agriculture news in Marathi, loan recovery of kolhapur District bank, Maharashtra | Agrowon

कोल्हापूर जिल्हा बॅंकेची सेवा सोसायट्यांमार्फत कर्जवसुली सुरू
टीम अॅग्रोवन
बुधवार, 28 मार्च 2018

माझे पीककर्ज असले तरी ते मी वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. नातेवाइकांकडून पैशाची जुळणी करून कर्ज नूतनीकरण करण्याला मी प्राधान्य दिले आहे. जिल्हा बॅंकेच्या वतीने सूचना देण्यात येत असल्या तरी सक्तीने कोणती कारवाई झालेली नाही
- रमेश पाटील, शेतकरी, गडहिंग्लज

कोल्हापूर : जिल्ह्यात थेट वसुलीपेक्षा संस्थांच्या पातळीवरच पीककर्ज असल्याने उसाच्या बिलातून थेट वसुली होत आहे. ज्या कारखान्यांची बिले अडकली आहेत, त्यांची वसुली अद्याप झाली नसली, तरी वसुलीसाठी जिल्हा बॅंकेने कुठेच फारसा तगादा लावला नसल्याची स्थिती आहे. 

 कोल्हापूर जिल्ह्यात जिल्हा बॅंकेच्या सोसाट्यांमार्फत कर्ज दिले जाते. उसाची बिले गेल्यानंतर बिलातूनच कर्जवसुली करण्याची येथील सोसायट्यांची पद्धत आहे. यामुळे ज्यांचा ऊस गेला आहे. त्या शेतकऱ्यांचे कर्ज वजा जाऊनच शेतकऱ्यांच्या हातात उर्वरित रक्कम पडते. यामुळे बॅंकेत रोख रक्कम भरावयाला लागत नाही. परिणामी जिल्हा बॅंकेच्या मार्फत ही फारशी सक्ती केली जात नाही. ज्यांची बिले अद्याप जमा झाली नाहीत, ते शेतकरी मात्र नवे जुने करून कर्जाचे नूतनीकरण करून घेत आहेत. मात्र यासाठीही बॅंकेने सक्ती केली नसल्याचे बॅंकेच्या सूत्रांनी सांगितले. सोसायट्यांच्या मार्फत थकबाकी असणाऱ्या शेतकऱ्यांना सूचना दिल्या जात असल्या तरी सक्ती केली जात नसल्याचे बॅंकेनी सांगितले. 

खासगी बॅंकेच्या प्रतिनिधींनी मात्र वसुलीसाठी जोर लावला आहे. खासगी बॅंकेचे कर्मचारी मात्र शेतकऱ्यांकडे कर्जवसुलीसाठी हेलपाटे मारत असल्याचे चित्र आहे. यामुळे इकडून तिकडून पैशाची जुळवाजुळव करून कर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांची गडबड सुुरू आहे. अनेक नातेवाइकांनाही काही कालावधीसाठी मदत करण्याची मागणी शेतकऱ्यांच्या पातळीवर केली जात आहे. 

इतर अॅग्रो विशेष
जिल्हा परिषदेतील कृषी अधिकारी यांना...मुंबई : जिल्हा परिषदेतील कृषी अधिकारी (गट-क...
प्रथिनांचा उत्तम स्राेत ः गुणवंत चारापीकराहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाने...
मुंबईसह शेजारील शहरांत सेंद्रिय...मुंबईसह शेजारील शहरांमध्ये सेंद्रिय उत्पादनांना...
ऊसतोड मजूरांच्या मागण्यांबाबत लवादाची...मुंबई :  राज्यातील ऊसतोड मजूर व कामगारांच्या...
मॉन्सूनची माघार शनिवारपासूनपुणे : नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (माॅन्सून)...
सेंद्रिय शेतीसाठी शासनाच्या विविध योजनासेंद्रिय शेती आणि पीक उत्पादनवाढीसाठी राज्य आणि...
‘जलयुक्त’ गैरव्यवहाराची फाइल पुन्हा...पुणे : जलयुक्त शिवार योजनेत बीड जिल्ह्यात...
महसूल उत्पन्न सूत्राचे ऊसदरामध्ये...पुणे : महसुली उत्पन्न विभागणीनुसार राज्यातील...
तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाजपुणे : ‘दाये’ चक्रीवादळ निवळून गेल्यानंतर राज्यात...
मोदींनी सर्वात मोठी आरोग्य योजना '...रांची- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडची...
कृषिपंपासाठी बड्या कंपन्यांच्या निविदाबारामती - राज्यातील दोन लाख ९० हजार शेतकऱ्यांच्या...
मराठवाड्यातील ८६४ प्रकल्पांत ३३ टक्‍केच...औरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीसाठ्यांमधील उपयुक्‍त...
ऊस ठिबक योजनेसाठी लेखापरीक्षकाची नेमणूक पुणे : राज्यात ऊस लागवडीसाठी ठिबक अनुदान...
इथेनॉलमधील फरक ओळखण्यासाठी यंत्रणानवी दिल्ली ः देशात तीन प्रकारच्या मोलॅसिसपासून...
‘ग्लायफोसेट’वर बंदी नाहीपुणे : मानवी आरोग्याला धोकादायक असल्याचा कोणताही...
विदर्भात पावसाची दमदार हजेरीपुणे : बंगालच्या उपसागरातील ‘दाये’ वादळाने बाष्प...
बचत गटांतून मिळाली विकासाला उभारीअस्तगाव (ता. राहाता, जि. नगर) हा तसा सधन परिसर....
कांदाचाळीसाठी सव्वाशे कोटींचा निधीनगर  ः एकात्मिक फलोत्पादन विकास...
शेती, आरोग्य अन्‌ शिक्षणाचा जागरगावाच्या शाश्वत विकासासाठी शेती, आरोग्य, शिक्षण...
महाराष्ट्राची सिंचनक्षमता आता 40 लाख...मुंबई - शेतीयोग्य जमिनीतील केवळ 18 टक्‍के...