कोल्हापुरात सव्वाचार लाख शेतकऱ्यांची नोंदणी

कर्जमाफी अर्ज
कर्जमाफी अर्ज

कोल्हापूर : जिल्ह्यात कर्जमाफीसाठी ४ लाख २२७ हजार शेतकऱ्यांची नोंदणी झाली आहे.१५ सप्टेंबर हा अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस असल्याने ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी तालुक्‍याच्या ठिकाणी झुंबड उडाली आहे.

कोल्हापुरात जिल्हा बॅंकेसह राष्ट्रीयीकृत बॅंकांकडून कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांची संख्या ३ लाख १७ हजार आहे. यापैकी १ लाख ९८ हजार शेतकऱ्यांचे अर्ज ऑनलाइन भरून पूर्ण झाले आहेत.

अर्जात शेतकऱ्यासह त्याच्या पत्नीचेही नाव वाढत असल्याने एकूण शेतकऱ्यापेक्षा नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांची संख्या अधिक होत असल्याचे सहकार विभागातील सूत्रांनी सांगितले. अर्ज भरण्यास विलंब होत असल्याने विविध तालुक्यांत ५४ ठिकाणी नवीन यंत्रे देण्यात आली आहेत.

विविध ठिकाणी गर्दी होत आहे; तसेच अडचणीही येत आहेत. यामुळे नोंदणीची मुदत वाढवावी, अशी आमची मागणी आहे. - रूपेश पाटील, आजरा, जि. कोल्हापूर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com