agriculture news in marathi, loan waiveing process, pune, maharashtra | Agrowon

कर्जमाफीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात ः सहकारमंत्री
गणेश कोरे
रविवार, 15 ऑक्टोबर 2017
पुणे : कर्जमाफीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून, दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यांवर पैसे जमा करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, अशी माहिती सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली. 
 
पुणे : कर्जमाफीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून, दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यांवर पैसे जमा करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, अशी माहिती सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली. 
 
पूना मर्चंटस चेंबरच्या वतीने आयाेजित रास्त दरात लाडू चिवडा उपक्रमाचे उद्‍घाटन शनिवारी (ता. १४) मंत्री देशमुख यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी मंत्री देशमुख म्हणाले, की कर्जमाफीसाठीच्या अर्जांची अंतिम मुदत संपल्यानंतर सहकारी आणि राष्ट्रीयकृत बॅंकांद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यांची माहिती संकलित करण्यात आली. त्याची छाननी झाली आहे. आता कर्जमाफीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. जिल्हा आणि राष्ट्रीयकृत बॅंकांकडून आलेल्या खात्यांच्या माहितीची छाननी पूर्ण झाली आहे, अशा शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यांवर दिवाळीपूर्वी कर्जमाफीची रक्कम जमा करणार आहाेत. यासाठी सहकार विभाग आणि संबंधित जिल्‍ह्यांचे पालकमंत्री प्रयत्नशील आहे.
 
गेल्या वर्षी तूर खरेदीमध्ये व्यापाऱ्यांची तूर माेठ्या प्रमाणावर खरेदी झाली. अशी स्थिती यंदा हाेऊ नये यासाठी तूर, मूग आणि उडीद खरेदीचे वेळापत्रक करण्यात येणार आहे. त्यानुसार आॅनलाइन नाेंदणी केलेल्या शेतकऱ्यांना माेबाईलवर फाेन करून आणि मसेज देऊन विक्रीसाठीचा दिवस आणि वेळ देण्यात येणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना रांगेत उभे राहून हाेणारा त्रास हाेणार नाही, असेही देशमुख यांनी यावेळी सांगितले. 
 
टेक्सटाईल पार्कबाबत हाेणाऱ्या आराेपांविषयी मंत्री देशमुख म्हणाले, की ग्रामीण भागात राेजगार उपलब्ध व्हावा यासाठी टेक्सटाईल पार्क उभारण्यात येत आहे. यामध्ये काेणताही गैरव्यवहार झालेला नसून, चुकीची माहिती देणाऱ्यांनी माहिती घ्यावी.

इतर ताज्या घडामोडी
'ईव्हीएम'ऐवजी आता मतपत्रिकांचा वापर...नवी दिल्ली : आगामी निवडणुकांमध्ये इलेक्‍...
राज-पवार भेटीने चर्चेला उधाणमुंबई : दिल्ली येथे कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी...
परभणीत ढोबळी मिरची १२०० ते १८०० रुपये... परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला...
औरंगाबाद येथे मोसंबी २००० ते ४५०० रुपये औरंगाबाद  : येथील बाजार समितीमध्ये शनिवारी...
कृषी सल्लामार्च महिन्यात उन्हाळी भुईमूग पिकाची पेरणी करू...
पशू सल्लागोठ्यातील अस्वच्छतेमुळे बऱ्याचदा दुधाळ जनावरांना...
सांगलीतील द्राक्ष, बेदाणा उत्पादक ढगाळ... सांगली : गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ...
जळगावमधील शेतकऱ्यांचा परदेश अभ्यास दौरा... जळगाव : परदेशातील शेतीचे तंत्रज्ञान, शेती,...
बुलडाणा जिल्ह्यातील ७४८ गावे... बुलडाणा : जिल्ह्यात २०१७-१८ च्या खरीप हंगामात...
टीस विद्यापीठ-एसआयआयएलसी शैक्षणिक करारपुणे : शैक्षणिक क्षेत्रातील नामांकित टाटा...
मोहरीवर्गीय आच्छादन पिके तण...तणनाशकांना प्रतिकारकता विकसित झालेली असल्याने...
बीटी बियाणे भरपूर; पण धुळपेरणी टाळापुणे : राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना...
औरंगाबाद विभागात ७२ लाख ५१ हजार टन ऊस...औरंगाबाद  : मराठवाडा व खानदेशातील सहा...
नाशिक जिल्ह्यातील धरणात ४६ टक्केच पाणी...नाशिक : मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात हवामानातील...
मराठवाड्यात शेततळ्यांचे पूर्णत्‍व...औरंगाबाद : मराठवाड्यात उद्दीष्टाच्या तुलनेत...
सेंद्रीय उत्पादने, सेंद्रीय शेतीला...मुंबई : सेंद्रीय अन्नाची उपलब्धता आणि...
सुपीकता टिकवण्यासाठी संवर्धित शेतीपारंपरिक शेतीपासून किमान मशागत ते शून्य मशागत हा...
पुणे जिल्ह्यात टोमॅटो लागवडीस प्रारंभ पुणे : जिल्ह्यातील अनेक भागांतील शेतकऱ्यांनी...
साताऱ्यात मेथी ५०० ते ७०० रुपये शेकडा सातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत...
पानवेल व्यवस्थापन सल्लासद्यःस्थितीत पानवेलीच्या शेतात आंतरमशागत, वेलीची...