यानंतर राज्याच्या पशुसंवर्धन विभागात जिल्ह्यापासून मंत्रालयापर्यंत खळबळ उडाली. योजना गुंडाळली नसल्याचे स्पष्ट करत महाराष्ट्र पशुधन विकास मंडळाकडे तीन कोटी १३ लाख रुपये निधी उपलब्ध करून दिल्याचा दावा केला अाहे. 

राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत महाराष्ट्र पशुधन विकास मंडळामार्फत राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एक ऑक्टोबर २०१५ ते ३१ मार्च २०१७ या कालावधीकरिता पशुधन विमा योजना राबविण्यात आली होती.

या योजनेअंतर्गत केंद्र शासनाकडून चार कोटी ९७ लाख ७९ हजार रुपये व राज्य शासनाकडून तीन कोटी ९४ लाख ५५ हजार रुपये अशा प्राप्त झालेल्या एकूण अाठ कोटी ९२ लाख ३४ हजार रुपये निधीतून दोन लाख ९७ हजार ८६० पशुधनाचा विमा उतरविण्यात आला. त्यानंतर अाता २०१७-१८ मध्ये केंद्र शासनाकडून दोन कोटी रुपये निधी प्राप्त झाला अाहे. त्यामध्ये राज्य हिस्सा मिळून या वर्षात तीन कोटी १३ हजार हजार रुपये उपलब्ध करून देण्यात अाला अाहे, असे स्पष्ट करण्यात अाले आहे.

नवीन करारच नाही
उद्घाटन झाल्यापासून मार्च २०१७ पर्यंत सुरू असलेली पशुधन विमा योजना त्यानंतरच्या काळात ठप्प पडली. पूर्वीच्या कंपनीसोबतचा करार संपुष्टात अालेला अाहे. त्यानंतर योजना पूर्ववत सुरू राहण्यासाठी नवीन करार अस्तित्वात अालेला नाही.

सध्या अकोला येथील महाराष्ट्र पशुधन विकास मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी स्तरावरून ई-निविदा प्रक्रियेद्वारे योजनेच्या अंमलबजावणीसाठी विमा कंपनीची निवड करण्याची प्रक्रिया चालू असल्याचे सांगितले जाते. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर उपलब्ध निधीमधून राज्यात जनावरांचा विमा उतरविण्याचे कामकाज सुरू करण्यात येणार आहे, असेही विभागाने कळविले आहे; मात्र एकीकडे ‘गतिमान’ शासनाचा दावा केला जात असताना गेले अाठ महिने करार न होणे, हे एकूण यंत्रणांच्या कार्यक्षमतांवर प्रश्न चिन्ह उभे करत अाहे.

जूनही या प्रक्रियेला किती दिवस लागतील व विमा उतरविण्याचे काम कधी सुरू होईल याबाबत स्पष्ट उत्तर विभागाच्या अधिकाऱ्यांकडे उपलब्ध नाही.

कंपन्यांना घेण्यात रस, देण्यात नाही
पीक विम्याप्रमाणेच पशुधन विम्याबाबतही शेतकऱ्यांचा अनुभव फारसा चांगला नाही. पशुधन विमा काढलेल्या जनावरांचा मृत्यू झाल्यानंतर शेतकऱ्यांनी जेव्हा जेव्हा दावे सादर केले, त्या वेळी अनेक चकरा माराव्या लागल्या. कंपनीकडून सहजपणे क्लेम मंजूर केला जात नव्हता, असे एका पशुवैद्यकीय अधिकाऱ्याने नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर सांगितले. अाम्ही संबंधित अधिकाऱ्यांना तीन-चार वेळा सांगूनही क्लेमसाठी विलंब केला जात होता. कंपन्यांना विमा घेण्यात रस असतो, क्लेम देण्यात नाही, असेही या अधिकाऱ्याने सांगितले.

इतर अॅग्रो विशेष
साखर विक्री मूल्य ३१ रुपये करण्यासाठी...पुणे : राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी...
खरीप, केळी पीकविम्याच्या परताव्यापासून...जळगाव  : प्रधानमंत्री खरीप पीकविमा योजनेत...
खोजेवाडीत लोकसहभागातून जनावरांची छावणीनगर : दुष्काळाने होरपळ होत असलेल्या भागात शासनाने...
जमीन सुपीकता, नियोजनातून साधली शेतीमांजरी (जि. पुणे) येथील माधव आणि सचिन हरिलाल घुले...
मोकळ्या माळरानावर हिंडवतूया...चारा द्या...सांगली ः दूध इकून दौन पैकं मिळत्याती म्हणून...
मंगेशी झाली वंचितांची मायउपेक्षितांच्या जगण्याला अर्थ प्राप्त करून...
गेल्या वर्षीच्या अवकाळीपोटी साठ लाखांची...मुंबई : गेल्या वर्षी मार्च महिन्यात...
उत्तर प्रदेश, हरियाना, पंजाबप्रमाणे...पुणे : जागतिक साखरेचे बाजार आणि खप विचारात घेता...
पूर्व विदर्भात पावसाला पाेषक हवामानपुणे : बंगालच्या उपसागरातील वादळी स्थिती, कोकण...
कांदा दरप्रश्नी पंतप्रधानांना साकडेनाशिक : कांद्याला उत्पादन खर्चावर आधारित...
खानदेशात चाराटंचाईने जनावरांची होरपळ...जळगाव : जिल्ह्यात रोज लागणाऱ्या चाऱ्यासंबंधी...
अडत्याकडून ‘टीडीएस’ कपातीची बाजार...धुळे  : शेतकऱ्यांकडून शेतमाल विक्रीनंतर...
अमरावती विभागात महिन्यात हजारवर शेतकरी...अकोलाः सततची नापिकी, कर्जबाजारीपणा आणि या वर्षी...
‘शेतकऱ्यांच्या प्रश्नी आमदार-...परभणी  : उसाला एफआरपीनुसार दर देण्यात यावा,...
ऊसरसात शर्कराकंदाचे मिश्रण शक्यपुणे : राज्यातील साखर कारखान्यांचा घटलेला गाळप...
जागरूक व्यवहारासाठी माहितीचा अधिकारगाव आणि तालुका पातळीवर शेती क्षेत्राशी संबंधित जी...
पाण्यावर पहाराविहीर अथवा बोअरवेल खोदाईवर नियंत्रण, अधिक खोल...
विदर्भात उद्यापासून पावसाची शक्यता;...पुणे : बंगालच्या उपसागरात तयार होत असलेली...
मराठवाड्यात रब्बी पिकांची होरपळ सुरूऔरंगाबाद : मराठवाड्यातील पेरणी झालेल्या रब्बी...
खानदेशातील विहिरींच्या पाणीपातळीत घटधुळे : अत्यल्प पावसामुळे खानदेशातील...