agriculture news in marathi, Livestock losses by elephants and elephants | Agrowon

गवा अाणि हत्तीकडून शेतीपिकांचे नुकसान
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 28 जून 2018

आजरा, जि. कोल्हापूर ः पावसाने समाधानकारक सुरवात केल्याने तालुक्‍यात शेतकऱ्यांमध्ये चैतन्याचे वातावरण आहे. भात, ऊस पीक तरारले आहे. हे चित्र एकीकडे समाधानकारक असले तरी दुसरीकडे वन्यप्राण्यांचे संकट कायम आहे. तालुक्‍याच्या पश्‍चिम व दक्षिण भागात गव्याकडून भाताचे तरवे फस्त होत आहेत, तर हत्तीकडून तुडवले जात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर भात रोपलावणीची चिंता लागली आहे.

आजरा, जि. कोल्हापूर ः पावसाने समाधानकारक सुरवात केल्याने तालुक्‍यात शेतकऱ्यांमध्ये चैतन्याचे वातावरण आहे. भात, ऊस पीक तरारले आहे. हे चित्र एकीकडे समाधानकारक असले तरी दुसरीकडे वन्यप्राण्यांचे संकट कायम आहे. तालुक्‍याच्या पश्‍चिम व दक्षिण भागात गव्याकडून भाताचे तरवे फस्त होत आहेत, तर हत्तीकडून तुडवले जात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर भात रोपलावणीची चिंता लागली आहे.

गेले पंधरा दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा तालुक्‍यात दमदार सुरवात केली आहे. आज दिवसभर तालुक्‍यात पाऊस कोसळत होता. पण तरारलेल्या पिकांमध्ये गव्याचे कळप उतरू लागले आहेत. भाताचे तरवे हे कळप फस्त करीत आहेत. यात जंगलालगत असलेल्या शेतीचे मोठे नुकसान होत आहे. पेरणोली व गवसे परिसरात गव्यांच्या कळपांनी धुमाकूळ घातला आहे.

भाताचे रोपलावणीसाठी तरारलेले तरवे गवे खात आहेत. पेरणोलीपैकी नावलकर वाडी येथील सदाशिव नावलकर यांचा एक एकराचा भाताचा तरवा गव्यांच्या कळपाने फस्त केला. वेळवट्टी परिसरात टस्कर  हत्ती भाताच्या तरव्याचे तुडवत गेल्याचे शेतकरी सांगतात. येथील पृथ्वीराज महागावकर यांच्या शेतातील भाताचा तरव्याचे हत्तीने तुडवून नुकसान केले. त्यामुळे भात रोपलावणीच्या वेळी शेतकऱ्यांची मोठी अडचण होणार आहे. वन विभागाने हत्ती व गव्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.

एक एकर शेतासाठी भाताचा तरवा केला होता. महागाचे भात बियाणे पेरले होते. ते चांगले तरारले होते. गव्याच्या कळपाने तरव्याचे नुकसान केले आहे. यामुळे रोपलावण करावयाची कशी, हा प्रश्‍न आहे.
- सदाशिव नावलकर, शेतकरी.

इतर ताज्या घडामोडी
सरकारच्या ताफ्यात एक हजार इलेक्‍ट्रिक...मुंबई - राज्य सरकारच्या ताफ्यात एक हजार इलेक्‍...
पाचल ठरले स्मार्ट ग्रामरत्नागिरी - शासनाच्या स्मार्ट ग्राम...
पंचगंगा प्रदूषणप्रश्‍नी आयुक्तांना नोटीसकोल्हापूर - जयंती नाल्याचे सांडपाणी थेट...
पदोन्नतीत आरक्षणाचा मार्ग मोकळा;...नवी दिल्ली- अनुसुचित जाती जमातीच्या कर्मचाऱ्यांना...
मुलींना बारावीपर्यंत एसटीचा मोफत पासमुंबई - एसटी महामंडळामार्फत ग्रामीण भागातील...
असा होईल गोकुळ दूध संघ ‘मल्टिस्टेट'कोल्हापूर - जिल्हा सहकारी दूध उत्पादक सहकारी...
वयाच्या 86 वर्षीही सक्रीय राजकारणात डॉ...नवी दिल्ली - देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन...
ड्रोनमुळे कृषी क्षेत्रात क्रांती घडेल...लातूर : वेगवेगळ्या कारणामुळे कृषी क्षेत्र...
लागवड लसूणघासाची...लागवडीसाठी मध्यम ते भारी, चांगला निचरा होणारी,...
जळगाव बाजार समितीत चवळी प्रतिक्विंटल...जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
जलयुक्त शिवारातील जलसंचय सुद्धा आटलाजळगाव : जिल्ह्यात झालेल्या जलयुक्त शिवारच्या...
‘स्वाभिमानी’ची २७ ऑक्‍टोबरला जयसिंगपूर...कोल्हापूर  : यंदाच्या हंगामात ऊस उत्पादकांना...
इंधन दरवाढीच्या निषेधार्थ नगर येथे...नगर  : ``राफेल विमान खरेदीत एक हजार कोटींचा...
तूर, हरभऱ्याच्या चुकाऱ्यासाठी परभणी...परभणी  ः आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत...
साताऱ्यातील सोयाबीन उत्पादक...सातारा  ः जिल्ह्यात सोयाबीनची काढणी सुरू...
पुणे विभागात पाणीटंचाई वाढलीपुणे  : पावसाने दडी मारल्याने पुणे विभागात...
पाऊस नसल्याने नगर जिल्ह्यात ऊस लागवडीवर...नगर   ः जिल्ह्यात यंदा आतापर्यंत ३३ हजार १२३...
वऱ्हाडात उडीद, मुगासाठी खरेदी केंद्रे...अकोला  ः या भागात सध्या मूग, उडदाचा हंगाम...
जळगाव जिल्ह्यात नवती केळीचे दर स्थिरजळगाव ः जिल्ह्यात नवती केळीचे दर मागील आठवड्यात...
कोल्हापुरात फळांची आवक मंदावली,...कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...