agriculture news in marathi, Loan by the District Bank after sowing farmers | Agrowon

नाशिक जिल्हा बँकेतर्फे शेतकऱ्यांना पेरण्यानंतर कर्ज
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 2 ऑक्टोबर 2018

नाशिक : खरीप हंगामातील पीककर्ज वितरणास येत्या ३१ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने घेतला आहे. यामागे शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा हेतू असला तरी पेरण्या आटोपल्यानंतर कर्जवाटप केल्याचा शेतकऱ्यांना फायदा होणार का, याविषयी साशंकता आहे.

नाशिक : खरीप हंगामातील पीककर्ज वितरणास येत्या ३१ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने घेतला आहे. यामागे शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा हेतू असला तरी पेरण्या आटोपल्यानंतर कर्जवाटप केल्याचा शेतकऱ्यांना फायदा होणार का, याविषयी साशंकता आहे.

जिल्हा बँकेतर्फे खरीप पीककर्ज वितरणासाठी ३४७ कोटी ८० लाख रुपये लक्ष्यांक देण्यात आला होता. प्रत्यक्षात २३ हजार ४१ सभासदांना ३१४ कोटींचे पीककर्ज वाटप झाले. म्हणजेच लक्ष्यांकाच्या ९० टक्के पीककर्ज दिल्याचा बँकेचा दावा आहे. खरिपाची कर्जवाटपाची मुदत ३० सप्टेंबरपर्यंत होती. ऑक्टोबरपासून रब्बी हंगामासाठी कर्जवाटप होते. बँकेने मात्र ३१ ऑक्टोबरपर्यंत खरीप कर्जवाटप करण्याचा घेतलेला निर्णय अनाकलनीय ठरला आहे.

खरिपाच्या पेरण्या कधीच आटोपल्या असताना आता कर्ज घेऊन फायदा काय, असा प्रश्‍न शेतकऱ्यांना पडला आहे. मुदतवाढ म्हणजे, वरातीमागून घोडे असल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. जिल्ह्यात समाधानकारक पाऊस नसल्याने बहुतांश शेतकरी सभासदांना पीककर्ज घेता आले नसल्याचे कारण बँकेने पुढे केले आहे.

बडे थकबाकीदार लक्ष्य

ऐपतदार, मोठे बागायतदार व हेतुपुरस्सर कर्ज थकविणाऱ्या १० लाखांवरील मोठ्या १०० थकबाकीदारांची यादी वर्तमानपत्रात प्रसिद्ध करून थकबाकी भरण्याचे आवाहन करण्यात आलेले होते. बँकेचे आजी-माजी सेवक, विविध आदिवासी विकास संस्थांचे आजी-माजी सचिव यांनीही कर्ज भरले नाही. बँकेमार्फत थेट कर्ज घेतलेले व थकबाकी कर्जदारांविरुद्ध सहकार न्यायालयात कायदा कलम ९१ अन्वये दावे दाखल करण्याबाबत बँकेने निर्णय घेतला असून,  प्राधिकृत अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत.

इतर बातम्या
आर. आर. पाटील यांचे स्मारक युवकांना...सांगली   ः आर. आर. पाटील यांनी ग्रामविकास,...
मराठवाड्यात रब्बीची केवळ १९ टक्‍केच...औरंगाबाद : मराठवाड्यात यंदा दुष्काळाची छाया किती...
शेतकऱ्यांचा आंदोलनानंतर आत्मदहनाचा...राशीन, जि. नगर : कुकडीच्या आवर्तनाचा कालावधी...
सोलापुरात ‘स्वाभिमानी'चे उपोषणकर्ते...सोलापूर : गतवर्षीच्या हंगामातील थकीत एफआरपी...
जळगाव जिल्हा परिषद पाणी योजनांचे वीज...जळगाव : पाणी योजनांचे बिल भरण्यात आले नसल्याने...
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनीद्वारे...परभणी : उच्चदाब वितरण प्रणाली योजनेअंतर्गत...
केळीच्या आगारातून आखातात जाणार ४००...जळगाव ः केळीचे आगार असलेल्या जळगाव जिल्ह्यातून...
दर घसरल्याने कोल्हापुरात उत्पादकांकडून...कोल्हापूर : येथील बाजार समितीत सौदे सुरू असताना...
महाकॉट ब्रॅण्डची चमक पडली फिकीजळगाव ः पूर्व विदर्भ, उत्तर मराठवाडा व खानदेशातील...
बुलडाण्यातील ८ तालुके, २१ मंडळांत...बुलडाणा : कमी पावसामुळे जिल्ह्यात सर्वत्र...
दुष्काळ, मराठा आरक्षण अधिवेशनात गाजणारमुंबई : उद्यापासून (ता. १९) मुंबईत सुरू होत...
‘सीसीआय’ची कापूस खरेदी मंगळवारपासून...जळगाव : कापूस खरेदीसंबंधी जिनिंगमध्ये केंद्र...
दक्षिण कोकण, पश्‍चिम महाराष्ट्रात आज...पुणे : दक्षिण भारतामध्ये असलेल्या ‘गज’...
थंडी वाढण्यास हवामान घटक अनुकूलमहाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब...
दुष्काळी उपाययोजनांसाठी कोरड्या धरणात...बीड : मराठवड्यातील सर्वात तीव्र दुष्काळी...
परभणी जिल्ह्यात ३४ हजार ३९२ हेक्टरवर...परभणी : जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामात मंगळवार...
शेतकऱ्यांच्या विधवांचे २१ला मुंबईत...मुंबई : देशभरात विविध शेतकऱ्यांचे मोर्चे...
खानदेशात कांदा लागवड निम्म्याने...जळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड...
नाशिक जिल्ह्यात ४० हजार क्विंटल...नाशिक : एप्रिल महिन्यापासून शिधापत्रिकाधारकांना...
राज्यातील धरणांमध्ये ५५ टक्के पाणीसाठापुणे   : राज्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढू...