agriculture news in marathi, loadsheding in rural area, pratap hogade, mumbai | Agrowon

बेकायदा भारनियमनाने ग्रामीण भागाची फसवणूक : होगाडे
विजय गायकवाड
मंगळवार, 10 ऑक्टोबर 2017

दरवर्षी ३ हजार कोटी अतिरिक्त देऊनही ग्राहकांच्या डोक्‍यावर भारनियमन मारले आहे. जमत नसेल तर ग्राहकांना ३ हजार कोटी रुपये परत करा.
- प्रताप होगाडे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य वीजग्राहक संघटना

मुंबई : महावितरणच्या भोंगळ, नियोजनशून्य कारभारामुळे राज्यावर भारनियमनाचे संकट उद्भवले आहे. २५०० मेगावॉट विजेचा तुटवडा असताना ५००० मेगावॉट विजेचा तुटवडा असल्याचे सांगून ग्रामीण महाराष्ट्राची फसवणूक केली जात आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य वीजग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे यांनी दिली.

श्री. होगाडे म्हणाले, की जनतेच्या वाढत्या रोषानंतर महावितरणच्या अ आणि ब ग्राहक श्रेणीतील भारनियमन टप्प्याटप्प्याने मागे घेण्यात आले आहे. त्यामुळे मुंबई उपनगर, ठाणे, नवी मुंबईतील वीजग्राहकांना थोडासा दिलासा मिळाला. पण उर्वरित क ते जी ३ या ग्राहक श्रेणीतील सर्व भारनियमन मागे घेतले पाहिजे. वास्तविक विजेचा तुटवडा २५०० मेगावॉट आहे.

त्यानुसार मंजूर भारनियमन न करता महावितरण मनमानी पद्धतीने भारनियमन करत असल्याचे त्यांनी सांगितले. उन्हाळ्यात १९००० मेगावॉट वीज देणाऱ्या महावितरणला पावसाळ्यात १५४०० मेगावॉट वीजही देता येत नाही. त्यामुळे महावितरणाच्या बेकायदा भारनियमनाला आव्हान देणारी याचिका दाखल करणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य वीजग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे यांनी दिली.

नियोजनाअभावी बट्ट्याबोळ
पुरेशा वीजपुरवठ्यासाठी एकतर बंद ठेवलेले प्रकल्प सुरू करून पुरेशी वीज उपलब्ध करून दिली पाहिजे. विलंब लागत असेल तर बाजारातून अथवा खासगी पुरवठादारांकडून अल्प मुदतीने वीज खरेदी करून ग्राहकांना दिली पाहिजे. दरवर्षी सणासुदीच्या काळात विजेची मागणी वाढते हे जगजाहीर आहे. तरीही ग्राहकांना पुरेशी वीज देता येत नाही. विजेचा बट्ट्याबोळ हा केवळ योग्य नियोजनाअभावी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

इतर ताज्या घडामोडी
'टीम देवेंद्र'चा विस्तार; विखे पाटील,...मुंबई : आगामी विधानसभा निवडणूक ऐन तोंडावर आली...
ऊस बिलासाठी शेतकऱ्यांचा पाचपुतेंच्या...श्रीगोंदे : काष्टी येथील माजी मंत्री बबनराव...
खरेदीदारांच्या इच्छेवर पॅकेजिंगचा पडतो...एखादा खाद्यपदार्थ लोकांना आकर्षित ...
नगरमध्ये छावणीचालकांसाठी आणखी ६ कोटींचा...नगर : पशुधन जगविण्यासाठी छावणीचालकांचे अर्थचक्र...
सांगली जिल्ह्यात खरीप पेरा रखडलासांगली : जिल्ह्यात वळीव पावसाने दडी मारली,...
केंद्र आणि राज्याच्या मंत्र्यांना कांदे...नाशिक  : अगोदरच मागील कांदा विक्रीचे अनुदान...
सहलींच्या बचत निधीतून होणार आंबा फवारणी...रत्नागिरी : ग्रास कटर, आंबा फवारणी मशिनला...
मराठवाड्यात चार दिवसांत लाखभर लोक...औरंगाबाद : लांबलेला पाऊस, भूपृष्ठावरील जलसाठ्यांत...
पणन सुधारणा विधेयक पावसाळी अधिवेशनात...पुणे  ः शेतीमाल पणन सुधारणांमधील...
पुणे बाजार समिती पुनर्विकासाला गतीपुणे : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
कारखान्यांना ‘सहवीज’मधून १०४१ कोटींचे...पुणे  : राज्यातील साखर कारखान्यांनी सहवीज...
खानदेशात उष्णतेचा कहर; पावसाची...जळगाव  ः खानदेशात वादळी पाऊस वगळता कुठेही...
शकूबाईंच्या लढ्याला आले यश;  वनजमीन...वणी, जि. नाशिक  : शेतकरी व आदिवासींच्या...
मराठवाड्यातील चार जिल्ह्यांत चारा...औरंगाबाद  ः दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर...
उन्नत शेती अभियानात १५ दिवसांत १९ लाख...मुंबई : राज्यात उन्नत शेती - समृद्ध शेतकरी...
पाणी जिरविण्यासाठी नदीपात्र नांगरण्याचा...अमरावती  ः भूगर्भात पाणी मुरून पातळी वाढावी...
काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी...मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसने...
राज्य मंत्रिमंडळाचा आज विस्तार मुंबई : होणार होणार म्हणून गेले काही...
मोठ्या गटांसाठी व्यवस्थापन समितीची...शेती शाश्वत व किफायतशीर होण्यासाठी एकट्याने...
पीकविमा न मिळालेल्या शेतकऱ्यांसाठी मदत...मुंबई : राज्यातील अनेक शेतकऱ्यांना...