Agriculture News in Marathi, loan waiver amount deposited in farmers accounts, satara district, maharashtra | Agrowon

साताऱ्यात २१७५ शेतकऱ्यांच्या खात्यांवर कर्जमाफीची रक्कम जमा
टीम अॅग्रोवन
रविवार, 19 नोव्हेंबर 2017
सातारा : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत जिल्ह्यातील लाभार्थ्यांची पहिली यादी प्रसिद्ध झाली आहे. यामध्ये जिल्ह्यातील दोन हजार १७५ थकबाकीदार शेतकऱ्यांच्या खात्यांवर दहा कोटी ५१ लाख २१५ रुपयांची रक्‍कम जिल्हा सहकारी मध्यवर्ती बॅंकेत जमा करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधकाच्या कार्यालयाच्या सूत्रांनी दिली.
 
सातारा : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत जिल्ह्यातील लाभार्थ्यांची पहिली यादी प्रसिद्ध झाली आहे. यामध्ये जिल्ह्यातील दोन हजार १७५ थकबाकीदार शेतकऱ्यांच्या खात्यांवर दहा कोटी ५१ लाख २१५ रुपयांची रक्‍कम जिल्हा सहकारी मध्यवर्ती बॅंकेत जमा करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधकाच्या कार्यालयाच्या सूत्रांनी दिली.
 
दुष्काळी परिस्थितीसह विविध कारणांमुळे शेतकरी कर्जबाजारी झाल्याने राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. या शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबाव्यात यासाठी विरोधी पक्षांनी गत अधिवेशात सरसकट कर्जमाफीसाठी गोंधळ घातला होता. त्यानंतर संघर्ष यात्राही काढली.
 
या दरम्यान राज्यभर शेतकरी आंदोलन उभे राहून शेतकऱ्यांनी आक्रमकपणे महाराष्ट्र बंद केला. त्यामुळे राज्य सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला. 
 
त्यामध्ये थकबाकीदार शेतकऱ्यांना दीड लाखापर्यंत, तर नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना २५ टक्के किंवा २५ हजारांपर्यंत प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय घेतला.
 
तसा अध्यादेश सहकार विभागाने २८ जूनला काढला. कर्जमाफीच्या अध्यादेशातील निकषानुसार, १ एप्रिल २०१२ नंतर ज्यांनी कर्ज घेतलेले आहे आणि ३० जून २०१६ रोजी जे थकबाकीदार आहेत, अशा शेतकऱ्यांची ऑनलाइन अर्ज करण्यासाठी सांगण्यात आले होते. यामध्ये जिल्ह्यात दोन लाख ४० हजार ७४७ अर्ज दाखल दाखल झाले होते. 
 
यापैकी जिल्ह्यातील दोन हजार २०३ शेतकऱ्यांचा समावेश झाला. मात्र, त्यातील २८ अर्जदार शेतकऱ्यांनी दीड लाखावरील कर्जाची रक्कम भरली नसल्याने ते अपात्र ठरले.
 
या शेतकऱ्यांनी डिसेंबरअखेर दीड लाखावरील कर्जाची परतफेड केल्यास हे शेतकरी कर्जामाफीस पात्र ठरणार आहेत. त्यातील पात्र २१७५ थकबाकीदार शेतकऱ्यांना दहा कोटी ५१ लाख २१५ रुपयांची रक्‍कम जिल्हा बॅंकेत जमा करण्यात आली आहे. ही पहिली यादी असून यानंतर टप्पाटप्प्याने पुढील याद्या प्रसिद्ध होणार आहेत.

इतर ताज्या घडामोडी
आर. आर. पाटील यांचे स्मारक युवकांना...सांगली   ः आर. आर. पाटील यांनी ग्रामविकास,...
जळगाव जिल्हा परिषद पाणी योजनांचे वीज...जळगाव : पाणी योजनांचे बिल भरण्यात आले नसल्याने...
जमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे...जमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत...
खानदेशात कांदा लागवड निम्म्याने...जळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड...
सटाणा, मालेगावसाठी सोडणार चणकापूर...नाशिक : सटाणा व मालेगावला भेडसावणाऱ्या...
पुणे विभागात ४८ हजार हेक्टरवर कांदा...पुणे   ः पुणे विभागात आत्तापर्यंत ४८ हजार...
वीजदरवाढीचा शॉक, अनुदानाची फक्त घोषणाचजळगाव ः वस्त्रोद्योगाला चालना मिळावी, उद्योजकांचा...
महिलांनी नाचणीपासून बनवले सत्तरहून अधिक...कोल्हापूर   : नाचणीची आंबील, नाचणीच्या...
बुलडाणा जिल्ह्यात रब्बीची ५६ हजार...बुलडाणा  ः कमी व अनियमित पावसामुळे संपूर्ण...
कोल्हापुरात ऊसतोडणीसाठी यंदा पुरेसे मजूरकोल्हापूर  : गेल्या हंगामाच्या तुलनेत...
यवतमाळ जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा ः...वणी, जि. यवतमाळ   ः केंद्र व राज्यातील सरकार...
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी...नाशिक (प्रतिनिधी) : कुटुंबाच्या आर्थिक अडचणीच्या...
पीकनिहाय सिंचनाचे काटेकोर नियोजनपिकांच्या अधिक उत्पादकतेसाठी जमिनीची निवड, मुबलक...
नारळासाठी खत, पाणी व्यवस्थापननारळ हे बागायती पीक असल्यामुळे पुरेसे पाणी...
खानदेशात केळीच्या दरात सुधारणाजळगाव : केळीची आवक सध्या कमी असून, थंडी वधारताच...
नाशिक जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यात...नाशिक : नाशिक जिल्ह्यातील पंधरापैकी आठ तालुके...
‘निम्न दुधना’तून पाणी देण्याचे...परभणी : निम्म दुधना प्रकल्पातून पिण्यासाठी पाणी...
सर्वसाधारण सभेचा सत्ताधाऱ्यांना धसकाजळगाव : जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा येत्या २८...
शेतकऱ्यांनी चारा पिकांवर भर द्यावा ः...पुणे  : नव्या वर्षाच्या सुरवातीलाच कृषी...
‘वनामकृवि’ तयार करणार दुष्काळी...परभणी  ः मराठवाड्यात उद्भलेल्या दुष्काळी...