agriculture news in Marathi, loan subvention benefit without fill up online form, Maharashtra | Agrowon

आॅनलाईन अर्ज न करताच व्याज सवलतीचा लाभ
टीम अॅग्रोवन
रविवार, 4 फेब्रुवारी 2018

कर्जमाफी कशी मिळत आहे, हे शासकीय अधिकारी व मंत्र्यांनाही माहीत नाही. सगळा घोळ आहे. तो निस्तरण्यात यंत्रणा अपुरी पडताना दिसते. 
- कडूअप्पा पाटील, शेतकरी संघटना, जळगाव

जळगाव  ः जिल्ह्यात ऑनलाइन अर्ज न करता कर्जात २५ टक्के सवलतीचा यावल व जळगाव तालुक्‍यांतील नियमित कर्जदार शेतकऱ्यांना लाभ झाला आहे. तसेच २०१७ मधील थकबाकीदार असलेल्या एका शेतकऱ्यालाही कर्जमाफीचा लाभ मिळाल्याचा प्रकार यावल तालुक्‍यात घडला असून, हा सावळा गोंधळ निस्तरण्यासाठी जिल्हा विशेष लेखा परीक्षण शाखेची सारखी सर्कस सुरू आहे. 

ज्यांनी ऑनलाइन अर्ज सादर केले, असे अनेक नियमित कर्जदार २५ टक्के सवलतीपासून वंचित आहेत. परंतु ज्यांनी अर्ज केले नव्हते, अशा नियमित कर्जदार शेतकऱ्यांना २५ टक्के सवलतीचा लाभ मिळाल्याचे प्रकार यावल तालुक्‍यातील भालोद, बामणोद, पाडळसा येथील विविध बॅंकांच्या शाखांमध्ये घडले आहेत. भालोद येथील एका शेतकरी २०१७ मधील थकीत कर्जदार आहे. याच शेतकऱ्याचे २०१४ मध्ये अन्य एका बॅंकेचे पीक कर्जही थकले होते. या शेतकऱ्याचे २०१७ मधील व २०१४ मधील थकीत कर्ज माफ झाले आहे. म्हणजेच दोन बॅंकांचे कर्ज माफ झाले आहे. 

जळगाव तालुक्‍यातील धानवड येथील चार शेतकऱ्यांची कर्जमाफीच्या यादीत दोनदा नावे आली असून, त्यांनाही दोनदा लाभ मिळत असल्याचे सहायक निबंधक कार्यालयाच्या लक्षात आले. हा घोळ निस्तरण्यासाठी सुमारे आठ हजार शेतकऱ्यांच्या यादीचे लेखापरीक्षण सुरू आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांची माहिती ऑनलाइन अर्जासोबत जुळत नाही, त्या संदर्भात संबंधित शेतकऱ्याकडून माहिती घेऊन दुरुस्ती केली जात आहे. त्यांना सहायक निबंधक कार्यालयाकडे बोलाविण्यात आले आहे. 

नियमित कर्जदारांच्या यादीचा घोळ
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या दगडी बॅंकेतील खातेदार असलेल्या अनेक नियमित कर्जदार शेतकऱ्यांना २५ टक्के सवलतीचा लाभ मिळालेला नाही. मध्यंतरी नियमित कर्जदार शेतकऱ्यांची नावे थकबाकीदार शेतकऱ्यांच्या यादीत आली. ही यादी सहायक निबंधक कार्यालयाकडे पुन्हा परत पाठविण्यात आली. 

प्रतिक्रिया
दुबार कर्जदारांची नावे शोधण्यात येत असून, सुटीच्या दिवशीही आमचे कामकाज सुरू आहे. अनेक नावे शोधली आहेत. नियमित कर्जदारांची नावे ग्रीन यादीत समाविष्ट केली जातील. 
- अशोक बागल, सहायक, जिल्हा उपनिबंधक, जळगाव

इतर अॅग्रो विशेष
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर...पणजी : देशाचे माजी संरक्षणमंत्री व गोव्याचे...
आडातच नाही तर पोहऱ्यात येणार कोठून? दुष्काळ पडल्याने पाण्यासाठी बोअर घेण्याची अक्षरशा...
कृषी पर्यवेक्षकांना पदोन्नती मिळाली, पण...पुणे : राज्यातील कृषी पर्यवेक्षकांना शासनाने मंडळ...
दुष्काळी मराठवाड्यात मार्चमध्येच ‘केसर'...केज, जि. बीड ः फळांचा राजा आंबा बाजारात...
मिरची पीक अंतिम टप्प्यातनंदुरबार (प्रतिनिधी) ः खानदेशातील मिरचीचे आगार...
सुधारित जोडओळ पद्धतीमुळे कपाशीतून...सोगोडा (जि. बुलढाणा) येथील विजय पातळे या कपाशी...
परभणी ठरले देशात उष्णपुणे : राज्यात अनेक ठिकाणी तापमान ३७ अंशांच्या...
द्राक्ष उत्पादकांची फसवणूक थांबणार कधी?नाशिक: नाशिक जिल्ह्यातील मुख्य अर्थकारण...
यवतमाळच्या अनिकेतने तयार केला फवारणीचा...यवतमाळ ः फवारणीमुळे होणाऱ्या विषबाधा सर्वदूर...
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर...पणजी : गेल्या एक वर्षापासून अधिक काळ...
आधी धान्य घ्या, पैसे ऊस बिलातून घेतो...कोल्हापूर : केवळ उसाचे उत्पादन घेतल्याने आलेल्या...
खरीप आढावा बैठका जिल्हाधिकारी घेणारपुणे : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर यंदा खरीप...
कृषिसेवक भरतीला न्यायाधीकरणाची मनाईपुणे : कृषिसेवक पदासाठी झालेल्या परीक्षेच्या...
लिंबावर काळ्या माशीचा प्रादुर्भावअकोला: लिंबू बागांमध्ये सध्या आंबिया बहर...
विदर्भात आज वादळी पावसाची शक्यतापुणे : वातावरणाच्या खालच्या थरात होत असलेल्या...
पीक बदलातून शेती केली किफायतशीर...जलसंपदा विभागात कार्यरत असणाऱ्या नारायण अात्माराम...
आत्मदहनाचा इशारा देणारे २३ शेतकरी...बुलडाणा: जिल्ह्यातील पेनटाकळी प्रकल्पाच्या...
‘ग्रीन होम एक्स्पो’ला पुण्यात प्रारंभपुणे : ‘सकाळ-अॅग्रोवन’च्या वतीने सेकंड होम,...
रेपो रेटघटीचा लाभ कोणाला?केंद्रीय अर्थसंकल्प, रिझर्व्ह बॅंकेचे द्वैमासिक...
यांत्रिकीकरण ः वास्तव आणि विपर्याससध्या राज्यभर विविध योजनांमधून अवजारे अनुदान...