agriculture news in marathi, loan defaulter before 31 july 2017 will be benefited for loanwaiver scheme | Agrowon

शेतकरी कर्जमाफीचा ३१ जुलै २०१७ पर्यंतच्या थकबाकीदारांना मिळणार लाभ
सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 8 डिसेंबर 2017

पुणे : राज्य सरकारच्या ‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान’ योजनेंतर्गत ३१ जुलै २०१७ पर्यंतच्या थकबाकीदारांनाही कर्जमाफी योजनेत समाविष्ट करून घेतले जाणार आहे. याशिवाय दीड लाख व त्यापेक्षा अधिक कर्जाची एकरकमी परतफेड आणि थकीत, उर्वरित हप्त्यांची रक्कम ३१ डिसेंबरपर्यंत भरणाऱ्यांनाही कर्जमाफीचा लाभ दिला जाईल, असा धोरणात्मक निर्णय राज्य सरकारकडून गुरुवारी जाहीर करण्यात आला.

पुणे : राज्य सरकारच्या ‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान’ योजनेंतर्गत ३१ जुलै २०१७ पर्यंतच्या थकबाकीदारांनाही कर्जमाफी योजनेत समाविष्ट करून घेतले जाणार आहे. याशिवाय दीड लाख व त्यापेक्षा अधिक कर्जाची एकरकमी परतफेड आणि थकीत, उर्वरित हप्त्यांची रक्कम ३१ डिसेंबरपर्यंत भरणाऱ्यांनाही कर्जमाफीचा लाभ दिला जाईल, असा धोरणात्मक निर्णय राज्य सरकारकडून गुरुवारी जाहीर करण्यात आला.

शेतकऱ्यांच्या राज्यव्यापी आंदोलनानंतर सरकारने जून महिन्यामध्ये कर्जमाफी योजना जाहीर केली. पीक कर्ज व अन्य शेती कर्जासाठी जिल्हा मध्यवर्ती बॅंका आणि व्यापारी बॅंकांकडून घेतलेले दीड लाखापर्यंतचे कर्ज माफ करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. तसेच कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रक्कम म्हणून २५ हजार रुपये देण्याचाही निर्णय घेतला होता.

थकबाकीदार शेतकऱ्यांचे अल्प, अत्यल्प भू-धारक याप्रकारे जमीन धारणेचे क्षेत्र विचारात न घेता कर्जमाफीचे लाभ देण्यात येणार असल्याचे घोषित केले होते; परंतु विहित मुदतीनंतर व्याजाची जबाबदारी ज्या-त्या जिल्हा मध्यवर्ती बॅंकांवर सोपविल्यामुळे अतिरिक्त व्याजाचा बोजा बॅंकांवर येणार होता. परिणामी, बॅंकांच्या सर्व खातेदारांच्या लाभांशातून ही रक्कम भरावी लागली असती.

कर्जमाफीच्या पहिल्या आदेशामध्ये ३० जून २०१६ रोजी थकीत असलेले मुद्दल व व्याजासह दीड लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्यात यावे, असे म्हटले होते. दीड लाखापेक्षा अधिक थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांसाठी ‘एकवेळ समझोता योजना’ (वन टाइम सेटलमेंट) जाहीर केली. यात कर्जदाराने दीड लाखाच्या वरील रक्कम एकरकमी भरावी, अशी अट घातली होती. यात ३४ हजार कोटींची कर्जमाफी जाहीर केली होती. त्यानंतर या आदेशात काही बदल केले.

२०१५-१६ या आर्थिक वर्षात घेतलेल्या पीक व मध्यम मुदत कर्जाची परतफेडीची तारीख ३० जून २०१६ नंतर येत होती. तसेच २०१६-१७ या आर्थिक वर्षात घेतलेल्या पीक व मध्यम मुदत कर्जाची परतफेडीची तारीख ३१ जुलै २०१७ नंतर आली. त्यामुळे तांत्रिक कारणास्तव पात्र शेतकरी कर्जमाफीच्या लाभापासून वंचित राहू नयेत, यासाठी गुरुवारी नवीन शासननिर्णय जाहीर करण्यात आला.

महिना अखेरपर्यंत भरा थकीत रक्‍कम
एक एप्रिल २००९ ते ३१ मार्च २०१६ या कालावधीतील वाटप केलेल्या पीक कर्जापैकी ३० जून २०१६ पूर्वी किंवा नंतर पुनर्गठित-फेरपुनर्गठित झालेल्या कर्जांचे ३१ जुलैपर्यंतचे कर्ज थकीत असलेल्या थकबाकीदार शेतकऱ्यांचा या योजनेत समावेश केला आहे. थकीत कर्जाची रक्कम दीड लाखांपेक्षा अधिक असेल तर थकीत पीक कर्जासह पुनर्गठनाची-फेरपुनर्गठनाची रक्कम ३१ डिसेंबर २०१७ पर्यंत भरल्यास त्यांना दीड लाखापर्यंतची कर्जमाफी दिली जाईल. त्याबाबतचा निर्णय गुरुवारी जाहीर करण्यात आला.

इतर अॅग्रो विशेष
साखर विक्री मूल्य ३१ रुपये करण्यासाठी...पुणे : राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी...
खरीप, केळी पीकविम्याच्या परताव्यापासून...जळगाव  : प्रधानमंत्री खरीप पीकविमा योजनेत...
खोजेवाडीत लोकसहभागातून जनावरांची छावणीनगर : दुष्काळाने होरपळ होत असलेल्या भागात शासनाने...
जमीन सुपीकता, नियोजनातून साधली शेतीमांजरी (जि. पुणे) येथील माधव आणि सचिन हरिलाल घुले...
मोकळ्या माळरानावर हिंडवतूया...चारा द्या...सांगली ः दूध इकून दौन पैकं मिळत्याती म्हणून...
मंगेशी झाली वंचितांची मायउपेक्षितांच्या जगण्याला अर्थ प्राप्त करून...
गेल्या वर्षीच्या अवकाळीपोटी साठ लाखांची...मुंबई : गेल्या वर्षी मार्च महिन्यात...
उत्तर प्रदेश, हरियाना, पंजाबप्रमाणे...पुणे : जागतिक साखरेचे बाजार आणि खप विचारात घेता...
पूर्व विदर्भात पावसाला पाेषक हवामानपुणे : बंगालच्या उपसागरातील वादळी स्थिती, कोकण...
कांदा दरप्रश्नी पंतप्रधानांना साकडेनाशिक : कांद्याला उत्पादन खर्चावर आधारित...
खानदेशात चाराटंचाईने जनावरांची होरपळ...जळगाव : जिल्ह्यात रोज लागणाऱ्या चाऱ्यासंबंधी...
अडत्याकडून ‘टीडीएस’ कपातीची बाजार...धुळे  : शेतकऱ्यांकडून शेतमाल विक्रीनंतर...
अमरावती विभागात महिन्यात हजारवर शेतकरी...अकोलाः सततची नापिकी, कर्जबाजारीपणा आणि या वर्षी...
‘शेतकऱ्यांच्या प्रश्नी आमदार-...परभणी  : उसाला एफआरपीनुसार दर देण्यात यावा,...
ऊसरसात शर्कराकंदाचे मिश्रण शक्यपुणे : राज्यातील साखर कारखान्यांचा घटलेला गाळप...
जागरूक व्यवहारासाठी माहितीचा अधिकारगाव आणि तालुका पातळीवर शेती क्षेत्राशी संबंधित जी...
पाण्यावर पहाराविहीर अथवा बोअरवेल खोदाईवर नियंत्रण, अधिक खोल...
विदर्भात उद्यापासून पावसाची शक्यता;...पुणे : बंगालच्या उपसागरात तयार होत असलेली...
मराठवाड्यात रब्बी पिकांची होरपळ सुरूऔरंगाबाद : मराठवाड्यातील पेरणी झालेल्या रब्बी...
खानदेशातील विहिरींच्या पाणीपातळीत घटधुळे : अत्यल्प पावसामुळे खानदेशातील...