कर्जमाफी प्रक्रियेत अकोलाही अग्रेसर
गोपाल हागे
शुक्रवार, 6 ऑक्टोबर 2017

अकोला : श्री छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत कर्जमाफीचा लाभ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दीपावलीपूर्वी देण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून जलदगतीने कार्यवाही केली जात आहे. या कामांत राज्यातील काही जिल्ह्यांनी आघाडी घेतली असून, त्यात अकोला जिल्ह्याचादेखील समावेश आहे.

अकोला : श्री छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत कर्जमाफीचा लाभ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दीपावलीपूर्वी देण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून जलदगतीने कार्यवाही केली जात आहे. या कामांत राज्यातील काही जिल्ह्यांनी आघाडी घेतली असून, त्यात अकोला जिल्ह्याचादेखील समावेश आहे.

कर्जमाफी जाहीर झाल्यानंतर प्रशासनाने तातडीने बैठका घेऊन शेतकऱ्यांकडून कर्जमाफीचे अर्ज ऑनलाइन भरून घेण्यासाठी काटेकोर नियोजन केले. त्यानुसार २२ सप्टेंबरपर्यंत महा-ई-सेवा केंद्र, सीएससी केंद्र, आपले सरकार केंद्रांच्या माध्यमातून जिल्ह्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांचे कर्जमाफीचे ऑनलाइन अर्ज भरण्यात आले. मुदतीपर्यंत जिल्ह्यात दोन लाख ४८ हजार ४२९ शेतकऱ्यांच्या अर्जांची नोंदणी करण्यात आली आहे. त्यापैकी एक लाख ३८ हजार ९६२ शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज भरले.

पात्र अर्ज तपासणीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. दिवाळीपूर्वी कर्जमाफीबाबतची संपूर्ण कार्यवाही पूर्ण केली जाणार आहे. कर्जमाफीच्या प्रक्रियेत आघाडी घेणाऱ्या सोलापूर, उस्मानाबाद, जालना, यवतमाळ, चंद्रपूर व जळगाव जिल्ह्यांच्या बरोबरीने अकोला जिल्ह्यानेही कर्जमाफी प्रक्रिया जलदगतीने राबविण्यात आघाडी घेतली आहे.

पालकमंत्र्यांनी घेतला आढावा
कर्जमाफीबाबत प्रशासनाने केलेल्या कार्यवाहीसंदर्भात पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांच्यासमवेत चर्चा केली. या वेळी अपर जिल्हाधिकारी राजेश खवले, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक तुकाराम गायकवाड, सहकार उपनिबंधक श्री. मावळे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे व्यवस्थापक पी. पी. शेंडे, उमाळे उपस्थित होते.

पालकमंत्री यांनी कर्जमाफी संदर्भातील ऑनलाइन भरलेल्या अर्जांचे झालेले चावडीवाचन, जिल्हा विशेष लेखा परीक्षक यांनी सहकारी संस्था यांच्याकडील कर्जमाफी अर्जाबाबत केलेली पडताळणी, अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी संस्थांनी अपलोड केलेली माहिती, १ ते ६६ नमुन्यातील बँकांकडून सीबीएस प्रणालीनुसार भरण्यात आलेली माहिती याचा आढावा घेतला.

इतर बातम्या
कर्जमाफी योजनेस प्रारंभ...राज्य सरकारची...मुंबई : कर्जमाफी देण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या...
वाढत्या लोकसंख्येसाठी व्हर्टिकल फार्म...भारतासारख्या उच्च लोकसंख्या असलेल्या देशांसाठी...
केवळ अमळनेरलाच कडधान्य खरेदी केंद्र सुरू जळगाव  ः जिल्ह्यात मंगळवारपर्यंत (ता. १७)...
आयुर्वेदिक रेसिपींच्या आस्वादासाठी...पुणे ः आयुर्वेदात उल्लेख असलेल्या...
बीजी ३ च्या विनापरवाना विक्रीवर...मुंबई : तणनाशक सहनशील (हर्बिसाईड टाॅलरंट)...
उत्पादन, उत्पन्नवाढीसाठी गटशेतीची कास...देळेगव्हाण, जि. जालना  : शेती क्षेत्र घटत...
परभणी जिल्ह्यात कृषी विभागातील ३१ टक्के...परभणी ः परभणी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी...
राज्यात कापूस खरेदी २५ पासूननागपूर : राज्यात बुधवार (ता. २५) पासून पणन...
वऱ्हाडातील प्रकल्पांची ‘तहान’ कायमअकोला  ः दिवाळीचे पर्व सुरू झाले; मात्र या...
नाफेडच्या खरेदी केंद्रांवर सोयाबीनला '...परभणी : नाफेडमार्फत आधारभूत किंमत खरेदी...
नागपूर ३६.४ अंशांवरपुणे : राज्यातील काही भागांत कमाल तापमानात वाढ...
उत्पादकता घटल्याने फूल मार्केटमध्ये...नागपूर : परतीच्या पावसाचा फटका बसल्याने या वर्षी...
मंचर बाजार समितीत कटतीद्वारे लूटपुणे : पालेभाज्यांसाठी आणि विशेषतः काेथिंबीरीसाठी...
नांदेड विभागात ३३ कारखान्यांच्या...परभणी : नांदेड विभागातील ५ जिल्ह्यांतील ३३ साखर...
समृद्धी महामार्गाच्या विरोधाची धार...घोटी, जि. नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...
‘महाबीज’ करणार २७ जिल्ह्यांत बीजोत्पादनअकोला ः राष्ट्रीय कृषी विस्तार व तंत्रज्ञान...
एक चमचा तेलामुळे शोषली जातील हिरव्या...एक चमचा तेलाचा हिरव्या भाजीसोबत केलेला उपयोग,...
कोल्हापूर जिल्ह्यात सततच्या पावसाने...कोल्हापूर : सततच्या पावसामुळे पिकात पाणी साचून...
तापमान पुन्हा वाढू लागलेपुणे : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील बहुतांशी...
शेतकऱ्यांना प्रक्रिया उद्योग,...पुणे ः ‘‘स्टार्चचे प्रमाण निम्म्यापेक्षा कमी...